पालकमंत्री असताना निधी देत नव्हते आता त्यांना कसा मिळणार?; BJP जिल्हाध्यक्ष कदमांचा नाव न घेता आ. बाळासाहेबांवर निशाणा

Darhysheel Kadam Pess Conference News jpg

कराड प्रतिनिधी । भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उद्या सातारा व कराड दाैऱ्यावर येत आहेत. या पार्श्ववभूमीवर माहिती देण्यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी आज कराड येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कराड उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. जेव्हा यांच्याकडे मंत्रिपद होते तेव्हा यांनी … Read more

पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बोधेगावच्या हद्दीत ट्रॅव्हल्स बसमधून तब्बल 22 लाख लंपास

Crime News

सातारा प्रतिनिधी । पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बोधेगावच्या हद्दीत एका हॉटेलवर थांबलेल्या ट्रॅव्हल्समधून तब्बल 22 लाख रुपयांची बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना नुकतीच घडली. या याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पथक तयार करण्यात आली. तसेच सीसीटिव्ही फुटेज तपासणीसह इतर माहिती घेण्याचे पोलिसांकडून काम केले जात … Read more

शेतकर्‍यांच्या पोरांचे पाय काढण्याची भाषा खपवून घेणार नाही : खा. रणजितसिंह निंबाळकरांचा इशारा

Ranjit Singh Nimbalkar News jpg

सातारा प्रतिनिधी । बापजाद्यांनी काढलेला कारखाना स्वतःमध्ये हिम्मत नसल्याने जवाहरच्या कुबड्या घेऊन चालवत आहात. कारखाना तुमच्या खाजगी मालकीचा नाही. तो शेतकर्‍यांच्या मालकीचा आहे. त्या शेतकर्‍यांच्या पोरांचे पाय काढण्याची भाषा तुम्ही कराल आणि आम्ही ते खपवून घेऊ, अशी तुमची अपेक्षा असेल तर मुळीच घेणार नाही. विश्वासराव भोसले यांच्या केसाला धक्का लावून दाखवा. फलटणची जनता तुमच्या कमरेला … Read more

कराडनजीक विजयनगरमध्ये आढळले 3 बिबटे; गावकऱ्यांनी अख्खी रात्र काढली जागून…

Crime News 20231003 093902 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यात सध्या बिबट्यांकडून रात्रीच्यावेळी मानवीवस्तीत प्रवेश केला जात आहे. कराड तालुक्यातील विजयनगर येथे डोंगरावर सोमवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास चक्क तीन बिबटे वावरताना दिसून आले. यानंतर गावात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळतच वन विभागाचे पथक गावात दाखल झाले असून बिबट्यांचा शोध घेतला जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, … Read more

अजिंक्यतारा किल्ल्यावरून उडी मारून कराडच्या महाविद्यालयातील तरूणाची आत्महत्या

Satara Crime News 20231003 082201 0000 jpg

कराड प्रतिनिधी । सातारा शहरातील अजिंक्यतारा किल्ल्यावरून उडी मारून कराड येथील महाविद्यालयातील तरूणाने आत्महत्या केल्याची घटना काल सोमवारी दुपारी घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान, सातारा येथील आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले रेस्क्यू टीमने घटनास्थळी दाखल होत मृतदेह बाहेर काढला. श्रीराज मानसिंग पाटील (वय १७) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. संबंधित मृत युवक सांगली जिल्ह्यातील … Read more

अर्धवट मृतदेह जाळलेल्या तरूणाची ओळख पटली; कर्नाटकातील तिघांचा हत्येत सहभाग, एकास अटक

Crime News 20231002 231119 0000 jpg

कराड प्रतिनिधी | पुणे-बंगळुरू महामार्गावरील एका मोरीमध्ये अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. मृताची ओळख पटली असून केशवमुर्ती आर. चिन्नाप्पा रंगास्वामी (वय ३७, रा. आरेहल्ली पो. मायासिंद्रा, ता. अनकेल, जि. बंगळुरू), असे त्याचे नाव आहे. कराड DYSP अमोल ठाकूर यांचे पथक आणि तळबीड पोलिसांनी या घटनेची उकल केली आहे. केशवमुर्तीची हत्या करून त्याचा मृतदेह जाळण्यात … Read more

सातारा जिल्ह्यातील कृष्णा प्रकल्पाच्या फेरजल नियोजनाला राज्य शासनाची मान्यता, टेंभूबाबतही लवकरच निर्णय

Jawali News 20231002 213858 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील कृष्णा प्रकल्पाच्या फेर जलनियोजनासह अनेक दुष्काळी गावातील पाणी प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्गी लावला आहे. याचाच एक भाग म्हणजे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील बोंडारवाडी प्रकल्पाला मुख्यमंत्री शिंदे यांनी मान्यता दिली. या प्रकल्पासाठी शिवसेना आमदार अनिलराव बाबर यांनी पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री शिंदे यांच्या मान्यतेनंतर शिवसेना आमदार बाबर यांच्या पाठपुराव्याला … Read more

साताऱ्यात पालकमंत्री शंभूराज देसाईंनी खासदार उदयनराजेंना वाकून घातला मुजरा; नेमकं काय घडलं?

Shambhuraj Desai Udayanraje Bhosale News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । कधी शांत तर कधी हसमुख आणि मनात आणलं तर जनतेसाठी कायपण असे म्हणत कॉलर उडवत बिनधास्त डान्स करणाऱ्या सातारच्या भाजप खासदार उदयनराजे भोसले याना सर्वचजण ओळखतात. तर याउलट उत्तम संसद पट्टू आणि शिंदे गटाचे आमदार, साताऱ्याचे पालकमंत्री म्हणून शंभूराज देसाई यांच्याकडे पाहिले जाते. मध्यंतरी दोघांच्यात काही विषयांवर वाद चालले होते. मात्र, आता … Read more

कराड तालुक्यातील तांबवे गावात पिसाळलेल्या कुत्र्याचा सहा जणांवर हल्ला

Crime News 20231002 192906 0000 jpg

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील तांबवे गाव सध्या दहशतीखाली आहे. त्याला कारण ठरलंय कारवानी जातीचं पिसाळलेलं कुत्रं. पाळीव परंतु पिसाळलेल्या या कुत्र्याने तांबवे गावातील पाच ते सहा जणांवर हल्ला करीत त्यांचा चावा घेतला. तसेच या कुत्र्याने इतर ३ भटक्या कुत्र्यांवर हल्ला करून त्यांना देखील जखमी केले आहे. जखमींमध्ये तांबवेसह परिसरातील गावातील लोकांचाही सहभाग आहे. सैरावैरा … Read more

Satara News : पाचगणी भिलार वॉटर फॉल्स पॉईंटवरून कार दरीत काेसळली; 3 जण जखमी

Accident News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील तसेच जवळपास महाबळेश्वर इतकेच उंच असलेले आणखी एक थंड हवेचे ठिकाण म्हणजे पाचगणी होय. सध्या सलग चार दिवस सुट्या लागल्यामुळे या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने फिरण्यासाठी येत आहेत. मात्र, या ठिकाणी अपघाताच्या देखील घटना घडत आहेत. अशीच घटना रविवारी घडली. पुण्याहून महाबळेश्वरला फिरण्यासाठी आलेल्या एक कुटूंबियांची कार पाचगणीच्या भिलार वॉटर … Read more

सातारा जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी; कोयना धरणाचा ‘इतका’ झाला पाणीसाठा

Koyna Dam 1

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सध्या परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असून पश्चिम भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे या भागातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत सर्वाधिक पर्जन्यमानाची महाबळेश्वरला 64 मिलीमीटरची झाली आहे. तर नवजालाही चांगला पाऊस झाला. कोयना धरणातही पाण्याची आवक वाढली असून पाणीसाठा 93 टीएमसीवर गेला आहे. … Read more

पालकमंत्री शंभूराजेंनी हाती झाडू घेत केली स्वच्छता; जनतेला देखील केलं आवाहन…

Shambhuraj Desai News jpg

पाटण प्रतिनिधी । प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था या आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत असते. परंतु आपली सुद्धा एक जबाबदार असते. प्रत्येकाने आपले घर जसे स्वच्छ ठेवतो तसे आपला गाव आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्वच्छता पंधरवड्याची संकलपना यशस्वी करण्याची जबाबदारी आपण सर्वांनी पार पाडूया, असे आवाहन पालकमंत्री … Read more