कराडात 36 जणांवर पोलिसांची कारवाई; 5 दुचाकीसह 3 लाख 80 हजाराचा मुद्देमाल जप्त

Crime News 20241011 202510 0000

कराड प्रतिनिधी | कराड शहर परिसरात सुरु असलेल्या अवैध धंद्यावर गुरुवारी सायंकाळी डीवायएसपी पथकाने छापा टाकला. यामध्ये 36 जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून जुगाराचे साहित्यासह सुमारे तीन लाख 80 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध व्यवसायाविरोधात कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक समीर शेख, … Read more

कराड उत्तरमध्ये एकाच व्यक्तीची तब्बल 462 बोगस ऑनलाईन अर्जांद्वारे मतदार नोंदणी, संशयित पोलिसांच्या ताब्यात

Karad News 20241009 063131 0000

कराड प्रतिनिधी | गुगलवर आधार क्रमांक शोधून एकाच महिलेने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सुमारे ३० अर्ज केल्याची घटना साताऱ्यातील वडूजमधून समोर आली होती. आता मतदार नोंदणीत असाच प्रकार उघडकीस आला आहे. कराड उत्तर विधानसभा मतदार संघात वीज देयकात खाडाखोड करून एकाच व्यक्तीने तब्बल ४६२ ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. याप्रकरणी निवडणूक शाखेने गुन्हा दाखल केला … Read more

कराडात रिक्षांना आता ‘क्यूआर कोड’; महिला, युवतींना मिळणार रिक्षाची माहिती

Karad News 41

कराड प्रतिनिधी । कराड येथील उपविभागीय कार्यालयात महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा पोलिस दलाकडून रिक्षांवर क्यूआर कोड बसवण्यात आले. पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर, पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या हस्ते नुकताच रिक्षांना क्यूआर कोड बसवण्यास प्रारंभ करण्यात आला. कराड येथील उपविभागीय कार्यालयात प्राथमिक स्वरूपात काही रिक्षांवर क्यूआर कोड बसवण्यात आले. याप्रसंगी पोलिस … Read more

विद्यानगरमध्ये मद्यधुंद युवकांची कॉलेजसमोर हुल्लडबाजी; पोलिसांनी पाठलाग करून दारूच्या बाटल्यासह पकडले

Karad Crime News 20240925 124617 0000

कराड प्रतिनिधी । सध्या कराडच्या महाविद्यालय परिसरात युवकांकडून हुल्लडबाजी करण्याचे प्रकार चांगलेच वाढले आहेत. दरम्यान, काही मद्यधुंद युवकांनी विद्यानगर येथील एका विद्यालयाच्या आवारात कार घालून हुल्लडबाजी केल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला. पोलिस पोहोचल्यानंतर त्यांनी तेथून कारसह पळ काढला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून या युवकांना ताब्यात घेतले. याबाबत अधिक माहिती अशी की, विद्यानगर परिसरात मंगळवारी दुपारी … Read more

ऊसतोड मजूर पुरवण्याच्या नावाखाली अकरा लाखांची फसवणूक

Karad Crime News 20240924 111956 0000

कराड प्रतिनिधी | दोन ट्रॅक्टर मालकांची ऊसतोड मजूर पुरविण्याच्या नावाखाली मुकादमाने अकरा लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी मुकादामावर कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवे मालखेड, ता. कराड येथील ट्रॅक्टर मालक शशिकांत सुभाष मारे यांनी दिलेल्या फिर्यादिवरून अनिल बंडू धोत्रे (रा. ताकरवन, ता. माजलगाव, जि. बीड) या मुकादमावर गुन्हा दाखल झाला … Read more

उधारीच्या पैशावरून ‘त्यानं’ काढला ‘त्याचा’ कायमचा काटा!

Crime News 20240924 080353 0000

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील कुसूर गावात राहणाऱ्या शिवाजी लक्ष्मण सावंत यांचा 5 सप्टेंबरला संशयास्पदरित्या मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केला असता पोलिस चौकशीत पशुखाद्याच्या उधारीवरून खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी एका संशयिताला गजाआड केले असून दिलीप लक्ष्मण कराळे असे त्याचे नाव असून सोमवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांनी … Read more

कराडात क्रूरपणे डांबून ठेवलेल्या 21 जनावरांची सुटका; एकावर गुन्हा दाखल

Karad News 20240921 052457 0000

कराड प्रतिनिधी | कत्तल करण्याच्या उद्देशाने क्रूरपणे डांबून ठेवलेल्या २१ जनावरांची पोलिसांच्या मदतीने सुटका करण्यात आली. कराड येथील बाजार समिती आवारात असलेल्या एका शेडमध्ये छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. याबाबत प्रतीक आप्पासाहेब ननावरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुलाम हाजी व्यापारी (रा. सदर बाजार, सातारा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कराडमधील बाजार समिती आवारात असलेल्या … Read more

कराड तालुक्यातील गोळेश्वरमध्ये युवकावर कोयत्याने वार

Crime News 20240911 082004 0000

कराड प्रतिनिधी | “न्यायालयात दाखल खटला मागे घे,” असे म्हणत एका युवकावर दोघांनी कोयत्याने वार केल्याची घटना कराड तालुक्यातील गोळेश्वर गावात घडली. याप्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनाजी सत्यवान अदलिंगे (वय 30, रा. गोळेश्वर) असे जखमी युवकाचे नाव आहे. तुकाराम सुभाष माळी (रा. गोळेश्वर) व गणपती नागनाथ माळी (रा. … Read more

कराड तालुक्यात ‘इतक्या’ गावात यंदा ‘नो DJ अन् Dolby’

Karad News 20240904 201948 0000

कराड प्रतिनिधी | गणेशोत्सव येत्या काही दिवसांमध्ये ठेपला असल्याने त्याची सर्वत्र तयारी केली जात आहे. उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासन खबरदारी घेत असते. यंदा ही खबरदारीच्या उपाययोजनांबाबत सूचना देण्यासाठी कराड तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पोलिसांनी सूचना केल्या. त्यामध्ये डॉल्बी, डिजे न वापरण्याबाबत सूचना केल्या. यावेळी कराड तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस … Read more

कराड शहर हद्दीतून गहाळ झालेले 26 मोबाईल पोलिसांनी केले विविध राज्यातून हस्तगत, मूळ तक्रारदारांना दिले परत

Karad News 20240829 221942 0000

कराड प्रतिनिधी | कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गहाळ झालेले ५ लाख रुपये किमतीचे २६ मोबाईल कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने महाराष्ट्र तसेच इतर विविध राज्यातून हस्तगत केले. आज मूळ तक्रारदारांना ते मोबाईल परत करण्यात आले. पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड अमोल ठाकूर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक कराड शहर के. एन. … Read more

कराडच्या शुक्रवार पेठेतून प्रतिबंधित विमल, रजनीगंधा गुटख्यासह पावणे 5 लाखाचा मुद्देमाल जप्त

Karad Crime News 20240817 070215 0000

कराड प्रतिनिधी | विमल आणि रजनीगंधा गुटख्याची चोरटी वाहतूक करण्याच्या इराद्याने आलेल्या संशयिताला पाठलाग करून पोलिसांनी पकडले. त्याच्या कारची झडती घेतली असता कारमध्ये विमल आणि रजनीगंधा गुटखा आढळून आला. याप्रकरणी ४ लाखांचा गुटखा आणि कार, असा पावणे पाच लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. अवैध गुटख्याची चोरटी वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांची माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश … Read more

भिंतीलगत कागद जाळल्याने केली मारहाण; तिघा जणांना अटक

Crime News 20240814 091454 0000

कराड प्रतिनिधी | कागद जाळल्याच्या कारणावरून पती- पत्नीला तिघांनी मारहाण केल्याची घटना मलकापूर-आगाशिवनगर येथील इंद्रप्रस्थ कॉलनीत सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी गुन्ह्यातील तिन्ही संशयितांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. याबाबत प्रदीप पांडुरंग पवार (रा. चचेगाव, ता. कराड) यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सर्फराज … Read more