कोयना धरणातून पाण्याच्या विसर्गात वाढ; नदीने ओलांडली धोक्याची पातळी
पाटण प्रतिनिधी | कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने कोयना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर कायमच आहॆ. त्यात हवामान खात्याने सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर केला आहे. गेल्या २४ तासांत धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे ९६ नवजा येथे १३१ तर महाबळेश्वर येथे १३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. … Read more