राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांचा राजीनामा, अध्यक्षांना पाठवलं पत्र

Satara News 7 jpg

सातारा प्रतिनिधी । राज्यात आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे यांनी 24 डिसेंबरचा अल्टिमेटम दिल्यानंतर आरक्षण देण्यासाठी विविध पातळ्यांवर काम सुरु केले आहे. साताऱ्यात स्वागत सभेतून जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला देखील इशारा दिला आहे. त्यांच्या सातारा येथील इशाऱ्यानंतर त्यांना विविध संघटनाकडून पाठींबा दिला जात आहे. दर,दरम्यान, राज्य मागासवर्गीय आयोगाकडूनही मराठा समाजाचे … Read more

साताऱ्यात 2 ठिकाणी घरफोडी करत चोरटयांकडून 1 लाख 62 हजारांचा ऐवज लंपास

Satara Police News 20231117 083635 0000 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरातील सध्या चोरी, घरफोडीचे प्रमाण वाढत आहे. नुकतेच सातारा शहरातील दोन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत 1 लाख 62 हजाराचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा शहरातील फुटका तलाव परिसरात अज्ञात चोरट्यानी घरफोडी केली. घरातून चोरट्यांनी सोन्याचे मंगळसूत्र, … Read more

पोगरवाडीमध्ये पार पडले 25 गाई, म्हशींवरील उपचार शिबीर

Satara News 6 jpg

कराड प्रतिनिधी । राज्यव्यापी वंध्यत्व निवारण अभियानांतर्गत सातारा जिल्ह्यात वंध्यत्व निवारण शिबिर घेतले जात आहे. दरम्यान, पोगरवाडी, ता. सातारा येथे वंध्यत्व निवारण शिबिरात 25 गाई, म्हशींवर उपचार करण्यात आले. यावेळी गाईंवर कृत्रिम रेतन करण्यात आले. या शिबिरास पशुपालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद व पंचायत समिती सातारा आणि पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक परळी … Read more

खंडाळ्यातील रास्तारोको प्रकरणी 200 आंदोलकांवर गुन्हा

Crime News 20231204 101806 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | आरक्षणाच्या मागणीसाठी सकल धनगर समाजातर्फे सातारा जिल्हयातील खंडाळा येथे दि. 1 रोजी मोर्चा काढून पुणे बंगळुर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. या प्रकरणी आता 200 हून अधिक आंदोलकांवर पोलीसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पोलिसांनी दिलेले आदेश न मानता आणि जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन करून … Read more

पाटणमध्ये 40 वर्षाच्या व्यक्तीची धारदार शस्त्राने वार करून हत्या; स्मशानभूमीत आढळला मृतदेह

Crime News 20231203 221749 0000 jpg

पाटण प्रतिनिधी | कराडमध्ये कार्वे नाका येथील भर चौकात शस्त्राने सपासप वार करून तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच पाटणमध्येही एकाचा अज्ञाताने शस्त्राने वार करून खून केल्याची घटना समोर आली आहे. प्रकाश परशुराम पवार (मानेवाडी, सातारा), असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पाटणमध्ये ही थरारक घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. खून झाल्यानंतर संबधित व्यक्तीचा … Read more

उदयनराजेंना पुन्हा राष्ट्रवादीत घेणार का? खा. शरद पवारांनी दिलं ‘हे’ भन्नाट उत्तर

Sharad Pawar News jpg

सातारा प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी आज सातारा येथे काही कार्यक्रमांना उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी माध्यमांशीसंवाद साधत अनेक राजकीय घडामोडीवर प्रतिक्रिया दिली. मात्र, यावेळी पत्रकारांनी त्यांना एक महत्वाचा प्रश्न विचारला तो म्हणजे उदयनराजे भोसले याचं मन भाजप आणि कुठं कुठं लागत नाही, त्यांना तुमच्या राष्ट्रवादीत घेणार का? पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला … Read more

“सत्तेच्या माध्यमातून माझे राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न,पण…; माजी मंत्री शशिकांत शिंदे स्पष्टच बोलले

Shashikant Shinde News jpg

सातारा प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार शरद पवार हे आज सातारा जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधत. यावेळी त्यांच्यासोबत खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री शशिकांत शिंदे उपस्थित होते. पवारांच्या पत्रकार पत्रकार परिषदेनंतर माजी मंत्री शिंदे यांनी त्यांच्यावर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील कथित शाैचालय घोटाळ्या प्रकरणी करण्यात आलेल्या आरोपावर आपली भूमिका मंडळी. … Read more

ट्रकला ओव्हरटेक करण्यासाठी ‘तिने’ दुचाकीचा वेग वाढवला; पुढं घडलं असं काही…

Satara News 3 jpg

सातारा प्रतिनिधी । दुचाकी चालवताना नेहमी सावधपणे चालवावी, वेगावर नियंत्रण ठेवावे, अशा सूचना पोलिसांकडून केल्या जातात. मात्र, पुढे निघालेल्या गाडीला ओव्हरटेक करण्याच्या नादात आपण घेतलेला निर्णय हा आपल्या जीवाशी येतो याचा प्रत्यय आज पहायला मिळाला. सातारा – कोरेगाव रस्त्यावर संगमनगर जवळ ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रकच्या पुढील चाकाखाली सापडून एका १९ वर्षीय तरूणीचा जागीच मृत्यू … Read more

युवकाच्या खून प्रकरणी आणखी दोघांना अटक; 5 दिवस पोलीस कोठडी

Crime News 2 jpg

कराड प्रतिनिधी । कराड येथील कार्वेनाका परिसरात पूर्वीच्या झालेल्या वादाचा राग मनात धरून शनिवारी भरदिवसा वडोली निळेश्वर येथील युवकावर चाकूने वार करून त्याचा खून केल्याची घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी तिघा जणांना अटक केली असून त्यांना आज न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. मुबिन पैगंबर इनामदार (रा. कार्वेनाका, कराड), रिझवान गौस शेख … Read more

सातारा जिल्ह्यातील ‘ही’ 7 आरोग्य केंद्रे होणार ‘सुमन संस्था’

Satara News 1 jpg

कराड प्रतिनिधी । सुरक्षित मातृत्व आश्वासन कार्यक्रमामध्ये माता व बालकांना गुणात्मक सेवा उपलब्ध करून देण्याची हमी देण्यात आलेली आहे. सुमन कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील 600 संस्थांची सुमन संस्था म्हणून निवड केली आहे. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील 7 प्राथमिक आरोग्य केंद्राची निवड करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील लिंब (ता. सातारा), मल्हारपेठ (ता. पाटण), म्हसवड (ता. माण), पुसेसावळी (ता. खटाव), … Read more

खून करून ‘तो’ शेतात लपला; पोलिसांनी मध्यरात्रीच उचलला…

Karad City Police

कराड प्रतिनिधी । कराड येथील कार्वेनाका परिसरात शनिवारी भरदिवसा दुपारी युवकावर शस्त्राने वार करुन त्याचा खून केल्याची घटना घडली होती. हल्ल्यानंतर संशयित आरोपी हा फरार झाला होता. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होतो. दरम्यान, कराड शहर गुन्हे प्रकटीकरण व डीवायएसपींच्या पथकाने रात्री २ वाजण्याच्या सुमारास मलकापूर येथून संशयितास ताब्यात घेऊन अटक केली. शुभम रविंद्र चव्हाण … Read more

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबांच्या प्रयत्नातून ‘या’ गावासाठी 4 कोटी 22 लाखाचा निधी मंजूर

Karad News 3 jpg

कराड प्रतिनिधी । कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून जल जीवन मिशन अंतर्गत कार्वे गावातील गोपाळनगर व वाढीव वस्तीसाठी ३ लाख लिटर क्षमतेची पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर झाली असून ४ कोटी २२ लाख रुपयांचा निधी यासाठी मंजूर झाला आहे. याबाबतचे मंजुरी पत्र कार्वे गावचे माजी सरपंच वैभव थोरात, ग्रामपंचायत … Read more