रहिमतपूरच्या आठवडी बाजारात पालिकेची धडक कारवाई; 50 किलो प्लॅस्टिकच्या पिशव्या जप्त

Palika News jpg

सातारा प्रतिनिधी । कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर नगरपालिकेच्या वतीने गुरुवारी दि. 28 रोजी आठवडी बाजारात कारवाई करण्यात आली. यावेळी पालिका कर्मचाऱ्यांनी प्लॅस्टिकच्या पिशव्या वापर व विक्री करत असलेल्या व्यावसायिक तसेच बेकरी व्यावसायिक, प्लास्टिकचा वापर करणाऱ्या भाजी विक्रेते, फळ विक्रेते, चिकन मटण दुकानवाले, मासे मासळी विक्रेते, मसाले विक्रेते यांना भेटी दिल्या. त्यांच्याजवळ असलेल्या प्लॅस्टिक पिशव्या तसेच वापर … Read more

गावकऱ्यांच्या आयुष्यात परिवर्तन आणण्याचे केंद्र शासनाचे काम : अजय कुमार मिश्रा

Satara News 49 jpg

सातारा प्रतिनिधी । विकसित भारत यात्रेचे ग्रामीण भागात आयोजन केले जात आहे. या यात्रेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचे काम केंद्र शासन करत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी केले. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील विडणी येथे विकसित भारत संकल्प यात्रेचा शनिवारी कार्यक्रम पार पडला. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक … Read more

महायुतीतील जागा वाटपबाबत जो काही निर्णय घ्यायचा आहे तो…: चंद्रकांतदादा पाटील

Satara News 48 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सातारला शनिवारी आले होते. यावेळी त्यांनी शासकीय मेडिकल कॉलेजला भेट दिली यावेळी त्यांनी महायुतीतील जागा वाटपाबाबत तिन्ही पक्षातील वरिष्ठ स्तरावर निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया दिली. यावेळी साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, सचिव विकास देशमुख यांच्यासह भाजपच्या पदाधिकारी … Read more

साताऱ्यात पोलिसांच्या तावडीतून दुचाकी चोर पळाला; पुढं घडलं असं काही…

Satara News 47 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात एका गुन्ह्यात काल अटक केलेल्या एका आरोपीस न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, न्यायाधीशांना भेटवून परत पोलीस ठाण्याकडे घेऊन जात असताना दोन पोलीस शिपायांच्या तावडीतून दुचाकी चोरटा पळून गेला. हा प्रकार शनिवारी घडल्यानंतर पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांची तपास पथके वेगवेगळ्या दिशेला चोरट्याला पकडण्यासाठी पाठविण्यात आली आहेत. … Read more

शरद पवारांनी बोलावलेल्या ‘त्या’ बैठकीबाबत वळसे पाटलांनी साताऱ्यात दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Satara News 46 jpg

सातारा प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आता फूट पडली असली तरी खासदार शरद पवारांनी बोलावलेल्या अध्यक्षपदाच्या बैठकीत नेमकं काय घडलं? आणि पवार साहेब अजितदादांना काय म्हणाले? यासह अनेक प्रश्न अजूनही जनतेत सुरु आहरेत. दरम्यान, अध्यक्षपदाच्या निवडीवेळी नेमकं काय घडलं? पवार साहेबांच्या मनात काय होते? यासह बैठकीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे नेते सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील … Read more

15 कारखान्यांनी केली 30 लाख 70 हजार क्विंटल साखर उत्पादीत

Satara News 45 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा हा ऊस उत्पादनात अग्रेसर असा जिल्हा आहे. दरवर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्याकडून मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादन घेतले जाते. दरम्यान, यंदा ऊस गळीत हंगामाने गती घेतली असून आतापर्यंत जिल्ह्यातील सर्व 15 कारखान्यांनी मिळून 34,63,057 टन उसाचे गाळप केले आहे. कारखान्यांनी 30,70,340 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा 8.83 टक्के आहे. … Read more

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून दुचाकी चोरीचा गुन्हा उघड; एकास अटक

Crime News 22 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरात वाढत असलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांमागील चोरटयांना अटक करण्याचे आव्हान पोलिसांपुढे असताना शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि. 21 डिसेंबर रोजी दुचाकी चोरीची घटना घडली होती. यानंतर पोलिसांनी या चोरीचा अधिक तपास करत एकास अटक केली. चैतन्य अशोक मते (रा. 385 सोमवार पेठ, सातारा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून … Read more

जादा परताव्याच्या आमिषाने 5 जणांना 30 लाखांचा गंडा; एकावर गुन्हा

Crime News 21 jpg

कराड प्रतिनिधी । कराड शहरात पैशांचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्यांची संख्या चांगलीच वाढली आहे. महिन्यात एखादी दर तक्रार पोलीस ठाण्यात दाखल होते हे नक्की. अशीच एक टँकर कराड शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. चांगला परतावा देण्याच्या आमिषाने पाच जणांची तब्बल 30 लाख रुपयांची फसवणूक करण्यात असल्याची घटना कराड शहरात घडली आहे. या प्रकरणी कराड … Read more

कृषी कार्यालय फोडणाऱ्या दोघा चोरट्यांना पोलिसांकडून अटक; 5 लाखांचा माल केला हस्तगत

Crime News 20 jpg

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील सैदापूर येथील कृषी मंडल अधिकाऱ्याचे कार्यालय फोडून ५ लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना मंगळवारी घडली होती. या घटनेनंतर संबंधित चोरट्यांचा शोध घेत कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री दोघा चोरट्यांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून पाच लाखाचा मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत केली. अखिलेश सूरज नलवडे … Read more

बनावट सोने तारण ठेऊन 39 लाखांचा अपहार, कराडात फायनान्स कंपनीची फसवणूक

Crime News 18 jpg

कराड प्रतिनिधी । सध्या अनेक फायनान्स कंपनीकडून लोकांना सोने तारण कर्ज दिले जात आहेत. त्या बदल्यात त्यांच्याकडून व्याज तसेच खर्चाची मासिक हप्प्त्यापोटी ठराविक रक्कम देखील घेतली जात आहे. मात्र, असे करत काही फायनान्स कंपनीकडून फसवणूक देखील होण्याची शक्यता असते. अशीच घटना कराड शहरात घडली आहे. फायनान्स कंपनीत बनावट सोन्यावर कर्ज उचलून तसेच कर्जदारांनी कंपनीत ठेवलेले … Read more

कोटपा कायद्यांतर्गत वडूजमधील 14 टपऱ्यांवर कारवाई

Crime News 17 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा रुग्णालयांतर्गत जिल्ह्यात ठिकठिकाणी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्यावतीने (एनटीपीसी) ‘कोटपा’ कायद्यानुसार कारवी केली जात आहे. या कारवाई अंतर्गत नुकतीच वडूज येथील १४ टपऱ्यांवर धडक मोहीम राबवित ७ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरात मनाई व व्यापार वाणिज्य उत्पादन आणि नियमन) कायदा २००३ अर्थात … Read more

पुणे – बंगळुरू महामार्गावर विचित्र अपघातात 2 मालट्रकसह 5 वाहनांना धडक

Accident News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा येथे भरधाव वेगातील एका ट्रकने दोन मालट्रकसह पाच वाहनांना जोरदार धडक दिली. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मात्र अपघातात सहा वाहने व हॉटेलचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि. 29 रोजी पहाटे साडे चार वाजण्याच्या … Read more