सुट्टीवरून कॉलेजला जाताना ‘त्याची’ दुचाकी दुभाजकाला धडकली अन् पुढं घडलं विपरीत…

Crime News 20240924 092432 0000

सातारा प्रतिनिधी | पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर भुईंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जोशी विहीर येथे भरधाव दुचाकी दुभाजकाला धडकून अपघात झाला. यामध्ये दुचाकीचालक युवकाचा मृत्यू झाला आणि या अपघातात त्याच्या पाठीमागे बसलेला मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची नोंद पोलिस ठाण्यात झाली असून पीयूष प्रशांत कोरे (वय 21) असे ठार … Read more

कराड तालुक्यातील गोळेश्वरमध्ये युवकावर कोयत्याने वार

Crime News 20240911 082004 0000

कराड प्रतिनिधी | “न्यायालयात दाखल खटला मागे घे,” असे म्हणत एका युवकावर दोघांनी कोयत्याने वार केल्याची घटना कराड तालुक्यातील गोळेश्वर गावात घडली. याप्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनाजी सत्यवान अदलिंगे (वय 30, रा. गोळेश्वर) असे जखमी युवकाचे नाव आहे. तुकाराम सुभाष माळी (रा. गोळेश्वर) व गणपती नागनाथ माळी (रा. … Read more

कराडातील कृष्णा नाक्यावर दिवसा ढवळ्या महाविद्यालयीन विद्यार्थी- युवकांच्यात तुंबळ हाणामारी

Karad News 14 1

कराड प्रतिनिधी । दोन युवकांनी महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांस शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याची घटना कराड येथील कृष्णा नाक्यावर असलेल्या पुलानजीक गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना झालेल्या हाणामारीच्या घटनेनंतर या परिसरात एकच खळबळ उडाली. विद्यार्थ्यांच्यात सुरुवातीला शाब्दिक वाद झाला. नंतर बाचाबाची होऊन एकमेकांवर दगडफेक देखील झाली. सकाळी घडलेल्या या घटनेमुळे काहीकाळ … Read more

युवकास पाठलाग करून मारहाण; अनोळखी सहा जणांवर गुन्हा दाखल

Crime News 20240609 083250 0000

कराड प्रतिनिधी | गोटखिंडी, जि.सांगली येथील बहिणीकडुन जेवण करुन कार्वेतील घरी निघालेल्या युवकास स्विफ्ट कारमधुन आलेल्या सहाजणांनी पाठलाग करुन मारहाण करत जखमी केल्याची घटना शुक्रवारी रात्री कराड तालुक्यातील गोंदी गावच्या हद्दीत घडली. मारहाण प्रकरणी पोलिसांनी संबंधित अनोळखी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी संकेत सुरेश मंडले (वय २५. रा. … Read more

इंस्टाग्रामवर ओळख करून ‘त्यानं’ सांगलीच्या युवतीवर केला कराडात अत्याचार

20240529 101235 0000

कराड प्रतिनिधी | इंस्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर विवाहाचे आमिष दाखवून सांगली जिल्ह्यातील युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी कराडातील युवकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पसार झाला असून पोलीस पथक त्याच्या मागावर आहे. पीडित युवतीने याबाबतची फिर्याद कराड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. मानस भास्कर देसाई (रा. नम्रता रेसिडेन्सी, कराड) असे गुन्हा … Read more

मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला 20 वर्षे सश्रम कारावास; कराड न्यायालयाचा निकाल

Karad News 20240423 063736 0000 jpg

कराड प्रतिनिधी | लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी युवकाला 20 वर्षे सश्रम कारावास आणि 1 लाख 80 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. तसेच पिडीत मुलीला एक लाख रुपये भरपाई देण्याचा आदेशही देण्यात आला. कराड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. के. एस. होरे यांनी सोमवारी ही शिक्षा सुनावली. सागर शरद लोंढे (वय … Read more

स्पीड बोट उलटल्याने शिवसागर जलाशयात बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह सापडला, तीन दिवस सुरू होता शोध

Koyna News 20240421 161717 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात गुरुवारी वादळामुळे स्पीड बोट उलटल्याने एकजण बुडाला होता. त्याचा मृतदेह रविवारी पाण्यावय तरंगताना आढळून आला. गजेंद्र राजपुरे, असे मृताचे नाव आहे. कायदेशीर सोपस्कार पार पाडून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी की, तेटली (ता.जावली) हद्दीत शिवसागर जलाशयात टी अँड टी कंपनीची स्पीड बोट वादळी वाऱ्याने … Read more

आगाशिवनगरच्या डोंगरावरून पडून युवकाचा मृत्यू

Karad News 20240128 093013 0000 jpg

कराड प्रतिनिधी | जखिणवाडी ता. कराड येथील आगाशिव डोंगरावरून पडून कोयना वसाहत येथील 17 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. 26 जानेवारी रोजी रात्री आठ वाजण्याची सुमारास ही घटना घडली. सोहम दिनकर शेवाळे (वय 17) रा. कोटणीस हॉल समोर, कोयना वसाहत ता. कराड असे मयत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी दिनकर रघुनाथ शेवाळे यांनी कराड शहर पोलिसात … Read more

अंधारात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ‘त्याचा’ अखेर मृत्यू

Crime News 5 jpg

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील कुसूर येथील एका युवकाचा ढेबेवाडी परिसरात खून झाल्याची घटना घडली असून संबंधित युवकाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थित मृतदेह पोलिसांना आढळून आला आहे. ऋतुराज दिलीप देशमुख (वय 31, रा. कुसूर, ता. कराड) असे युवकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, कराड तालुक्यातील वांग नदीपासून काही अंतरावर असलेल्या ढेबेवाडी – कराड … Read more

पाटणच्या युवकानं Facebook वर मैत्री झालेल्या सांगलीच्या डॉक्टर महिलेसोबत केलं असं काही…

Crime News 4 jpg

कराड प्रतिनिधी । सोशल मीडियातील फेसबुकच्या माध्यमातून अनोळखी युवकांसोबत ओळख झाल्यास त्याच्याकडून फसवणूक होण्याच्याही घटना आपण ऐकल्या असतील. अशीच घटना सांगलीच्या एका डॉक्टर महिलेसोबत घडली आहे. फेसबुकवर ओळख झालेल्या डॉक्टर महिलेचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संशयिताकडे पीडितेने उसने पैसे परत मागताच तिचा ‘मॉर्फ’ केलेला अश्लील फोटो ‘व्हायरल’ करण्याची धमकी देत … Read more

युवकाच्या खून प्रकरणी आणखी दोघांना अटक; 5 दिवस पोलीस कोठडी

Crime News 2 jpg

कराड प्रतिनिधी । कराड येथील कार्वेनाका परिसरात पूर्वीच्या झालेल्या वादाचा राग मनात धरून शनिवारी भरदिवसा वडोली निळेश्वर येथील युवकावर चाकूने वार करून त्याचा खून केल्याची घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी तिघा जणांना अटक केली असून त्यांना आज न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. मुबिन पैगंबर इनामदार (रा. कार्वेनाका, कराड), रिझवान गौस शेख … Read more

भरदिवसा युवकावर चाकूने सपासप वार; हल्ला करून संशयित पसार

Crime News 2 1 jpg

कराड प्रतिनिधी । कराड येथील कार्वेनाका परिसरात भरदिवसा युवकावर एकाने चाकूने सपासप वार केल्याची घटना शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घटना घडली. या हल्ल्यात युवकाचा मृत्यू झाला असून हल्लेखोर संशयित घटना स्थळावरून पसार झाले आहेत. शुभम रविंद्र चव्हाण (वय 22, रा. वडोली निळेश्वर, ता. कराड) असे हल्ल्यात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली … Read more