वाईत दुसऱ्या फेरीत मकरंद पाटील तर पाटणला शंभूराज देसाई आघाडीवर

0
8
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । पाटण आणि वाई विधानसभा मतदार संघासाठी पोस्टल मतदानाची दुसरी फेरी पार पडली आहे. या फेरीत वाई मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते मकरंद पाटील यांनी 4593 मतांनी आघाडी घेतली आहे. तर पाटण विधानसभा मतदार संघात मंत्री शंभूराज देसाई यांनी देरखील आघाडी घेतली आहे.

वाई मतदार संघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार अरुणादेवी पिसाळ यांना दुसऱ्या फेरीत 13460 मते पाडली आहेत तर मकरंद पाटील यांना 18053 मते पडली आहेत. तर पाटण विधानसभा मतदार संघात एकनाथ शिंदे गटाचे आमदार शंभूराज देसाई यांनी देखील आघाडी घेतली असून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे हर्षद कदम आणि अपक्ष सत्यजित पाटणकर पिछाडीवर आहेत.

वाई विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि विद्यमान आमदार मकरंद पाटील उभे असून त्यांच्या विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ यांना निवडणूक रिंगणात उतरल्या. तर अपक्ष म्हणून पुरुषोत्तम जाधव हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अरुणादेवी पिसाळ या कै. मदनराव पिसाळ यांच्या सून असून मकरंद पाटील यांच्यापुढे त्यांचे कडवे आव्हान आहे.