सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ

Satara News 2 1

सातारा प्रतिनिधी । जिल्हाधिकारी कार्यालयात सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ जिल्हाधिकारी जितेंद्रडुडी यांच्या हस्ते करण्यात आला. सैनिकांच्या बलीदानामुळेच आपल्या देशासह आपले कुटुंब सुरक्षित आहेत. सैनिकांबाबत संवेदनशिल आहे. एक कुटुंब प्रमुख म्हणून त्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध आहे, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डुडी यांनी दिली. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा सैनिक … Read more

‘अपार’ नोंदणीत सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अव्वल तर साताऱ्याला तृतीय क्रमांक

Satara News 1 3

सातारा प्रतिनिधी । ‘एक देश, एक विद्यार्थी ओळख’ या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या ‘अपार’ नोंदणीत सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. अहिल्यानगर दुसऱ्या, तर सातारा जिल्हा तिसऱ्या स्थानावर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९६ हजार ८३४ विद्यार्थ्यांपैकी ८७ हजार ९८५ विद्यार्थ्यांची ‘अपार’ नोंदणी ९०.८६ टक्के नोंदणी पूर्ण झाली आहे. त्यांना पहिल्या टप्प्यात १२ अंकी ओळख क्रमांक मिळाला आहे. … Read more

सातारा ZP च्या 30 तलावात महिला करणार मासेमारी; महाराष्ट्रातील पहिलीच योजना

Satara News 20241212 114814 0000

सातारा प्रतिनिधी | ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने उमेद अंतर्गत महिलाच्या बचत गटांना जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे 30 पाझर तलाव देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील 30 महिला बचत गटातील महिला या 30 पाझर तलावामध्ये मत्स्य पालन करून आता चांगला फायदा मिळवू शकणार आहेत. सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या संकल्पनेतून राज्यातील … Read more

शिवसागरात सी प्लेनची सुविधा करा; खा.उदयनराजेंचे केंद्रीय राज्यमंत्री मोहोळांना निवेदन

Satara News 20241212 110740 0000

सातारा प्रतिनिधी | खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी कोयना बॅक वॉटर असलेल्या विस्तीर्ण शिवसागर आणि धोम धरण जलाशयात जमीन आणि पाणी अशा दोन्ही ठिकाणी उतरणारी व उड्डाण घेणारी ॲम्फीबायस प्लेनची सुविधा निर्माण करावी, अशी मागणी मोहोळ यांच्याकडे खा. उदयनराजे भोसले यांनी निवेदनाद्वारे केली. खासदार उदयनराजे यांनी केंद्रीय … Read more

खिशातील दहाच्या नोटेत मिळतेय पोटभर जेवण; जिल्ह्यात ‘शिवभोजन’मुळे 1400 जणांच्या एकवेळ जेवणाची सोय

Satara News 16

सातारा प्रतिनिधी । गरिबांना अत्यल्प दरात भोजन उपलब्ध करण्यासाठी राज्यभरात शिवभोजन थाळी (Shiv Bhojan Thali) सुरू करण्यात आली. या थाळीमुळे सातारा जिल्ह्यातील १४०० जणांचा एकवेळच्या जेवणाचा प्रश्न मार्गी लागत आहे. खिशातील असलेल्या दहा रुपयाच्या नोटेमध्ये देखील पोटभर जेवण केले जात आहे. राज्यात कुणीही उपाशीपोटी राहू नये या मुख्य उद्देश्याने गरिबांच्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या … Read more

सातारा पालिकेची शहरात धडक कारवाई; अतिक्रमणातील 3 टपर्‍या केल्या जप्त

Satara News 14

सातारा प्रतिनिधी । सातारा पालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने राधिका रोडवरील 3 टपर्‍या जप्त केल्या. मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या आदेशानंतर अतिक्रमण हटाव पथकाने मंगळवारी ही कारवाई केली. सातारा शहरातील मुख्य मार्ग व चौकांमध्ये बंद टपर्‍या, खोकी तसेच हातगाडे यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच अवैध धंदेही वाढल्याने कारवाई करावी, अशी नागरिकांनी नगरपालिकेकडे मागणी केली होती. … Read more

साताऱ्यात ACB ची मोठी कारवाई; 5 लाखांच्या लाच प्रकरणी सातारा जिल्हा सत्र न्यायाधीशासह चौघांवर गुन्हा दाखल

Crime r News

सातारा प्रतिनिधी । साताऱ्यात आज पुणे-सातारा अँटीकरप्शन विभागाच्या वतीने संयुक्तिकपणे मोठी कारवाई करण्यात आली असून सातारा जिल्हा सत्र न्यायालयातील न्यायाधिश धनंजय निकम यांच्यासह चौघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये सापळा रचून अटक केली आहे. या घटनेमुळे न्यायपालिका क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लाच मागितल्या प्रकरणी पुणे येथील एका तरुणीने पोलिस ठाण्यात … Read more

जिल्ह्यात थंडीचे पुनरागमन; महाबळेश्वरचे किमान तापमान १५ अंश

Mahabaleshwar News

सातारा प्रतिनिधी | जिल्ह्यात आठ दिवसांपासून गायब झालेली थंडी परत येऊ लागली आहे. सातारा शहराच्या किमान तापमानात जवळपास ६ अंशांनी उतार आला आहे. सोमवारी १६.५ अंशाची नोंद झाली तर महाबळेश्वरलाही १५ अंश किमान तापमान नोंद झाले. यामुळे जिल्ह्यात हळूहळू गारठा वाढू लागला आहे. जिल्ह्यात दरवर्षीच ऑक्टोबर महिन्याच्या उत्तरार्धात थंडीची चाहूल लागते. त्यानंतर थंडीची तीव्रता वाढत … Read more

महाबळेश्वरची लालचुटूक स्ट्रॉबेरी झळकली टपाल कॅन्सलेशनवर!

Mahabaleshwar Strawberries News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरच्या लालचुटूक स्ट्रॉबेरीचे छायाचित्र विशेष शाश्वत चित्रात्मक टपाल कॅन्सलेशनवर झळकले आहे. मुंबई येथील टपाल कार्यालयात सोमवारी पार पडलेल्या एका कार्यक्रमात या कॅन्सलेशनचे अनावरण करण्यात आल्याने महाबळेश्वरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. ब्रिटिश काळापासून महाबळेश्वरात स्ट्रॉबेरीची शेती केली जात आहे. पारंपरिक शेतीला तंत्रज्ञानाची जोड दिली गेली. हायड्रोपोनिक तंत्रज्ञान विकसित झाले. … Read more

साताऱ्यात शासकीय विश्रामगृहात बॉम्बची माथेफिरूकडून अफवा; प्रशासन, पोलिसांची धावपळ

Satara News 20241206 075744 0000

गुरूवारी सायंकाळी माथेफिरूने सुरक्षारक्षकाला धमकी देत, “माझ्या अंगावर बॉम्ब आहे, हे संपूर्ण विश्रामगृह उडवून देणार,” असे सांगितले. ही माहिती मिळताच सुरक्षारक्षकाने सातारा जिल्हा पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. अवघ्या काही मिनिटांत बॉम्बशोधक व नाशक पथक, श्वानपथक, अग्निशमन दल, वाहतूक शाखा, रुग्णवाहिका आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांवर माथेफिरूने धमक्या देण्यास सुरुवात केली. “माझ्या … Read more

जिल्हास्तरीय युवा महोत्सव जल्लोषात; ‘लगान’ फेम अभिनेता अमीन हाजी यांची उपस्थिती

Satara News 10

सातारा प्रतिनिधी । जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा व नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने व यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा यांच्या सहकार्याने जिल्हास्तर युवा महोत्सव २०२४ चे दि. ४ डिसेंबर रोजी उत्साहात पार पडले. जिल्हास्तर युवा महोत्सव उद्घाटन प्रसंगी यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा चे प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव, जिल्हा क्रीडा … Read more

पांढऱ्या शुभ्र व्हायटी फुलांनी बहरले कास – कांदाटी – कोयना खोरे

Satara News 9

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील कास, कांदाटी व कोयना खोऱ्यातील परिसर सर्वत्र आकर्षक पांढऱ्या शुभ्र व्हायटी फुलाने बहरला आहे. जैवविविधता लाभलेला सातारा जिल्हा निसर्ग सौंदर्याने सजलेला जिल्हा असून जागतिक वारसा स्थळ असलेले कास पठार आहे. दरवर्षी कास व आजूबाजूचा परिसर विविध प्रकारच्या रंगीबेरंगी आकर्षक फुलांनी बहरलेला असतो. चालू वर्षी या परिसरात एक सुंदर फुलांचा आविष्कार … Read more