बाजार समितीच्या भिंतीचा वाद; कराड व्यापारी असोशिएशनने दिला ‘हा’ इशारा

Karad Agricultural Produce Market Committee News

कराड प्रतिनिधी । कराड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संरक्षण भिंतीवरून न्यायालयाकडून आलेल्या आदेशानंतर पालिकेने नुकतीच कारवाई केली. दरम्यान, कराड मार्केट यार्ड मर्चंट असोशिएनच्यावतीने शेती उत्पन्न बाजार समितीला हा रस्ता खुला केल्यास त्यामुळे होणाऱ्या नुकसानीबाबत एक निवेदन देण्यात आले आले आहे. संबंधित खुला केलेला रस्ता हा तत्काळ बंद करण्यात यावा. जोपर्यंत रस्ता बंद केला जात नाही … Read more

Satara News : खंबाटकी घाटातील वाहतूक पुन्हा कोलमडली; महाबळेश्वर, कासला येणारे पर्यटक त्रस्त

Khambataki Ghat News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । पुणे – बंगळुरु महामार्गावर शनिवार -रविवार सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी महाबळेश्वर, कास पठार याठिकाणी पर्यटक निघाल्याने खंबाटकी घाटातील वाहतूक व्यवस्था सकाळपासून कोलमडली आहे. घाटातील सहाव्या वळणावरील दत्त मंदिराजवळ माल वाहतूक ट्रक बंद पडल्यामुळे घाटाची वाहतूक पूर्णपणे संथगतीने सुरु आहे. खंडाळा पोलीस तसेच भुईंज पोलीस महामार्ग मदत केंद्राचे व शिरवळ रेस्क्यू टीमचे सदस्यांकडून वाहतूक … Read more

माण पंचायत समितीला मिळणार नवीन इमारत; 23 कोटींच्या खर्चास मिळाली प्रशासकीय मान्यता

Man Panchayat Samiti News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील महत्वाच्या पंचायत समितींपैकी एक म्हणून माण पंचायत समितीची ओळख आहे. या पंचायत समितीची इमारत धोकादायक बनल्यामुळे या आमटीच्या जागी नव्याने दुसरी इमारत करण्यात यावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती. ती मागणी आता पूर्णत्वास आली असून या ठिकाणी नवीन इमारत होणार आहे. त्यासाठी २३ कोटी रुपये खर्चास प्रशासकीय … Read more

Satara News : सातारा जिल्ह्यात गुलाबी थंडीची चाहूल; वाटा हरवल्या धुक्यात, दवबिंदूंनी शेतशिवारे झाली चिंब!

Karad News 13 jpg

सातारा प्रतिनिधी । परतीच्या पावसाने काढता पाय घेतल्यानंतर आता गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. यंदाच्या हंगामातील पहिले दाट धुके अनुभव संपूर्ण जिल्ह्यात अनुभवायला मिळाले. सातारा जिल्ह्याचा ग्रामीण देखील शनिवारी दाट धुक्यात हरवून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. धुक्यामुळे सर्व वातावरण धूसर बनले होते. शनिवारी पडलेल्या धुक्याने सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात उत्तर भारतातील धुक्याचा फील आला होता. … Read more

केंद्रीय राखीव दलात अधिकारी असल्याचे सांगत युवकास 90 हजारास घातला गंडा

Karad Taluka Police Station 1 1

कराड प्रतिनिधी । केंद्रीय राखीव दलात अधिकारी असल्याचे सांगत सोशल मीडियावर फोटो पाठवून जुने फर्निचर विक्री करण्याच्या नावाखाली 90 हजार रुपयांचा गंडा घालण्यात असल्याची घटना कराड तालुक्यात घडली आहे. याबाबत रेठरे खुर्द, ता. कराड येथील प्रशांत प्रकाश पाटील यांनी कराड तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून संतोषकुमार नामक व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत … Read more

कराडात ‘समता पर्व’च्या उपोषणास मुस्लिम समाज बांधवांकडून पाठिंबा; आज प्रकाश आंबेडकर देणार भेट

20231007 094547 0000 jpg

कराड प्रतिनिधी । अल्पसंख्यांक मुस्लिम समाजास संरक्षण कायदा लागू करावा यासह विविध मागण्यांसाठी कराड येथील तहसील कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसांपासून सुरू असणाऱ्या समतापर्व संयोजन समितीच्या उपोषणस्थळी हजारो मुस्लिम समाज बांधवांनी भेट देत पाठींबा दर्शवला. तसेच प्रशासनास निवेदन देखील दिले. राज्य सरकारने अल्पसंख्याक मुस्लिम संरक्षक कायदा व मुस्लिम समाजास ऍट्रॉसिटी सारख्या कायद्याचे संरक्षण मुस्लिम बांधवांना द्यावे, … Read more

पिंपळोशी ग्रामपंचायतीवर पुन्हां एकदा राष्ट्रवादीचाच झेंडा!; पालकमंत्री शंभूराज देसाईंना मोठा धक्का

Patan News jpg

पाटण प्रतिनिधी । पिंपळोशी ग्रामपंचायतीवर पाटणकर गटाने पुन्हां एकदा राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला आहे. नाट्यमय राजकीय घडामोडींनतर पिंपळोशी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पाटणकर गटाच्या विशाल निकम यांची बहुमताने निवड करण्यात आली. या निवडीमुळे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. नवनिर्वाचित सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज पाटण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व … Read more

पाणी पुरवठ्यासाठी उपाययोजना तात्काळ सुरू करा; पालकमंत्री देसाईंचे पाटणच्या मुख्याधिकाऱ्यांना निर्देश

Patan Shambhuraj Desai News jpg

कराड प्रतिनिधी । सध्याचा पाणीप्रश्न तात्काळ सोडविण्याकरिता नव्याने स्थापन केलेल्या नगरपंचायतीना नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहाय्य योजनेमधून पाटण नगरपंचायतीला 1 कोटी रुपये निधी मंजूर करणेत आलेला आहे. एका महिन्यात कामाची सुरवात करण्याचे व जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर करण्यात आलेला 60 लक्ष रुपयांचे जल शुद्धीकरण केंद्राचे काम तात्काळ सुरु करण्याचे निर्देश पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी पाटणच्या मुख्याधिकारी … Read more

सातारा जिल्ह्यातील ‘या’ 4 वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘सीईओं’नी दिल्या नोटिसा; नेमकं कारण काय?

Satara News 8 jpg

सातारा प्रतिनिधी । नांदेड येथील शासकीय रुग्णालयात घडलेल्या रुग्णाच्या मृत्यूच्या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेच्या उपचार पद्धतीवर तसेच येथून दिल्या जाणाऱ्या सुविधांवर प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, या घटनेपूर्वी सातारा जिल्ह्यातील 4 वैद्यकीय अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कामकाजात अनियमितता दिसून आल्याबद्दल नोंदीस बजावल्या आहेत. सातारा तालुक्‍यातील वेणेगाव, नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील हलगर्जीपणा करणाऱ्या चार वैद्यकीय … Read more

विकासकामे गुणवत्तापुर्ण होण्यासाठी नवीन तयार केलेली ई प्रणाली उपयुक्त : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Collector Jitendra dudi

सातारा प्रतिनिधी । जिल्ह्यात होत असलेल्या विकासकामांची अद्यावत प्रगतीची तसेच पूर्ण झालेली कामे ही ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे गुणवत्तापूर्ण व वेळेत झाली असल्याची खात्री करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून गुणवत्तापूर्ण काम सनियंत्रण प्रणाली विकसित करण्यात आली आहे. ही प्रणाली विकास कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण होण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. सातारा जिल्हा परिषदेच्या स्व. … Read more

साताऱ्यात साईबाबा मंदिराची स्टोअर रुम फोडून चोरट्याकडून दीड लाखाच्या चांदीच्या वस्तूंची चोरी

Satara News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा येथील गोडोलीमध्ये साईबाबा मंदिर आहे. या ठिकाणी मंदिराच्या पाठीमागील आवारातील स्टोअर रुम फोडून अज्ञात चोरट्याने सुमारे 1 लाख 56 हजार रुपयांच्या विविध प्रकारच्या चांदीच्या वस्तू चोरून नेल्याची घटना दि. 3 रोजी मध्यरात्री घडली. सातारा शहर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा शहरातील गोडोलीमध्ये … Read more

नागठाणे, बोरगाव परिसरात कुत्र्यांचा 25 जणांवर जीवघेणा हल्ला; रुग्णालयात उपचार सुरु

Dog Attack News jpg

सातारा प्रतिनिधी । पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकुळ घालत सुमारे 25 जणांवर जीवघेणा हल्ला करून त्यांचे अक्षरशः लचके तोडल्याची घटना नागठाणे, बोरगाव ता. सातारा येथे नुकतीच घडली आहे. यामध्ये बोरगाव येथील एका महिलेसह चावा घेतल्याने ती गंभीर जखमी झाली असून तिच्यासह अनेक रुग्णांना सातारच्या क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती … Read more