‘त्यानं’ जीव सोडताच संतापलेल्या ग्रामस्थांनी मृतदेहासह रुग्णवाहिका आणली पोलीस मुख्यालयासमोर; पुढं घडलं असं काही…

Satara Crime News

सातारा प्रतिनिधी । दोन महिन्यापूर्वी खुनी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सातारा येथील पांगारे गावच्या राहुल शिवाजी पवार (वय 30) या तरुणाचा शनिवारी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर संतापलेल्या ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा घेत रविवारी दुपारी एक वाजता रुग्णवाहिकेतुन मृतदेहच सातारा पोलिस मुख्यालयासमोर आणला. त्यामुळे मुख्यालयासमोर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. फरारी असलेल्या 2 आरोपींना अटक … Read more

वाईत महागणपतीच्या दर्शनासाठी आलेल्या पर्यटकांच्या बसवर दगडफेक; 3 जण जखमी!

Wai Bus of Tourists News

सातारा प्रतिनिधी । वाईच्या महागणपतीच्या दर्शनासाठी पालघरहून एक पर्यटकांची बस वाईत आली होती. या बसमधील चालकाने बस पार्किंग करण्यासाठी रस्त्याकडेला उभी केली असता काही स्थानिकांनी अचानक दगडफेक केली. यामध्ये बसच्या काचा फुटल्या असून 3 पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत. जितेंद्र प्रभाकर तरे (वय 40), मोहन हरिचंद्र तरे (वय 62), प्रतीक दिलीप तरे (वय 21) अशी … Read more

Crime News : डॉक्टर शिंदेंच्या बंगल्यावरील दरोडाप्रकरणी कराड पोलिसांची मोठी कारवाई; १ जणाला अटक

jpg 20230710 104226 0000

कराड प्रतिनिधी | कराड शहरालगत असलेल्या शिंदे मळा येथील डॉक्टर शिंदे यांच्या बंगल्यावर सशस्त्र दरोडा टाकून घरातील एकूण 48 तोळे सोन्याचे दागिने असा सुमारे 46 लाख 20 हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना काही दिवसापूर्वी घडली होती. या घटनेनंतर कराड शहर पोलिस ठाण्याचे पथक अंबरनाथ येथे दोन दिवसापूर्वी रवाना झाले होते. दरम्यान या पथकाने आज सहा … Read more

भांडणातून शिक्षकांकडे तक्रार करणाऱ्या दोघा भावंडांना एकटं गाठून ‘त्यानं’ केला जीवघेणा हल्ला; पुढं घडलं असं काही…

School at Shirwal

सातारा प्रतिनिधी । शाळेत भांडणे झाल्यानंतर विद्यार्थी त्याची तक्रार शिक्षकांकडे करतात. मग शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षा करतात. मात्र, आपली तक्रार केल्याचा राग मनात धरून कधीकाळी तो बाहेरही काढला जातो. अशीच घटना सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील एक शाळेत घडली आहे. शाळेत शिक्षकांकडे तक्रार केल्याच्या कारणातून एका शालेय विद्यार्थ्याने शाळेमधील 2 विद्यार्थ्यांवर लोखंडी घातक शस्त्राने जीवघेणा … Read more

चोरट्यांनी मारला माजी पंचायत समिती सदस्याच्या घरी डल्ला; 10 तोळे सोन्यासह लाख रुपये केले लंपास

Khatav Police Station

कराड प्रतिनिधी | जिल्ह्यात सद्या चोरट्यांच्याकडून घरफोडी करण्याचे प्रमाण वाढले आहे. नुकतीच कराड येथील एका डॉक्टरच्या घरावर टाकलेल्या दरोड्याची घटना ताजी असताना खटाव तालुक्यात आणखी एक घरफोडी झाल्याची घटना घडली आहे. येथील पंचायत समितीच्या माजी सदस्या आशा संजय पानस्कर यांच्या सूर्याचीवाडी येथील घरात अज्ञात चोरट्यांनी धाड टाकली असून यामध्ये 10 तोळे सोने व सुमारे पावणे … Read more

प्रवाशांना लुटणाऱ्या 3 जणांना अटक; दुचाकीसह 3.40 लाखांचा मुद्देमाल जप्त

Shahupuri Police News

सातारा प्रतिनिधी । साताऱ्यातील बसस्थानकाबाहेर एक प्रवाशाला तीन जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्याच्याकडील गळ्यातील सोनसाखळी, बोटातील सोन्याची अंगठी, मोबाईल आणि खिशातील पैसे लुटल्याची घटना नुकतीच घडली होती. या घटनेतील तीन संशयितांना शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने अखेर बेड्या ठोकल्या आहेत. रफिक युसुफ मुलाणी (वय 31, रा. पुष्करमंगल कार्यालय समोर भोसले चाळ सातारा), आकाश सुधीर इंगवले … Read more

वसुली अधिकाऱ्याची 1.5 लाखांची पैशांची बॅग हिसकावून पळाले; पोलिसांनी 36 तासात दोघांना ठोकल्या बेड्या

Bhujan Police News

कराड प्रतिनिधी । धूम स्टाईलने बाईकवरून येत वसुली अधिकाऱ्याकडून पैशांची बॅग हिसकावलयाची घटना केंजळ गावचे हद्दीत घडली होती. या घटनेनंतर अवघ्या 36 तासात भुईंज पोलिसांनी दोन आरोपींचा शोध घेत त्यांना धर्मपूरी ता. माळशिरस जि. सोलापूर येथून ताब्यात घेत बेड्या ठोकल्या आहेत. अजय मोहन पाटोळे (वय 22, रा. धर्मपूरी, ता. माळशिरस जि.सातारा) आणि दिपक नाना जाधव … Read more

टॅंकरच्या धडकेत फलटणमधील वृद्ध जागीच ठार

Accident News 1

कराड प्रतिनिधी । लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खराडवाडीजवळ टॅंकरने दिलेल्या धडकेत एकजण जागीच ठार झाला असल्याची घटना गुरुवारी घडली. सुरेंद्र किसनराव भोसले (वय 55) असे अपघातातील मृताचे नाव असून डोक्याचा चेंदामेंदा झाल्यामुळे घटनास्थळावरील चित्र अंगाचा थरकाप उडविणारे होते. याबाबत अधिक माहिती अशी की, फलटण तालुक्यातील साखरवाडी बडेखान रोडवर गुरुवारी संध्याकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास खराडवाडी जवळ … Read more

हॉटेलवरील भांडणावरून ‘त्यांनी’ रचला खुनाचा कट; मात्र, पोलिसांनी उधळून लावला डाव

Crime News Karad 2

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यात गत आठवड्यात घरफोडी, मारामारी आणि लुटमारीच्या घटना घडलेल्या आहेत. यावर पोलिसांकडून कारवाई होते न होते तोवर कराड पंचायत समितीच्या माजी उपसभापतीच्या मुलाचा खून करण्याच्या तयारीत असलेल्या चार आरोपींचा अटक केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे कराड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. हॉटेलमध्ये जेवणाच्या ऑर्डरवरुन झालेला वादाचे रूपांतर थेट खुनाचा कट … Read more

पहाटेच्या वेळी धुक्यांऐवजी दिसले धुरांचे लोट; पिंपोडे बुद्रुकमधील मुख्य बाजार पेठेत घडलं असं काही…

main market place in Pimpode Budruk fire

कराड प्रतिनिधी । कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक येथील एस. टी. बसस्थानक परिसरात मुख्य बाजारपेठेत दत्तात्रय काशिनाथ महाजन यांच्या राहत्या घराला व त्यांच्या इमारतीतील कृषी सेवा केंद्राला आज बुधवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीमुळे 50 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. स्थानिकांनी पाण्याचे टँकर व वाई नगरपालिकेच्या … Read more

चौकशीत देत होता उडवा-उडवीची उत्तरे पोलिसांनी ‘खाकी’चा दाखविला हिसका; पुढं घडलं असं काही…

Karad City Police

कराड प्रतिनिधी । कराड शहरात वाढत असलेल्या दुचाकी चोरीच्या अनुषंगाने कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून तपासाची मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेदरम्यान सोमवारी रात्री उशिरा कोयनावसाहत परिसरात विठ्ठल मंदिरा समोरून एक संशयितास अटक केली. निलेश सुरेश चव्हाण (रा. वडगाव हवेली ता. कराड जि. सातारा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती … Read more

लाच प्रकरणी अटक केलेल्या दोन्ही संशयित आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी

Crime News Karad

कराड प्रतिनिधी । मलकापूर, ता. कऱ्हाड येथील नगरपरिषदेच्या नगर अभियंत्यासह एका व्यक्तीला 30 हजारांची लाच घेताना ACB लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल सोमवारी रात्री रंगेहाथ पकडले. रस्त्याचे बिल काढण्यासाठी दोघांनी ही लाच स्वीकारली होती. ताब्यात घेतल्यानंतर दोघांना आज दुपारी कराड येथील प्रथम वर्ग न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने दोघांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. याबाबत … Read more