सातारा जिल्ह्यातील शेतकरी संघटना BRS सोबतच : रघुनाथदादा पाटील

Raghunathdada Patil 20230806 084120 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | बीआरएस पक्षाने आपकी बार किसान सरकार…चा नारा दिला आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तन-मन-धनाने त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत केंद्र व राज्य सरकारला BRS च्या माध्यमातून उखडून टाकणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिला. सातारा येथील शासकीय विश्रामगृहामध्ये शनिवारी भारत राष्ट्रीय समितीची … Read more

हॉटेल व्यवसायिकाच्या खंडणी अन् दरोडा प्रकरणी 3 गुंडांना पोलीस कोठडी

Wai Crime News 20230806 074619 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील मेणवली, ता. वाई येथील एका हॉटेल व्यवसायिकाला तब्बल 10 लाख रुपयाच्या खंडणीची मागणी करून दरोडा टाकल्या प्रकरणी पोलिसांनी कळंबा कारागृहातून 3 मुख्य आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 2 दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. कुविख्यात गुंड अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव, (रा. भुईंज, ता. वाई) निखिल … Read more

Pune Metro : साताऱ्याची पोरीगी चालवतेय पुण्याची मेट्रो; पहा कोण आहे अपूर्वा अन् काय झालंय शिक्षण

Pune Metro

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन (Pune Metro) : पुणे मेट्रोचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी प्रारंभ झाला होता. लोकोपायलट अपूर्वा प्रमोद अलाटकर हिने मेट्रोची ‘मास्क ऑन की’ च्या साथीने सर्व तांत्रिक बाबींच्या मदतीने वनाझ येथून उद्घाटनाची फेरी पूर्ण केली. यानंतर सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते मेट्रो चालवणार्‍या अपूर्वा लाटकर या तरुणीने. पुण्यातील मेट्रोचं स्टेअरींग हातात घेणारी … Read more

कोयना धरणाचा पाणीसाठा झाला ‘इतका’ TMC

Koyana dam rain

पाटण प्रतिनिधी । कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस कोसल असल्यामुळे धरणाच्या जलाशयात हळू हळू पाण्याची भर पडत आहे. दरम्यान, शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयना धरणाचा एकूण पाणीसाठा 80.97 TMC इतका झाला असून सुमारे 76.93 टक्के इतक्या क्षमतेने धरण भरले आहे. कोयना जलाशयात दिवसभरात प्रतिसेकंद 12 हजार 447 क्युसेक पाण्याची आवक झाली असून पायथा वीजगृहातून 2 … Read more

विद्युत डीपी चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस 1 वर्षानंतर अटक

Crime News 4

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील भुईंज परिसरात एक वर्षांपूर्वी विद्युत डिपीची चोरी केल्याची घटना घडली होती. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. या घटनेतील आरोपीचा एक वर्षांपासून पोलिसांकडून शोध घेतला जात होता. दरम्यान संबंधित आरोपीस स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने आज अटक केली. जानू प्रकाश भोसले असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती … Read more

कोंबड्या खाऊन निघालेल्या मादी जातीच्या बिबट्याचा उरुल-ठोमसे रस्त्यावर मृत्यू

Patan Female Leopard News

पाटण प्रतिनिधी । पाटण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याकडून रात्रीच्यावेळी पाळीव प्राण्यांवर हल्ला केला जात असल्याच्या घटना घडत आहेत. या दरम्यान शुक्रवारी उरूल परिसरात कोंबड्यावर हल्ला करून त्यांना खाल्यानंतर निघालेल्या नऊ महिन्यांची मादी जातीच्या बिबट्याचा उरुल-ठोमसे रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. डोक्याजवळ अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यामुळे बिबट्याचा मृत्यू झाला त्यानंतर शनिवारी नवसरी येथील स्मशानभूमीत वनविभागाकडून … Read more

जिल्ह्यातील ‘या’ घाटात पहाटेच्या सुमारास कोसळली दरड; अपघाताचा वाढला धोका

Satara News 2

सातारा प्रतिनिधी । पावसामुळे घाट मार्गात दरड कोसळण्याच्या घटना अजूनही थांबलेल्या नाहीत. दरम्यान, शनिवारी मध्यरात्री कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे सातारा – कास मार्गावर आज पहाटेच्या सुमारास यवतेश्वर घाटात दरड कोसळली. या घटनेत सुदैवाने कोणतेही नुकसान झाले नाही. मात्र, कोसळलेल्या दरडीतील छोटी- मोठी दगडे रस्त्यालगत पडली होती. सातारा ते कास या मार्गावर यवतेश्वर घाट लागतो. या घाट … Read more

बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या एकास अटक; 1 कोयता, 2 सुऱ्यांसह 29 हजाराचा मुद्देमाल जप्त

Crime News 3

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरामध्ये धारदार शस्त्रे विक्री, बाळगणे व वाहतुक करणाऱ्या इसमांवर कारवाई कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक बापु बांगर यांनी दिल्यानंतर शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून आज धडक कारवाई करण्यात आली. यावेळी खुल्लेआमपणे कोयता व सुरा नाचवणाऱ्या एकास अटक करण्यात आली. तसेच त्याच्याकडून 1 कोयता, 2 … Read more

रामराव निकम कॉलेजच्या यशवंत गटाचा निरोप समारंभ उत्साहात साजरा

Karad News 1

कराड प्रतिनिधी । इंदोली ता. कराड येथील कै. रामराव निकम शिक्षण शास्त्र (बी.एड) महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष छात्राध्यापकांचा आंतरवासिता टप्पा क्रमांक एकचा निरोप समारंभ मसूर येथील इंदिरा कन्या प्रशालेत नुकताच पार पडला. यावेळी कापील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक लियाकतअली इनामदार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कै. रामराव निकम शिक्षणशास्त्र (बी.एड ) … Read more

NDRF च्या जवानांनी कराडच्या वेणूताई चव्हाण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना दिले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

Karad NDRF News 1

कराड प्रतिनिधी । नैसर्गिक आपत्ती काळात नेमक्या कोणत्या उपाययोजना करायच्या? अशा वेळी बचावकार्य करून एखाद्याचा जीव कसा वाचवायचा? या सर्व गोष्टींची माहिती व प्रात्यक्षिक आज NDRF टीमच्या जवानांकडून कराड येथील वेणूताई चव्हाण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना देण्यात आली. कराड येथील वेणूताई चव्हाण महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा पार पडली. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने … Read more

बेपत्ता झालेल्या वृध्द महिलेचा माहेरी विहिरीत आढळला मृतदेह

Crime News 2

पाटण प्रतिनिधी । कराड तालुक्यातील आगाशिवनगर येथून गुरुवारी एक वृद्ध महिला बेपत्ता झाली होती. त्या महिलेचा कुटुंबियांकडून शोधही घेतला जात होता. कुटुंबीयांनी याबाबत पोलीस ठाण्यातही फिर्याद दिली होती. मात्र, बेपत्ता झालेल्या वृद्ध महिलेचा अखेर माहेरी गलमेवाडी-कुंभारगाव, ता. पाटण येथील एक सार्वजनिक विहिरीत मृतदेह आढळून आला. चंद्रकला शंकर माटेकर (वय 65, सध्या रा. आगाशिवनगर) असे मृत … Read more

जावळीत अवैध दारु धंद्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड; 37 जणांविरोधात गुन्हा दाखल

Jawali Crime News 1

सातारा प्रतिनिधी । राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने सध्या सातारा जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून अवैध दारु धंद्यावर धडक कारवाई केली जात आहे. विभागाच्या वतीने नुकतीच जावळी तालुक्यात कारवाई करत अनेकांना ताब्यातही घेतले होते. त्यानंतर आता येथील अवैध दारु धंद्यावर विभागाने धंदा टाकत एकूण ३७ जणांवर गुन्हा दाखल केले आहेत. या कारवाईत सुमारे अडीच … Read more