साताऱ्यात विसर्जन मिरवणुकीत चेंगराचेंगरी; तरुण पायाखाली चिरडला; पुढं घडलं असं काही…

Satara Crime News 2 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरात काल गुरुवारी उत्साहपूर्ण वातावरणात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत डीजे आणि ढोल ताशांच्या ठेक्यावर तरुणाई नाचली. मात्र, रात्री विसर्जन मिरवणुकीत उसळलेल्या मोठ्या प्रमाणात गर्दीत प्रचंड चेंगराचेंगरी झाल्याने एक तरुण गुदमरून बेशुद्ध पडल्याची घटना घडली. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळीच प्रसंगावधान दाखवून त्या तरुणाला गर्दीतून सुरक्षित … Read more

‘राज्य उत्पादन शुल्क’ची दारु वाहतूकीवर धडक कारवाई; 22 लाख 31 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त

Crime News jpg

कराड प्रतिनिधी । राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज सातारा जिल्ह्यात तीन ठिकाणी धडक कारवाई करत गोवा बनावटीची अवैध्यरिती दारू ताब्यात घेतली. यावेळी कराड, पाटण व खंडाळा या तालुक्यात करण्यात आलेल्या कारवाईत एकूण 980 लिटर हातभट्टी दारु, 25 बॉक्स गोवा बनावट दारु, दोन चाकी वाहने, एक सहाचाकी वाहने असा सुमारे 2 लाख 56 हजार किंमतीचा मुद्देमाल … Read more

सातारा जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रवेशद्वारावर दोघांकडून पोलिसांना मारहाण; नेमकं कारण काय?

Satara Collectors Office News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेक प्रकार घडत असतात. अनेक मागण्यांवरून आंदोलने, मोर्चे होतात. त्यावेळी कोणता अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील ठेवला जातो. मात्र, काल, सोमवारी या ठिकाणी एक धक्कादायक प्रकार घडला. या ठिकाणी उपोषणासाठी आलेल्या दोन आंदोलकांनी महिला पोलिस उपनिरीक्षक तसेच एका महिला पोलिसाला मारहाण केली. याप्रकरणी संबंधित आंदोलकांवर शासकीय … Read more

साताऱ्यात मेडिकल दुकानदाराकडून 8 वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण; कारण वाचून बसेल धक्का…

jpg 20230618 083243 0000

सातारा प्रतिनिधी । लहान मुले खेळताना दंगा केल्यावर आपण त्याला ओरडून गप्प बसवतो. लहान मुलांकडून अनेक प्रकारे त्रास दिला जातो. मात्र, काही क्षुलक कारणावरून त्याला बेदम मारहाण करणे हे चुकीचेच. असाच प्रकार साताऱ्यात सोमवारी सायंकाळी घडला. केवळ पिपाणी वाजवत असल्याच्या कारणावरून ८ वर्षांच्या मुलाला एका मेडिकल दुकानदाराने बेदम मारहाण केली. आणि मारहाणी मुलगा इतका जखमी … Read more

बिबट्यांनी वराडे गावात ठोकलाय मुक्काम! आज पहाटे पुन्हा CCTV कॅमेऱ्यात कैद

Leopard News 20230926 152637 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील वराडे येथे बिबट्याने आता पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. मंगळवारी पहाटे पावने दोन वाजण्याच्या सुमारास गावात घुसलेला बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. बिबट्याच्या रात्रीच्या वावरण्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कराड तालुक्यातील वराडे गावात आता एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 3 बिबट्यांचे वास्तव्य आहे. हे बिबटे महिन्याभरात … Read more

सातारा शहर परिसरातून 61 जण हद्दपार!; सातारा पोलिसांकडून आदेश पारित

jpg 20230618 083243 0000

सातारा प्रतिनिधी । सध्या सर्वत्र गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. अनेक सार्वजनिक मंडळांकडून सामाजिक संदेश देणारे देखावे देखील दाखविले जात आहेत. या दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सातारा पोलिसांकडून सुव्यवस्था बिघडवणाऱ्या विरोधात कारवाई केली जात आहे. या दरम्यान, सातारा शहर परिसरातील ६१ जणांनी जिल्हा पोलीस सार्वजनिक ठिकाणी वावर न करण्याचे आदेश सातारा … Read more

CRIME NEWS : व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी महाबळेश्वरच्या माजी नगरसेवकासह 4 जणांना अटक

Karad Bhel Fish News 20230926 105910 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर येथे व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करी प्रकरणी महाबळेश्वरच्या माजी नगरसेवक प्रकाश पाटील यांच्यासह 3 जणांवर वन विभागाकडुन गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक केली आहे. व्हेल माशाच्या उलटीचं वजन सुमारे साडेसहा किलो असून त्याची किंमत 6 कोटी रुपये इतकी आहे. महाबळेश्वरचे माजी नगरसेवक प्रकाश पाटील, … Read more

फलटणमध्ये कोयत्याचा धाक दाखवून मागितली खंडणी; पोलिसांनी आरोपीला 4 तासात ठोकल्या बेड्या

Phalatan Crime News 20230910 114750 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | फलटण शहरातील मध्यवर्ती भागातील एका व्यापाऱ्यास खंडणीची मागणी करत कोयता व तलवारीचा धाक दाखवून दोघांनी लुटल्याची घटना रविवारी बाजारादिवशी सायंकाळी पावणेपाच सुमारास घडली होती. या घटनेनंतर अवघ्या चार तासात चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. २४/०९/२०२३ रोजी सायंकाळी ४.४१ वाजण्याच्या सुमारास १३५ रविवारपेठ उघडया मारुती मंदीरासमोर फलटण … Read more

विहीरीतील इलेक्ट्रीक मोटर चोरणाऱ्या 5 जणांची टोळी तडीपार

Crime News 20230925 192301 0000 jpg

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्हयातील सातारा व कराड तालुक्यातील उंब्रज, तळबीड, बोरगांव पोलीस ठाणेहद्दीत विहीरीमधील इलेक्ट्रीक मोटर चोरीचे गुन्हे कारणाऱ्या टोळीतील ५ जणांवर तडीपारीची कारवाई सातारा पोलिसांकडून करण्यात आली आहे. १) गणेश बाळासाहेब कांबळे, (वय २९, रा. पेरले ताकराड जि सातारा) (टोळी प्रमुख) २) गणेश महेंद्र चव्हाण, (वय २०, रा. पेरले ता. कराड (टोळी सदस्य), … Read more

Crime News: फलटण खून प्रकरणातील फरार आरोपीस अटक

Phaltan Crime News 20230924 233519 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | फलटण शहर पोलीस स्टेशन येथे सुमारे 6 दिवसापुर्वी खुनाच्या गुन्ह्याची घटना घडली होती. या घटनेतील फरारी आरोपीस असलेल्या दुसऱ्या आरोपीस फलटण ग्रामीण पोलीसांनी शिताफीने पकडले. राहूल उत्तम इंगोले रा. लोहगाव पुणे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हदीमध्ये दिनांक १९/०९/२०२३ रोजी विडणी ता. … Read more

पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तब्बल 20 जण तडीपार; 32 जणांकडून वर्तणुकीबाबतचा बॉंड

Pusegaon Police Station 20230924 140837 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | खटाव तालुक्‍यातील पुसेगाव पोलीस ठाणे हद्दीत गणेशोत्सव व ईद ए मिलादच्या अनुषगाने हद्दीतून 20 सराईत गुन्हेगारांविरोधात तडीपारीचे आदेश देण्यात आले आहेत. तर 32 इसमांकडून चांगल्या वर्तणुकीचा बॉंड पुसेगाव पोलिसांनी लिहून घेतला घेण्यात आहे. पुसेसावळी या ठिकाणी सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे जाळपोळ व दोन गटात वाद झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर पोलिसांकडून … Read more

कराड-ढेबेवाडी रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत कोल्ह्याचा जागीच मृत्यू

Fox Death News 20230924 000600 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड – ढेबेवाडी मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक कोल्ह्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. यातील मृत कोल्ह्यास शनिवारी सकाळी वन विभागाने ताब्यात घेतले. कराड – ढेबेवाडी मार्गाचे रुंदीकरण करण्यात आल्यापासून वाहनांचा वेग जास्तच वाढला आहे. या मार्गावरून अती वेगाने जाणाऱ्या तसेच येणाऱ्या वाहनांची संख्या देखील वाढली आहे. परिणामी कमी … Read more