ग्रीसींग करताना डंपरच्या चाकाखाली सापडून व्यावसायिकाचा झाला मृत्यू

Accident News 20240930 205553 0000

सातारा प्रतिनिधी | खंडाळा तालुक्यातील असवली येथे डंपरच्या चाकाला ग्रीसींग करताना चाकाखाली सापडून केसुर्डी येथील ग्रीसींग व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाला. दादासाहेब तुकाराम ढमाळ (वय ५०, रा.केसुर्डी ता.खंडाळा) असे मृत ग्रीसींग व्यावसायिक मालकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, केसुर्डी ता.खंडाळा येथील दादासाहेब ढमाळ हे ट्रक, ट्रेलर आदी वाहनांचे मशिनच्या साहाय्याने ग्रीसींग करण्याचा व्यवसाय करीत … Read more

हॉटेल मालक, व्यवस्थापकाला 10-15 तरुणांनी केली बेदम मारहाण; शिरवळ पोलिसांत गुन्हा दाखल

Crime News 20240921 223506 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात किरकोळ कारणावरून मारमारीच्या घटना घडत आहे. हॉटेलसमोर लावलेले वाहन बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरुन १०-१५ तरुणांनी हॉटेल मालक, व्यवस्थापकासह दोघांना बेदम मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली आहे. तलवार फिरवत शिवीगाळ, काठ्या, हाँकी स्टिकने मारहाण केल्याने ते गंभीर जखमी झाले असून खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडी गावच्या हद्दीत ही घटना घडली. याप्रकरणी पुणे, सातारा … Read more

कराड, शिरवळमधील सराईत गुन्हेगारांच्या 2 टोळ्यांवर कारवाई, सहाजण दोन वर्षांसाठी तडीपार

Crime News 20240802 124430 0000

सातारा प्रतिनिधी | सातत्याने गुन्हे करणाऱ्या कराड आणि शिरवळमधील ६ जणांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलं आहे. यामध्ये कराडमधील ४ आणि शिरवळमधील २ जणांचा समावेश आहे. कराड मधील चौघांना संपूर्ण सातारा जिल्हा आणि सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, कडेगाव तर शिरवळ मधील दोघांना सातारा, पुणे व सोलापुर या तीन जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता तडीपार करण्यात आले आहे. … Read more

शिरवळमध्ये दोन गटांमध्ये तुफान राडा; भांडणात कोयता, गुप्ती, पिस्टलचा वापर

Shirval Crime News

सातारा प्रतिनिधी । खंडाळा तालुक्यातील सांगवी व शिरवळ येथे दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रार शिरवळ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शिरवळ पोलिस स्टेशनच्या सांगवी गावच्या हद्दीत असणाऱ्या एका बारमध्ये अय्याज इकबाल शेख, म मिनाज इकबाल शेख (रा. शिरवळ) व अन्य दोघे … Read more

पुणे – बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील संरक्षक कठड्याला धडकून रिक्षा उलटली, बोरीवच्या वृद्धाचा जागीच मृत्यू

Crime News 8

सातारा प्रतिनिधी । पुणे – बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे एसटी स्टँड समोर असणाऱ्या पुलावर रिक्षा उलटून कोरेगाव तालुक्यातील बोरीव गावातील एक वृद्ध जागीच ठार झाला. तर एकजण जखमी झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. वसंत हरिभाऊ पोळ (वय ६५, रा. बोरीव पोस्ट रहिमतपूर, ता. कोरेगाव) असे अपघातात मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. … Read more

मोबाईलवरचे संदेश व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेस केला जीवे मारण्याचा प्रयत्न, पोलिसांनी पती-पत्नीला ठोकल्या बेड्या

Crime News 1

सातारा प्रतिनिधी । पतीला मोबाईलवर केलेले संदेश व्हायरल करण्याची धमकी देत २ लाख रुपये न दिल्याने विवाहितेला गळफास लावत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात असल्याची धक्कादायक घटना वडवाडी ता.खंडाळा येथे घडली आहे. या घटनेमुळे खंडाळा तालुक्यात खळबळ उडाली असून याप्रकरणी शिरवळ पोलिसांनी पती-पत्नीला अटक केली आहे. विशाल दिलीप बामणे (वय ३३), रेश्मा विशाल बामणे (३०, रा.वडवाडी … Read more

फरसाण विक्रेता परप्रांतीय युवकानं नीरा नदी पात्रात टाकली उडी; पुढं घडलं असं काही…

Khandala News 1

सातारा प्रतिनिधी । खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील नीरा नदी पात्रात परप्रांतीय युवकाने आंघोळ करण्यासाठी उडी टाकली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. सुरेंदर जोहरसिंग शिकरवार (वय 35, मुळ रा.आग्रा उत्तरप्रदेश, सध्या रा.संगमवाडी जि.पुणे) असे मृताचे नाव आहे. याबाबतची मिळालेली माहिती अशी की, शिरवळ येथील ग्रामदैवत श्री अंबिका माता … Read more

साताऱ्यात दहशत निर्माण करणाऱ्या ‘एके’ गँगला दणका; सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यांतून 2 वर्षांसाठी तडीपार

Crime News 20240425 052005 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात शिरवळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने गुन्हे करणाऱ्या टोळीतील ४ सदस्यांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षे तडीपार केले आहे. नोव्हेंबर २०२२ पासून आत्तापर्यंत १०५ गुन्हेगारांना तडीपार करण्याची कारवाई करण्यात आली आहे. आतीश ऊर्फ बाबू राजेंद्र कांबळे, विशाल शेखर वाडेकर, रामा दादा मंडलिक आणि संजय … Read more

शिरवळमध्ये 2 युवकांकडून पिस्तूल जप्त; गुन्हा दाखल

Crime News 20240422 182200 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील पळशी रोड याठिकाणी संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एका सराईत टोळीच्या दोन युवकांना पोलीसांनी अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून विनापरवाना बाळगलेल्या एक देशी बनावटीचे पिस्तूल, २ जिवंत काडतुसे व दुचाकी, असा एक लाख वीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. घटनास्थळ व शिरवळ पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पोलिस … Read more

“ताबा कसा घेताय”, म्हणत हॉटेल मालकाने स्वत:च्या पोटात चाकू मारुन केला आत्महत्येचा प्रयत्न

Shirval News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील शिरवळमध्ये खळबळ उडवून देणारी एक घटना घडली आहे. “तुम्ही ताबा कसा घेताय ते मी तुम्हाला आता दाखवतो,” असे म्हणत हॉटेल मालकाने स्वतःच्या पोटात चाकू मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. थकीत कर्ज प्रकरणी पतसंस्थेने कायदेशीर प्रक्रिया करत स्थावर मालमत्तेचा ताबा घेताना हा प्रकार शिरवळ येथे घडला. याप्रकरणी हॉटेल मालक उदय विनायक गोलांडे … Read more

सख्या भावाने बहिणीचा गळा आवळून केला खून

Crime News 13 jpg

सातारा प्रतिनिधी । बहिणीच्या प्रेमसंबंधामुळे गावात बदनामी होत असल्याच्या कारणातून परप्रांतीय सख्ख्या भावाने 19 वर्षीय बहिणीचा स्कार्फने गळा आवळून खून केला. शिरवळ पोलिसांनी मोठ्या शिताफीने दहा दिवसांमध्ये हा प्रकार उघडकीस आणला. याप्रकरणी संशयित शंकर जिमदार महतो (वय २४, मूळ रा. माझीनियापत्ती, ता. माझी सारन जि. छपरा रा. बिहार सध्या रा. पळशी ता. खंडाळा) याला पोलिसांनी … Read more

पोलिस उपनिरीक्षक वृषाली देसाईंवर निलंबनाची कारवाई; खातेनिहाय चौकशीचे आदेश

Shirwal News jpg

सातारा प्रतिनिधी | खंडाळा तालुक्यातील सांगवी येथील अल्पवयीन मुलीने युवकाकडून वारंवार होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याप्रकरणी सांगवी ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत तपास अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तपास अधिकारी शिरवळच्या पोलिस उपनिरीक्षक वृषाली देसाई यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यासाठी फलटण पोलिस उपअधीक्षकाना … Read more