देशी बनावटीच्या पिस्तूलसह दोघांना अटक; 1 लाख 20 हजाराचा मुद्देमाल जप्त

20230907 192622 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड शहर पोलिसांच्या वतीने आज देशी बनावटीची पिस्तूल विक्री करण्यासाठी आलेल्या रेकॉर्डवरील सराइत दोन गुंडास अटक करण्यात आली. तसेच त्यांच्याकडून शस्त्रासह एकुण 1 लाख 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अनिकेत पालकर व त्याचा साथीदार दिवाकर बापुराव गाडे, (वय 28 वर्षे रा. बैल बाजार रोड मलकापुर ता. कराड जि. … Read more

शाळकरी मुलांवर कुत्र्याचा जीवघेणा हल्ला; 5 जण रुग्णालयात दाखल

Dog Attak News 20230907 045800 0000 jpg

कराड प्रतिनिधी | शाळा सुटल्यानंतर घरी निघालेल्या शाळकरी मुलांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने यात चार मुले जखमी झाल्याची घटना आरेवाडी, ता. कराड येथे नुकतीच घडली. चार मुलांना चावा घेतल्यानंतर याच कुत्र्याने साजूरमधील आणखी एकाला चावा घेतला असून सर्व जखमींवर कराडच्या वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, आरेवाडी जिल्हा परिषद … Read more

पाठरवाडी डोंगराच्या पायथ्याला बिबट्याचा थरार; शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला

Farmar Attak News 20230906 232813 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्याच्या पश्चिमेकडे टोकावर असलेल्या पाठरवाडी डोंगराच्या पायथ्याला बुधवारी दुपारी थरारक घटना घडली. शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने पाठीमागून अचानक हल्ला केला. शेतकऱ्याने प्रसंगावधान राखून बिबट्यावर दगड भिरकावल्याने बिबट्याने धूम ठोकली. या हल्ल्यात शेतकऱ्याच्या छातीवर तसेच हाताला गंभीर जखम झाली आहे. पोपट बाळकृष्ण जाधव (रा. गमेवाडी, ता. कराड), असे बिबट्याच्या हल्ल्यात … Read more

साताऱ्यात वृद्ध दाम्पत्याने विष पिऊन संपवले जीवन; ‘अशी’ उघडकीस आली घटना

jpg 20230618 083243 0000

सातारा प्रतिनिधी | सातजन्माच्या शपथा घेऊन दोघांनी आयुष्यभर आपली साथ सोडली नाही. प्रत्येक संकट आणि आव्हाने पेलत एकमेकांना आधार, धीर दिला आणि शेवटी दोघांनी एकाचवेळी आपले आयुष्य संपवले. सातारा येथे आज बुधवारी दुपारी र्हदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली. येथील शुक्रवार पेठेतील एका वृद्ध दाम्पत्याने राहत्या घरात विष घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. उत्तमराव … Read more

साखरपुड्यात केला लाखाचा खर्च मात्र, ऐनवेळी लग्न मोडलं; डॉक्टरसह 3 जणांवर गुन्हा दाखल

Satara Crime News 20230906 164245 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरातील एका नामवंत हाॅटेलमध्ये धुमधडाक्यात साखरपुड्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला. या साखरपुड्यात 9 लाख 63 हजार रुपये इतका खर्च मुलीकडच्यानी केला. मात्र, साखरपुड्यानंतर जेव्हा लग्नाची तारीख ठरवण्याची वेळ आली तेव्हा ऐनवेळी लग्न करण्यास वर पक्षांकडील लोकांनी नकार दिला.याबाबत मुलाकडील मंडळींनी फसवणूक केल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात दिली. याप्रकरणी … Read more

भुईंज पोलिसांचा दणका, अवैध व्यवसाय करणारे दोघेजण जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार

Bhuianj Police Station News 20230906 161620 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | मागील वर्षभरापासून जिल्हा पोलीस दलाने मोक्का आणि तडीपारीच्या कारवाईचा धडाका लावला आहे. त्यात सातत्य राखून संघटीत तसेच मारामारी, सावकारी, खंडणी, अपहरणासारखे गुन्हे दाखल असणार्‍या गुन्हेगारांना हिसका दाखवला आहे. आता अवैध व्यवसाय करणार्‍यांवरही कारवाईचा बडगा पोलिसांनी उगारला आहे. जुगार आणि चोरटी दारू विक्रीचे सातत्याने गुन्हे करणार्‍या दोघांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले … Read more

शिरवळ पोलीसांची कर्नाटकात धडक कारवाई ; 21 लाखाच्या चोरीतील गुन्हेगाराच्या आवळल्या मुसक्या

20230905 163144 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | विंग, ता. खंडाळा येथील आंतरराष्ट्रीय कंपनीचे फ्रिज, वॉशिंग मशिन व कंटेनर असा 21 लाख 87 हजार 153 रुपयांचा मुद्देमाल लंपास करनाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या शिरवळ पोलीसांनी आवळल्या. याबाबत अधिक माहिती अशी की, विंग, ता. खंडाळा येथील आंतरराष्ट्रीय कंपनीचे 58 फ्रिज व 56 वॉशिंग मशिन किंमत 21 लाख 87 हजार 153 रुपयांचे साहित्य … Read more

खून करून 7 महिन्यांपासून होता फरार; अखेर ठोकल्या बेड्या

20230905 112229 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | पुणे – कोल्हापूर महामार्गाच्या हद्दीत वाढे फाटा नजिक सर्व्हिसरोड लगत सातारा येथील एकावर गोळीबार करत त्याचा खून केल्याची घटना ७ महिन्यापूर्वी घडली होती. या घटनेतील ५ आरोपींना पोलिसांनी अटक केली होती तर अन्य २ आरोपी फरारी होते. त्यातील एकास अटक करण्यात सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसाना यश आले आहे. याबाबत पोलिसांकडून … Read more

कराडात गुन्हे प्रकटीकरण शाखेची धडक कारवाई; 1 किलो गांजा केला जप्त

Karad Crime News 20230905 104525 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड शहरात गेल्या अनेक दिवसांपासून छुप्या पद्धतीने अमली पदार्थांची विक्री केली जात आहे. याबाबत कराड शहर पोलिस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकास माहिती प्राप्त झाल्यानंतर या पथकाने कराड शहरातील कृष्णा नाका येथे गांजाची विक्री करण्यास आलेल्या एका सराईत गुन्हेगारास सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून सुमारे 60 हजार रूपये किमतीचा 1 किलो … Read more

शिरवळच्या AK गँगच्या टोळीप्रमुखासह चौघांना मोक्का

Shirval News 20230905 094727 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील खंडाला तालुक्यातील शिरवळ येथील AK गँगमधील चौघांविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम ( मोक्का) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. सातारा पोलीस अधिक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई शिरवळ पोलिस ठाण्याच्या अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे. टोळी प्रमुख आतीष ऊर्फ बाबू राजेंद्र कांबळे, (वय २१, रा. बौध्दवस्ती शिरवळ ता. … Read more

1 वर्षांपूर्वी चोरीस गेलेले मोबाईलचा कराड पोलिसांकडून छडा; मालकांकडे केले सुपूर्द

Karad Mobail News 20230904 104243 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड येथील शहर पोलिसांना गहाळ झालेले व चोरीस गेलेले मोबाईल शोधून काढण्यात यश आले आहे. सुमारे वर्षभरापूर्वी जे मोबाईल गहाळ झाले होते तसेच चोरीस गेले होते. त्या मोबाईलचा सायबर पोलिसांच्या मदतीने कराड पोलिसांनी छडा लावला आहे. काही मोबाईल पोलिसांनी शोधून काढत ते मुळ मालकांना कागदपत्रांसह परत केले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

पुणे – सातारा महामार्गावर वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; 3 महिलांवर गुन्हा दाखल

Crime News 20230904 100929 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात वेश्याव्यवसायाचे प्रमाण वाढले आहे. यावर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. दरम्यान, पुणे – सातारा महामार्ग असलेल्या वेळू ता.भोर, जि.पुणे गावचे हद्दीत सर्विस रोडवर वेश्यागमनास प्रवृत्त करणाऱ्या महिलांवर राजगड पोलिसांनी नुकतीच धडक कारवाई केली. यामध्ये वेश्याव्यवसाय करणाऱ्या तीन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहतीनुसार, वेळू (ता. भोर जिल्हा … Read more