कार अपघातात महिला ठार, पाचजण जखमी; गुरु पौर्णिमेनिमित्त देवदर्शन करुन परतताना घडली दुर्दैवी घटना

Karad Accident News

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील ओंड गावच्या हद्दीतील एका पेट्रोल पंपाजवळ झालेल्या अपघातात एक महिला ठार तर पाच जण जखमी झाले. जखमींना येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची घटना रविवारी गुरु पौर्णिमेदिवशी घडली. देवदर्शनासाठी गुरु पौर्णिमेनिमित्त नाणीज या ठिकाणी कामोठे मुंबई येथील भोसले व मोरे कुटुंबीय आले होते. देवदर्शन घेतल्यानंतर ते पार निघाले असताना … Read more

वांग नदीच्या पाणी पातळीत वाढ; NDRF च्या पथकाकडून आणेगावातील नदीकाठावरील ग्रामस्थांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर

Karad News

कराड प्रतिनिधी । दोन दिवस मुसळधार पावसाने कराड तालुक्यात चांगलेच झोडपून काढले. रात्रीदिवस पडत असलेल्या पावसामुळे कराड तालुकयातील वांग नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे आणेगावाला जोडणारा पूल रविवारी रात्री पाण्याखाली गेला. दरम्यान, याठिकाणी एनडीआरएफचे पथक दाखल होत या पथकाने गावातील तरुणांसोबत नदीकाठी असलेल्या घरातील ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलवले. यावेळी एडीआरएफ पथकातील जवानांसोबत गावच्या पोलीस पाटील सुनीता पाटील, … Read more

सडावाघापूर धबधब्याजवळ हुल्लडबाजांवर उंब्रज पोलिसांची कारवाई; 20 हजार दंड वसूल

Patan News 17

पाटण प्रतिनिधी । पाटण तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने तालुक्यातील धबधबे प्रवाहित झाले आहेत. या ठिकाणी धबधबे पाहण्यासाठो मोठ्या संख्येने पर्यटक येत आहे. मात्र, यामध्ये युवकांकडून हुल्लडबाजी करण्याचे प्रकार केले जात असून अशा हुल्लडबाजांवर पोलिसांकडून धडक कारवाई केली जात आहे. दरम्यान, सडावाघापूर मार्गावर वाहतुकीचे नियम मोडून हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर उंब्रज पोलिसांकडून कारवाई बडगा उगारण्यात आला. … Read more

आबईचीवाडीमध्ये मद्यपी कारचालकाने दुचाकीस्वारास उडवले; एक ठार, एक गंभीर जखमी

Accident News 1

कराड प्रतिनिधी । सुसाट मद्यधुंद कारचालकाने कारने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एक युवक जागीच ठार झाला. तर अन्य एक युवक गंभीर जखमी झाला असल्याची घटना कराड तालुक्यातील आबईचीवाडी गावच्या हद्दीत कराड – पाटण मार्गावर शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. आबईचीवाडी येथे दुचाकीस्वाराला धडक देऊन मद्यधुंद चालक त्याठिकाणी न थांबता तो … Read more

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा धुमाकूळ, चोवीस तासात 657 मिलीमीटर पावसाची नोंद

Haviy Rain News

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने हाहाकार उडवलाय. संततधार पावसामुळं महाबळेश्वर परिसरातील जनजीवन विस्कळीत झालंय. बिरमणी – महाबळेश्वरकडे जाणारा पूल पाण्याखाली गेला आहे. दरम्यान, चोवीस तासात कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात ६ टीएमसीनं वाढ झाली आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात तसंच कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने धुमाकूळ घातलाय. पाणलोट क्षेत्रातील कोयना, नवजा आणि महाबळेश्वर येथे … Read more

लोणंद-शिरवळ मार्गावर भरधाव कारने दुचाकीस्वाराला चिरडलं, युवकाचा जागीच मृत्यू

Crime News 20240722 091544 0000

सातारा प्रतिनिधी | लोणंद-शिरवळ रोडवरील गोळेगाव फाट्याजवळ भरधाव कार चालकाने चिरडल्याने गंभीर जखमी होऊन दुचाकीस्वार दत्तात्रय कराडे याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, लोणंद एमआयडीसी जवळील गोळेगाव फाट्याजवळ दत्तात्रय गोपाळ कराडे (वय २७, रा. कराडवाडी ता. खंडाळा) हा आपल्या दूचाकीवरून (एमएच ११ डी. के. ३७०) लोणंदच्या दिशेने जात असताना भरधाव … Read more

सोन्याच्या लिलावात गुंतवणुकीच्या आमिषाने तिघांनी ‘त्याला’ 2 कोटी 27 लाखांना घातला गंडा

Crime News 20240722 081754 0000

सातारा प्रतिनिधी | सोन्याच्या लिलावामध्ये खरेदी-विक्रीत गुंतवणूक करण्यास सांगून एकाची तब्बल २ कोटी २७ लाख ९५ हजारांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. गिरीश पाटील, सचिन जाधव (रा. आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली), मयूर मारुती फडके (रा. जुना वारजे, कर्वेनगर, पुणे), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. संतोष … Read more

कास तलावाच्या पाणीसाठ्यात झाली वाढ; सातारा शहरातील पाणी कपातीबाबत मोठा निर्णय

Kas News 1

सातारा प्रतिनिधी । सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास आणि उरमोडी येथील पाणीसाठा तीव्र उन्हामुळे खालावल्‍याने पालिकेने या दोन्‍ही योजनांवरील पाणीपुरवठ्यात कपात केली होती. सुमारे दोन महिन्‍यांहून अधिक काळ ही कपात साताऱ्यात सुरू होती. गेल्‍या काही दिवसांपासून शहरासह परिसरात आणि कास तलाव तसेच उरमोडी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे येथील पाणीसाठ्यात वाढ झाली … Read more

मुसळधार पावसामुळे कोयना धरणातील पाणीसाठ्यात वाढ; ‘इतका’ टीएमसी झाला पाणीसाठा

Patan News 16

पाटण प्रतिनिधी । कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु पडत असून जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होऊ लागली आहे. दरम्यान, कोयना धरण क्षेत्रासह जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात पाऊस सुरु असून कोयनेच्या जल साठ्यात देखील चांगली वाढ झाली आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजता आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणात 56.83 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून धरण 54.00 टक्के … Read more

ऐतिहासिक वाघनखे पाहण्यासाठी पावसातही सातारकरांची गर्दी

Satara News 79

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरात मोठ्या थाटामाटात मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात लंडनच्या म्युझियममध्ये ठेवण्यात आलेल्या वाघ नखांच्या प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. उदघाटनानंतर प्रदर्शन कालपासून खुले करण्यात आले असून काळ शनिवार आणि आज रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने सातारकरांनी मोठ्या संख्येने प्रदर्शन पाहण्यासाठी भेट दिली. इतर शिवकालीन वस्तू पाहण्यासाठी विद्यार्थी व … Read more

राज्यातील MBBS म्हणजेच महागाई, बेरोजगारीसह भ्रष्टाचारी सरकारला हद्दपार करण्याची गरज : सुप्रिया सुळे

Karad News 38

कराड प्रतिनिधी । विधानसभेची निवडणूक महत्त्वाची असून ती जिंकण्यासाठी नव्हे तर सत्ता बदलासाठी महत्त्वाची आहे. सध्या महाराष्ट्र गुंतवणूक, उद्योगात एक नंबरला दिसत नाही हे दुर्दैव आहे. मात्र, यावेळी महाविकास आघाडी सरकार बदलणार आहे. या एमबीबीएस म्हणजेच महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचारी सरकारला महाराष्ट्रातून हद्दपार करुन पारदर्शक, भ्रष्ट्राचार मुक्त महाराष्ट्र करण्याची गरज असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी … Read more

सातारा-कराड मार्गावर बँजो पार्टीच्या टेम्पोला आयशरची भीषण धडक; अपघातात सहाजण जखमी

Karad News 37

कराड प्रतिनिधी । सातारा ते कराड मार्गावर गोटे गावच्या हद्दीत रस्त्याकडेला उभ्या असलेल्या बँजो पार्टीच्या टेम्पोला आयशर गाडीने पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, या धडकेत बॅन्जो पार्टीचा टेम्पो रस्त्याकडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन पलटी झाला. या अपघातात टेम्पोतील पाचजण जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती … Read more