राष्ट्रध्वजाचा अपमान प्रकरणी केसुर्डीतील कंपनी व्यवस्थापकांसह दोघांना न्यायालयाने ठरवले दोषी

Crime News 20241002 074207 0000

सातारा प्रतिनिधी | खंडाळा तालुक्यातील केसुर्डी येथील थरमँक्स बँबकाँन्स विलकाँक्स या आंतरराष्ट्रीय कंपनीमधील एका कार्यक्रमात राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी कंपनीच्या व्यवस्थापकासह दोघांना खंडाळा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवले. तर प्रत्येकी पन्नास हजार रुपये दंड व दंड न भरल्यास आठ दिवस साधी कैद सुनावली. केसुर्डी येथे थरमँक्स बँबकाँन्स विलकाँक्स ही आंतरराष्ट्रीय कंपनी आहे. ३ मार्च … Read more

पाडेगावात वसतिगृहातील खिडकीला दोरी बांधून 11 वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

Crime News 20240927 101915 0000

सातारा प्रतिनिधी | खंडाळा तालुक्यातील पाडेगाव येथील समता कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता ११ वीतील विद्यार्थ्यांने वसतिगृहातील खिडकीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास घडली. देवराज प्रशांत धोतरे (वय १६, रा. अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे त्याचे नाव आहे. दरम्यान, त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. याबाबत लोणंद पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पाडेगाव (ता. … Read more

सुट्टीवरून कॉलेजला जाताना ‘त्याची’ दुचाकी दुभाजकाला धडकली अन् पुढं घडलं विपरीत…

Crime News 20240924 092432 0000

सातारा प्रतिनिधी | पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर भुईंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जोशी विहीर येथे भरधाव दुचाकी दुभाजकाला धडकून अपघात झाला. यामध्ये दुचाकीचालक युवकाचा मृत्यू झाला आणि या अपघातात त्याच्या पाठीमागे बसलेला मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची नोंद पोलिस ठाण्यात झाली असून पीयूष प्रशांत कोरे (वय 21) असे ठार … Read more

खंडाळ्यात ट्रकची 10 वाहनांना भीषण धडक, गाड्यांचा चक्काचूर, 12 प्रवासी जखमी

Accident News 20240922 191244 0000

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर जुन्या टोल नाका भागात सर्व्हिस रस्त्यावर माल ट्रकने 10 वाहनांना भीषण धडक दिल्याची घटना आज दुपारी घडली. ट्रकची धडक इतकी भीषण होती की, आठ ते दहा वाहनाचा चक्काचूर झाला असून यातील सुमारे १२ प्रवासी जखमी झाले आहेत. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. याबाबत घटनस्थळावरून … Read more

खंडाळा तालुक्यात 4 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार; दोघांनी घराच्या टेरेसवर नेलं अन्

Satara News 20240919 113846 0000

सातारा प्रतिनिधी | शिरवळ पोलिस ठाणे हद्दीतील खंडाळा तालुक्यातील एका गावात एका चार वर्षीय बालिकेवर अत्याचाराची धक्कादायक रविवारी घटना घडली आहे. याप्रकरणी शिरवळ पोलिसांनी दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. याबाबत माहिती अशी, की खंडाळा तालुक्यातील शिरवळ पोलिस ठाणे हद्दीतील एका गावात पीडित मुलगी व दोघे संशयित घराच्या टेरेसवर खेळत होते. रात्रीच्या सुमारास पीडित मुलगी … Read more

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून 80 लाखाचा केला अपहार; 4 संशयितांना अटक

Crime News 20240803 091337 0000

सातारा प्रतिनिधी | शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून जवळपास ऐंशी लाख रुपयांचा अपहार झाल्याबाबतची तक्रार खंडाळा पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. याप्रकरणी सर्व संशयित आरोपींना खंडाळा पोलिसांनी मुंबई, मनमाड, संभाजीनगर या ठिकाणाहून ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी भीमसेन भालेराव, चित्रसेन भालेराव, मयूर व्यवहारे, जैन राहुल पालवे या सर्व संशयिताना न्यायालयाने पाच तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. … Read more

कराड, शिरवळमधील सराईत गुन्हेगारांच्या 2 टोळ्यांवर कारवाई, सहाजण दोन वर्षांसाठी तडीपार

Crime News 20240802 124430 0000

सातारा प्रतिनिधी | सातत्याने गुन्हे करणाऱ्या कराड आणि शिरवळमधील ६ जणांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलं आहे. यामध्ये कराडमधील ४ आणि शिरवळमधील २ जणांचा समावेश आहे. कराड मधील चौघांना संपूर्ण सातारा जिल्हा आणि सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, कडेगाव तर शिरवळ मधील दोघांना सातारा, पुणे व सोलापुर या तीन जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता तडीपार करण्यात आले आहे. … Read more

शेतात तुटलेल्या वीज तारेच्या धक्क्याने शेतकरी महिला जागीच ठार

Khandala News 20240715 074302 0000

सातारा प्रतिनिधी | खंडाळा तालुक्यातील गुठाळवाडी येथे तुटलेल्या विद्युत वाहक तारेने शेतकरी महिलेचा बळी घेतला आहे. शेतातील काम संपवून घरी निघालेल्या महिलेचा तुटलेल्या तारेमुळे विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला. पार्वती यशवंत महांगरे (वय 60, रा. गुठाळवाडी ता. खंडाळा) असे मृत शेतकरी महिलेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पार्वती व त्यांचे पती हे … Read more

पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात ऑईल सांडले; पुन्हा वाहतूक विस्कळीत

Khambatki Ghat News

सातारा प्रतिनिधी । पुणे – सातारा महामार्गावरील वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा घाट म्हणून खंबाटकी घाटाकडे पाहिले जाते. मात्र, घाटात वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत असते. आज खंबाटकी घाटात पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास महामार्गाच्या रस्त्यावर ऑइल सांडल्याची घटना घडली. त्यामुळे अनेक वाहनांची घसरगुंडी झाली. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही ऑईलमुळे गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले. शनिवार आणि … Read more

मुलीशी झालेल्या वादातून युवकाला विवस्त्र करून चामडी पट्ट्याने जबर मारहाण, खंडाळ्यातील खळबळजनक घटना

Crime News 20240712 220840 0000

सातारा प्रतिनिधी | मुलीशी वाद झाल्याच्या कारणातून दोन अज्ञातांनी खंडाळ्यातील युवकास नग्न करून चामडी पट्टा आणि निरगुडीच्या काठीने जबर मारहाण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. तसेच या घटनेचं संशयितांनी चित्रीकरणही केलं आहे. जखमी युवकावर साताऱ्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दीपक मोहन वायदंडे (रा. खंडाळा), असं जखमी युवकांचं नाव असून याप्रकरणी दोन अज्ञातांवर खंडाळा … Read more

पैसे दुप्पट करून देतो असे सांगत नागरिकांची सुमारे 31 लाखांची फसवणूक करणाऱ्या सराफ दांपत्यास अटक

Crime News 20240620 110711 0000

सातारा प्रतिनिधी | पैसे दुप्पट करून देतो असे आमिष दाखवून खंडाळा तालुक्यातील नागरिकांची सुमारे ३१ लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी वाईतील वैभव गोल्ड अँड ज्वेलर्सचा मालक वैभव भास्कर धामणकर व त्याची पत्नी नीलम यांना खंडाळा पोलिसांनी अटक केली. याबाबत अधिक माहिती अशी की, वाईतील वैभव गोल्ड अँड ज्वेलर्सच्या दाम्पत्य विरोधात फसवणूकीची तक्रार दाखल झाल्यापासून खंडाळा … Read more

खंबाटकी घाटात लक्झरी बस लुटायचा होता प्लॅन, मोक्याच्या क्षणी एन्ट्री मारून पोलिसांनी चौघांना केलं जेरबंद

Crime News 20240615 210204 0000

सातारा प्रतिनिधी | खंबाटकी घाटात लक्झरी बस लुटायच्या प्रयत्नात असणाऱ्या चौघांना जेरबंद करून दरोड्याचा मोठा डाव भुईंज पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने उधळून लावला. संतोष बाळासाहेब चव्हाण, अक्षय दत्तात्रय शितोळे, योगेश आनंदा वाळुंज (सर्व रा. शिंदोडी, ता. शिरुर, जि. पुणे), सिध्दांत यशवंत कांबळे वय ३१ (रा. निमोने, ता. शिरुर जि.पुणे), अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची … Read more