साताऱ्यात ‘मशिद परिचय’ उपक्रमात घेतला शिवेंद्रसिंहराजेंसह उदयनराजेंनी सहभाग

Satara News 20240108 193124 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा बैतुलमाल कमिटीच्‍या वतीने रविवारी शाही मशिदमध्‍ये आयोजित केलेल्‍या मशिद परिचय उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपक्रमात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही सहभाग नोंदवला. यानंतर त्‍यांनाही मशिद व त्‍या ठिकाणच्‍या नित्‍यक्रमाची माहिती देण्‍यात आली. सांप्रदायिक सद्‌भावना जोपासली जावी, स्‍नेहभाव वाढीस लागावा, यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्‍याचा निर्णय शहरातील मुस्लिम … Read more

रहाटणीत शेतकऱ्याने 40 गुंठ्यात घेतले 129 टन उसाचे उत्पन्न

20240108 180020 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | खटाव तालुक्यातील रहाटणी येथील प्रगतीशील शेतकरी व पोलीस पाटील देवीदास थोरात यांनी ४० गुंठ्यामध्ये १२९ टन एवढे आडसाली लागणी ऊसाचे विक्रमी उत्पन्न काढले आहे. या गावातील सर्वांत जास्त उत्पन्न या शेतकऱ्याने काढले आहे. या परिसरातील गावाना उरमोडी पोटपाटाच्या पाण्याचे वरदान लाभले आहे. यामुळे या परिसरात पाण्याची कमतरता पडत नाही. तरीसुद्धा आधुनिक पद्धतीने … Read more

विद्यानगरमध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या हस्ते मंगळवारी 5 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन

Karad News 20240108 161551 0000 jpg

कराड प्रतिनिधी | विद्यानगर – सैदापूर, ता. कराड येथील बनवडी फाटा ते कृष्णा कॅनॉल चौकापर्यंतच्या रस्त्याच्या कामासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून ५ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. या विकासकामाचे भूमिपूजन मंगळवारी सकाळी ९ वाजता केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्प मार्च २०२३ मधून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्यातून … Read more

पालकमंत्री देसाईंविरोधात शिंदे गटाच्या तालुका प्रमुखाची अश्लील पोस्ट; गुन्हा दाखल

Crime News 20240108 091756 0000 jpg

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नावाने सोशल मीडियावर शिवसेना शिंदे गटातील तालुकाप्रमुखाने एक पोस्ट लिहिली आहे. या प्रकरणी तालुका प्रमुखावर कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी रात्री ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शिवसेना एकनाथ शिंदे ग्रुप या नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप आहे. या व्हॉट्सअॅप … Read more

कराडच्या व्यावसायिकाला 90 लाखांचा गंडा; दोघा भावांवर गुन्हा दाखल

20240108 083416 0000 jpg

कराड प्रतिनिधी | भागीदारीत चांदीचा व्यवसाय करण्याचे आमिष दाखवून कराड येथील व्यावसायिक सूरज विष्णू साळुंखे (रा. मंगळवार पेठ) यांना तब्बल 90 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी नवीनकुमार सावंत आणि महेशकुमार सावंत (रा. भिकवडी, ता. कडेगाव, जि. सांगली) या सख्ख्या भावांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, … Read more

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, तरुणाला 4 वर्षे सक्तमजुरी

Crime News 20240107 232706 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी हर्षद पप्पू रणदिवे (वय २०, रा. चौधरवाडी, ता. फलटण, जि. सातारा) याला विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश के. व्ही. बोरा यांनी चार वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित मुलगी ही अल्पवयीन आहे, हे हर्षद दणदिवे याला … Read more

आजच्या पत्रकारितेसमोर कृत्रिम बुद्धिमत्तेचे मोठे आव्हान : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

Karad News 20240107 211136 0000 jpg

कराड प्रतिनिधी | आज देशातील पत्रकारितेसमोर राजकीय आव्हान उभे राहिले असून निर्भीड पत्रकारितेला मिळणारा वाव कमी झाला आहे. त्याचबरोबर प्रसार माध्यमांची आर्थिक स्वायत्तता व बदलत्या तंत्रज्ञानाचा धोकाही प्रसारमाध्यमांसमोर आहे. त्यातच कृत्रिम बुद्धिमत्ता, चॅटजीपीटी, डीपफेक या तंत्रज्ञानामुळे पत्रकारितेसमोर मोठी आव्हाने उभी राहिली असून पत्रकारांनी बदलते तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे तरच त्यांचा नव्या युगामध्ये टिकाव लागेल, असे … Read more

किरण मानेंनी केला ठाकरे गटात प्रवेश; शिवबंधन बांधताच उद्धव ठाकरेंनी दिलं ‘हे’ वचन

Satara News 20240107 164345 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय आणि सामाजिक प्रश्नांवर जाहीरपणे रोखठोक भूमिका घेणारे साताऱ्याच्या भूमीतील सुपुत्र अन् अभिनेते किरण माने यांनी आज रविवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. मुंबईतील मातोश्रीवर पार पडलेल्या पक्षप्रवेशाच्या या सोहळ्याला सुषमा अंधारे, सुनील प्रभू यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी किरण माने आणि उद्धव ठाकरे … Read more

वरकुटे मलवडी येथे श्रीप्रभु रामाची अक्षदा, पत्रिका वाटप

20240107 145830 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | अयोध्येतील श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना 22 जानेवारी रोजी अयोध्या नगरीत मोठ्या दिमाखात श्रीरामाची मुर्ती स्थापन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने देशभरात श्रीरामचा कलशरथ प्रत्येक गावोगावी, प्रत्येक कुटुंबात भेट देत आहे. यानिमित्ताने वरकुटे मलवडी, ता. माण येथे श्रीप्रभु रामाची अक्षदा व पत्रिका वाटप करण्यात आले. वरकुटे मलवडी परिसरातील रामभक्त प्रत्येक कुटुंबात जाऊन श्रीप्रभु रामाची … Read more

सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळणार

Satara News 20240107 140627 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करून विद्यार्थ्यांनी भरलेली परीक्षा शुल्काची रक्कम त्यांना तातडीने परत मिळणार आहे. याबाबतच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सचिवांना दिल्या आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सांगली व सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ करून त्यांना भरलेली शुल्काची रक्कम … Read more

हजारो भाविकांच्या उपस्थितीत पुसेगाव यात्रेस उत्साहात प्रारंभ

Satara News 20240107 131929 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | खटाव तालुक्यातील पुसेगाव येथील प. पू. श्री सेवागिरी महाराजांच्या 76 व्या पुण्यस्मरणानिमित्त वार्षिक यात्रेस शनिवारी पालखी व मानाचा झेंड्याच्या भव्य मिरवणुकीने भक्तिमय आणि उत्साही वातावरणात सुरुवात झाली. शनिवार, दि 6 ते मंगळवार, दि. 16 या कालावधीत शासकीय विद्यानिकेतनच्या परिसरात आणि सातारा-पंढरपूर रस्त्याच्या दुतर्फा यात्रा भरण्यास सुरूवात झाली आहे. पुसेगाव यात्रेस दरवर्षी महाराष्ट्र, … Read more

मराठा क्रांती मोर्चाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे फलटणला आज उद्घाटन

Phalatan News 20240107 120537 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | मराठा क्रांती मोर्चाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन फलटण येथे आज दि. 7 रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे. या सोहळ्याची सुरुवात दुपारी 4 वाजता शोभायात्रेने होणार आहे. उद्घाटनानंतर 5.30 वाजता शिवशाहीर संतोष साळुंखे (लातूर) यांचा पोवाडा होणार आहे. मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील मार्गदर्शन करणार आहेत. फलटण येथील रिंग रोडवरील डी. एड्. चौकात … Read more