जखिणवाडीत मारामारी करणाऱ्या 6 जणांवर कराड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Karad City Police

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील जखिणवाडी गावालगत असलेल्या कणसेमळा येथे मारामारीची घटना घडली होती. त्यामुळे या ठिकाणी काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेप्रकरणी आता मारामारी करणाऱ्या 6 जणांविरोधात कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकज पाटील, प्रथमेश पाटील, अमर पाटील, जय पाटील, प्रदीप पाटील व एक अनोळखी इसम अशी गुन्हा … Read more

कृष्णा नदीत बुडालेल्या 21 वर्षाच्या मुलाचा मृतदेह अखेर सापडला

Karad Crime News 1 jpg

कराड प्रतिनिधी | खराडे, ता. कराड येथे कृष्णा नदीत गणपती विसर्जन करताना 21 वर्षीय गणेश संतोष जाधव हा बुडाला होता. त्यानंतर त्याचे शोधकार्य राबविण्यात आले असता त्याचा मृतदेह काल सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास शोध पथकाच्या हाती लागला. दुपारी एक वाजता त्याच्यावर स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी अनंत … Read more

लोकनेते विलासकाकांचा ‘रयत’ कर्जमुक्त; आता 14 मेगावॅट वीजनिर्मितीही करणार

Adv. Uday Singh Patil Undalkar News 20231001 082427 0000 jpg

कराड प्रतिनिधी | अथणी व्यवस्थापनाच्या सहकार्याने रयत सहकारी साखर कारखाना चालवला आहे. आता रयत कारखाना पूर्णपणे कर्जमुक्त झाला असून यंदापासून रयत कारखाना प्रतिदिन ५ हजार मेट्रिक टन क्षमतेने ऊस गाळप करणार असल्याची माहिती कारखान्‍याचे अध्‍यक्ष ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी २७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिली. तसेच रयत कारखाना १४ मेगावॉट वीजनिर्मिती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. … Read more

कोयना धरण 88.38 टक्के भरले; ‘इतका’ TMC जमा झाला पाणीसाठा

Koyna Dam

पाटण प्रतिनिधी । गत आठवडाभरापासून सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात तसेच कोयना धरणक्षेत्रात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढल्याने कोयना धरणाचा पाणीसाठा 93.02 टीएमसीवर पोहोचला. तर धरण भरण्यासाठी आता 12 टीएमसीची पाण्याची गरज आहे. त्याचबरोबर काेयनेला 31 तर नवजाला 21 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सातारा जिल्ह्याच्या पूर्व तसेच पश्चिम भागात पावसाला … Read more

प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे यांना सत्यशोधक समाजरत्न जीवन गौरव पुरस्कार जाहीर; साताऱ्यात होणार पुरस्कार प्रदान

Prof. Dr. A H Salunkhe News (4)

सातारा प्रतिनिधी । ज्येष्ठ विचारवंत प्राच्य विद्या पंडित प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे यांना महात्मा गांधीजी यांच्या जयंती दिवशी दि. २ ऑक्टोबर रोजी सत्यशोधक समाज रत्न जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सायंकाळी ४ वाजता हा पुरस्कार वितरण कार्यक्रम यशवंत नगर, गेंडामाळ, सातारा येथे होणार असून याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक उपराकार लक्ष्मण … Read more

तासाभरातच पावसानं कराडकरांची उडवली दैना; कुठे नाले तुंबले तर कुठे वाहतूक खोळंबली

Karad Rain News jpg

कराड प्रतिनिधी । अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गणेशोत्सवापासून सुरुवात केली असून गेल्या दोन दिवसापासून पाऊस चांगलाच कोसळत आहे. दरम्यान, आज शनिवारी दुपारनंतर तासभर पडलेल्या पावसाने कराड शहराला चांगले झोडपून काढले. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे काहीसा दिलासा मिळाला. तर पावसामुळे शहरातील भाजी विक्रेत्यांसह सर्वांची एकच तारांबळ उडाली. विशेष म्हणजे पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर … Read more

आनंदाचा शिधा वितरणात मुख्यमंत्री शिंदेंचा सातारा जिल्हा राज्यात प्रथम

Satara News jpg

सातारा प्रतिनिधी । राज्यातील गोरगरीब जनतेला गौरी गणपती उत्सव आनंदाने साजरा करता यावा, यासाठी राज्य शासनाने आनंदाचा शिधा उपलब्ध करून दिला होता. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील असल्यामुळे सातारा जिल्ह्यात शिधा वाटपाची काटेकोरपणे अंलबजावणी करण्यात आली. आतापर्यंत सातारा जिल्ह्याने ९७.४४ टक्के वितरण करुन आनंदाचा शिधा वितरणामध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. सातारा जिल्ह्यात … Read more

‘कराडकरांनो रोज चाला अन् आपल्या हृदयाला जपा’…’त्यांनी’ दिला अनोखा संदेश

Karad World Heart Day News

कराड प्रतिनिधी । आज जागतिक हृदय दिन असून हृदय आणि रक्त वाहिन्यासंबंधी रोगांचं निवारण आणि त्यांचे परिणाम याबद्दल जनजागृती करण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. या दिनाचं औचित्य साधून कराड पालिका कर्मचाऱ्यांच्या वतीने आज रॅली काढत कराड शहरातील नागरिकांना अनोखा संदेश देण्यात आला. ” कराड शहरातील नागरिक हो दररोज चाला आणि आपले ह्रदय उत्तम … Read more

4 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 30 वर्षाच्या तरूणाचा कोयना नदीपात्रात आढळला मृतदेह

Patan Crime News (1)

पाटण प्रतिनिधी । घरातील कोणास काहीच न सांगता अचानक घरातून चार दिवसांपूर्वी निघून गेलेल्या पाटण तालुक्यातील एका तरुणाचा मृतदेह आज कोयना नदीपात्रात आढळून आला. रूपेश मनोहर चव्हाण (वय ३०, बनपेठ, येराड, ता. पाटण) असे तरुणाचे नाव आहे. या घटनेची नोंद पाटण पोलीस ठाण्यात झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बनपेठ – येराड, ता. पाटण … Read more

कराड पालिकेच्या मुख्याधिकारीपदी पुन्हा खंदारेचं!

Karad Shankar Khandare News jpg

कराड प्रतिनिधी । कराड पालिकेला मुख्याधिकारी काही टिकेना अशी गेल्या काही महिन्यापासून परिस्थिती पहायला मिळत आहे. एखादा अधिकारी आला कि तो वर्ष, दोन वर्षात पुन्हा बदली होऊन जातो किव्हा त्याच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. अशा घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. सध्या कराडचा कारभार हा प्रशासनाच्या हाती आहे. त्यामुळे पालिका प्रशासनावर शहरातील अनेक प्रश्न, समस्यांचा भर … Read more

कराडला 30 टन निर्माल्य गोळा अन् 3 तासात कृष्णा नदीकाठ चकाचक!

Karad KrushnaGhat News jpg

कराड प्रतिनिधी । स्वच्छतेमध्ये देशात नाव काढलेल्या कराड पालिकेकडून गणेशोत्सवात देखील आपले काम चांगल्या रीतीने पार पाडले आहे. विशेष म्हणजे गणेशोत्सवात शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने कृष्णा नदीत गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. याचसोबत निर्माल्यही सोडले जाते. मात्र, पालिका कर्मचाऱ्यांनी योग्य नियोजन करत काल दिवसभरात तब्बल 30 टन इतके निर्माल्य संकलित केले. तसेच त्यानंतर दुसऱ्या दिवशी … Read more

पाटील असल्याचे सांगत ‘त्यानं’ वृद्ध महिलेची 50 हजाराची मोहनमाळ केली लंपास…

jpg 20230618 083243 0000

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरातील पोवई नाका भाजी मंडई येथे गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीवेळी एक घटना घडली. “मी पाटील, ओळखलं का आजी?, मंडईत जाऊ नका तपासणी सुरू आहे,” असे सांगत वृद्धेच्या गळ्यातील सुमारे 50 हजार रुपये किंमतीची मोहनमाळ अज्ञात चोरट्याने लंपास केली. या घटनेनंतर चक्रावलेल्या आजींनी थेट पोलीस ठाणे गाठत चोरीची फिर्याद दिली. याप्रकरणी सातारा शहर … Read more