उंडाळे नळ पाणीपुरवठा योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा; कराडात आ. डॉ. भोसलेंचे अधिकाऱ्यांना निर्देश

Karad News 1 3

कराड प्रतिनिधी । कराड दक्षिणमधील डोंगरी भागातील गावांसाठी राज्य शासनाने काही वर्षांपूर्वी उंडाळे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना सुरु केली. पण सातत्याने उद्‌भवणाऱ्या विविध अडचणींमुळे ही योजना पूर्णक्षमतेने कार्यान्वित नाही. या पार्श्वभूमीवर कराड दक्षिणच्या डोंगरी भागासाठी वरदायिनी ठरलेल्या उंडाळे प्रादेशिक पाणी योजनेसंदर्भात शासकीय विश्रामगृह येथे आज आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. यावेळी … Read more

साताऱ्यातील कास परिसरात हॉटेलमध्ये रेव्ह पार्टीत राडा; बारबालांसह अश्लील डान्सचा व्हिडिओ व्हायरल

Satara News 2 2

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात अशाच एका रेव्ह पार्टीचा भांडाफोड झाला असून सोशल मीडियावर या पार्टीचे फोटो व्हायरल झाले आहेत. साताऱ्याच्या कास पठारावरील (Kas Plateau) एका हॉटेलमध्ये बारबालांसह ही रेव्ह पार्टी (Rave Party) रंगली. रविवारी रात्री एका हॉटेलमध्ये साताऱ्यातील एका कुविख्यात आणि मोक्का भोगलेल्या गुंडाने आपल्या साथीदारांना ही रेव्ह पार्टी अदा केली. या रेव्हपार्टी दरम्यान … Read more

बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटलांनी शेतकऱ्यांना ऊसदराबाबत केले महत्वाचे आवाहन

Karad News

कराड प्रतिनिधी । शेतकरी बंधुनो घरात बसून ऊसाला दर मिळणार नाही. गेल्या दहा वर्षात ऊस दरासाठी आंदोलन झाले नसल्यामुळे उसाला दहा वर्षांत वाढीव दर मिळालेला नाही. त्यासाठी घरातून बाहेर पडा आणि घामाचा दाम घेण्यासाठी रस्त्यावर या सध्या साखर कारखानदार आणि शेतकरी दोघेही अडचणीत सापडलेले आहेत याला केंद्र सरकारचे धोरण जबाबदार आहे. आता सर्वांना बाहेर पडून … Read more

कराडातील झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रस्ताव द्या; आमदार डॉ. अतुलबाबा भोसलेंच्या नगरपालिका प्रशासनाला सूचना

Karad News 1 2

कराड प्रतिनिधी । कराड शहरातील पाटण कॉलनीत गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ अनेक लोकांना झोपडपट्टीत राहावे लागत आहे. या झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावून, त्यांना हक्काची घरे मिळवून देण्यास कराड दक्षिणचे नूतन आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी प्राधान्य दिले आहे. यादृष्टीने बुधवारी त्यांनी या परिसराची पाहणी करुन या झोपडपट्टीच्या पुनर्वसनाबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे निर्देश … Read more

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ

Satara News 2 1

सातारा प्रतिनिधी । जिल्हाधिकारी कार्यालयात सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ जिल्हाधिकारी जितेंद्रडुडी यांच्या हस्ते करण्यात आला. सैनिकांच्या बलीदानामुळेच आपल्या देशासह आपले कुटुंब सुरक्षित आहेत. सैनिकांबाबत संवेदनशिल आहे. एक कुटुंब प्रमुख म्हणून त्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध आहे, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डुडी यांनी दिली. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा सैनिक … Read more

‘अपार’ नोंदणीत सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अव्वल तर साताऱ्याला तृतीय क्रमांक

Satara News 1 3

सातारा प्रतिनिधी । ‘एक देश, एक विद्यार्थी ओळख’ या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या ‘अपार’ नोंदणीत सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. अहिल्यानगर दुसऱ्या, तर सातारा जिल्हा तिसऱ्या स्थानावर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९६ हजार ८३४ विद्यार्थ्यांपैकी ८७ हजार ९८५ विद्यार्थ्यांची ‘अपार’ नोंदणी ९०.८६ टक्के नोंदणी पूर्ण झाली आहे. त्यांना पहिल्या टप्प्यात १२ अंकी ओळख क्रमांक मिळाला आहे. … Read more

सातारा ZP च्या 30 तलावात महिला करणार मासेमारी; महाराष्ट्रातील पहिलीच योजना

Satara News 20241212 114814 0000

सातारा प्रतिनिधी | ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने उमेद अंतर्गत महिलाच्या बचत गटांना जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे 30 पाझर तलाव देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील 30 महिला बचत गटातील महिला या 30 पाझर तलावामध्ये मत्स्य पालन करून आता चांगला फायदा मिळवू शकणार आहेत. सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या संकल्पनेतून राज्यातील … Read more

शिवसागरात सी प्लेनची सुविधा करा; खा.उदयनराजेंचे केंद्रीय राज्यमंत्री मोहोळांना निवेदन

Satara News 20241212 110740 0000

सातारा प्रतिनिधी | खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी कोयना बॅक वॉटर असलेल्या विस्तीर्ण शिवसागर आणि धोम धरण जलाशयात जमीन आणि पाणी अशा दोन्ही ठिकाणी उतरणारी व उड्डाण घेणारी ॲम्फीबायस प्लेनची सुविधा निर्माण करावी, अशी मागणी मोहोळ यांच्याकडे खा. उदयनराजे भोसले यांनी निवेदनाद्वारे केली. खासदार उदयनराजे यांनी केंद्रीय … Read more

फलटण नगरपरिषदेच्या सर्वच विभागांमध्ये भोंगळ कारभार; रणजितसिंह निंबाळकरांकडून अधिकारी धारेवर

Phalatan News 20241212 091503 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण नगर परिषदेच्या सर्वच विभागांमध्ये भोंगळ कारभार सुरू असून यात लवकरात लवकर सुधारणा करावी. विभाग प्रमुखांनी आपल्या विभागाची सखोल माहिती घ्यावी. येत्या आठ दिवसांत पुन्हा एकदा आढावा बैठक घेऊ, अशा सूचना माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी दिल्या आहेत. फलटण नगर परिषदेच्या श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सभागृहामध्ये आयोजित आढावा … Read more

साताऱ्यातील शेतकऱ्यांना तब्बल 57 कोटींचे गायीच्या दुधाचे अनुदान

Satara News 20241212 082857 0000

सातारा प्रतिनिधी | शासनाने जाहीर केलेल्या गायीच्या दुधाच्या अनुदानाचे साताऱ्यातील शेतकऱ्यांना ५७ कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. ही अनुदानाची रक्कम १ जानेवारी ते ३० सप्टेंबर या कालावधीतील आहे. याशिवाय शेतकऱ्यांना एक ऑक्टोबर २०२४पासून दूध अनुदानात वाढ झालेल्या दोन रुपयांचे वाढीव एक कोटी रुपयेही मिळणार आहेत. पशुखाद्याचे दर वाढल्याने पशुधन सांभाळणे शेतकऱ्यांसाठी अवघड बनले आहे. त्यामुळे … Read more

पाटणच्या मान्याचीवाडीचा दिल्लीत गौरव; राष्ट्रपतींच्या हस्ते दोन पुरस्काराचे वितरण

Award News 20241211 205045 0000

कराड प्रतिनिधी | राज्य तसेच देशपातळीवरील विविध पुरस्कार पटकावणाऱ्या पाटण तालुक्यातील मान्याचीवाडीचा आज बुधवारी दिल्लीत राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते आणखी दोन पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. नानाजी देशमुख सर्वोत्तम ग्रामपंचायत आणि ग्रामउर्जा स्वराज विशेष पुरस्कार प्रदान झाला. मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन आणि सरपंच रवींद्र माने यांनी हे पुरस्कार स्वीकारले. मान्याचीवाडी गावाने आतापर्यंत विविध पुरस्कार … Read more

सातारा जिल्ह्यातील धरणांतून सांगलीतील सिंचनासाठी पाण्याचा विसर्ग सुरू

Koyna News 1

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील प्रमुख सहा पाणी प्रकल्प काठापर्यंत भरले असून त्यामध्ये १४१ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे; पण सध्या रब्बी हंगामासाठी पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे. त्यामुळे पुढील काळात विसर्गही वाढणार असल्याने धरणांतील साठाही कमी होणार आहे. तसेच आठवड्यापासून कोयना धरणातून सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, … Read more