साताऱ्यात शरद पवारांचे ‘हे’ महत्वाचे शिलेदार फुंकणार ‘तुतारी’!

Satara News 12

सातारा प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून दोन्ही आघाड्यांचं जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. अशातच कोणत्या मतदारसंघातून कोण निवडणूक लढणार? याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असताना राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या उमेदवारांची संभाव्य यादी जाहीर झाली आहे. तर हातातून गेलेला बालेकिल्ला सातारा हा परत घेण्यासाठी शरद पवार यांनी डाव टाकला आहे. जिल्ह्यातील आठ विधानसभा … Read more

जळगावच्या निलेश जाधव खून प्रकरणी दोघांच्या अटकेनंतर पोलिसांकडून मुख्य संशयिताचा शोध सुरू

Crime News 20241017 074324 0000

सातारा प्रतिनिधी | जळगाव, ता. कोरेगाव येथील निलेश शंकर जाधव यांच्या खूनप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी मंगळवारी करण उर्फ भीमराव मल्हारी देवराशे, (रा. नांदगिरी) याला अटक केली. आतापर्यंत या गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपींची संख्या तीनवर पोहोचली आहे. कोरेगाव पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी या गुन्ह्याच्या अनुषंगिक माहिती दिली. तपासादरम्यान करण उर्फ भीमराव मल्हारी … Read more

साताऱ्यात विद्यमान आमदार अन् इच्छुकांमध्ये काटे कि टक्कर; संभाव्य लढती पहाच

Satara Political News

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल काल वाजला आहे. येत्या 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी करण्यात येणार आहे. राज्यात आचारसंहिता सुद्धा लागू झाली असून निवडणूक जाहीर झाल्यानंतर सातारा जिल्ह्यात राजकीय घडामोडीना वेग आला आहे. राज्यात जशी महायुती आणि महविकास आघाडीत मुख्य लढत होत आहे तशीच जिल्ह्यात देखील होणार हे नक्की. निवडणुकीचं बिगुल … Read more

कारने धडक दिलेल्या जळगावच्या युवकाचा मृत्यू; कोरेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल

Crime News 20241015 092428 0000

सातारा प्रतिनिधी | प्रेमप्रकरण असल्याचा संशय मनात धरून दुचाकीस्वारास कारने उडवून ठार केल्याप्रकरणी सोमवारी येथील पोलिसात कारचालक, त्याचा भाऊ व एका महिलेवर कट रचून खून केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी कारचालक अद्याप फरारी असून, त्याचा भाऊ व महिलेस आज अटक केली आहे. अटकेतील भावास येथील न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबत माहिती … Read more

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवकांनो मोठी जबाबदारी पार पाडा : धैर्यशील कदम

Dhairyashil Kadam News 1

कराड प्रतिनिधी । भाजप युवा मोर्चा रहिमतपूर मंडलच्या विविध पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचे नुकतेच वाटप करण्यात आले. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवकांना मोठी जबाबदारी पार पाडायची आहे. त्यामुळे सर्व युवकांनी कामाला लागावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम (Dhairyashil Kadam) यांनी केले. रहिमतपूर, ता. कोरेगाव येथे पार पडलेल्या कार्यक्रमास भाजपा किसान मोर्चा … Read more

कोरेगावात प्रेम प्रकरणाच्या संशयावरून ‘त्यानं’ केला जीवे मारण्याचा प्रयत्न

Koregaon News

सातारा प्रतिनिधी । सध्या किरकोळ कारणावरून जीवे मारण्याच्या घटना घडत आहेत. अशात प्रेम प्रकरणाच्या संशयावरून कोरेगाव तालुक्यातील धुमाळवाडी (नांदगिरी) येथील एकाने आपल्या भरधाव कारने जोरदार धडक देऊन जळगाव येथील एका युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. कारच्या धडकेत युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर घटना शनिवारी दुपारी साडेबारा … Read more

कराड दक्षिणमध्येच मतदार यादीवर तब्बल 4 हजारांवर हरकती

Karad News 20241011 214553 0000

कराड प्रतिनिधी | निवडणूक विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीवर हरकती घेण्यासाठी ऑनलाइन व ऑफलाइन प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्याअंतर्गत कराड दक्षिण मतदारसंघातून सर्वाधिक हरकती घेण्यात आल्या होत्या. या हरकतींवर आजपासून उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, तहसीलदार कल्पना ढवळे, तहसीलदार श्रीमती संदे यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. या वेळी निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार हेमंत बेसके, युवराज पाटील, … Read more

कराड उत्तरमध्ये परिवर्तन आणायचे असेल तर निष्क्रिय आमदार बदला : धैर्यशील कदम

Karad News 75

कराड प्रतिनिधी । कोरेगावात पाच वर्षात आमदार महेश शिंदे यांनी विकासकामे केली. अंतर्गत गटारे बांधली, सीमेंट कोंक्रीटचे रस्ते केले. माग त्याठिकाणी होत असतील तर आपल्याकडे कराड उत्तरेत आतापर्यंत का झाली नाहीत? असा सवाल करीत अशा निष्क्रिय व बिनकामाच्या आमदाराला अजून किती दिवस आपण उरावर सहन करणार आहोत. हे जर करायचे नसेल आणि कराड उत्तरमध्ये परिवर्तन … Read more

विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवारांचा गट काँग्रेसमध्ये विलीन होणार; कोरेगावात ‘या’ माजी मंत्र्याने केले महत्वाचे विधान

Satara News 2024 10 09T192214.983

सातारा प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी व रणनीतीसंदर्भात अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य व कर्नाटकचे माजी मंत्री विनयकुमार सोरके यांच्या अध्यक्षतेखाली कोरेगाव तालुका काँग्रेस समितीची सभा नुकतीच पार पडली. यावेळी विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे. तशा प्रकारचे संकेत वरिष्ठ पातळीवरून मिळत असल्याचे महत्वाचे विधान माजी मंत्री विनयकुमार सोरके यांनी … Read more

मद्यधुंद कार चालकाने कोरेगावच्या कोलवडीत तिघांना उडवले; अपघातात 12 वर्षीय मुलीचा मृत्यू

Crime News 17

सातारा प्रतिनिधी । भरधाव वेगात मद्यधुंद कारचालकाने 12 वर्षीय मुलीला उडवले. या अपघातात मुलीचा जागीच मृत्यू झाला तर कारचालकाने पुढे जाऊन दुचाकीवरील दोघांना उडवले. यात दोघेही गंभीर जखमी झाल्याची घटना सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील सातारा रोड पळशी दरम्यान कोलवडी गावात खंडाळा शिरूर राज्यमार्गावर सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातानंतर कारचालक फरार झाला असून पोलीस … Read more

सत्ताधाऱ्यांचा राज्य लुटण्याचा नवा डाव; खेडच्या शिवस्वराज्य यात्रेत जयंत पाटलांची टीका

Satara News 2024 10 06T120754.393

सातारा प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेचे कोरेगावात पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून उत्साहात स्वागत करण्यात आले. या यात्रेनंतर खेड येथील सभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. “राज्य वाचवण्यासाठी चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्यांना बाहेर घालवण्याची सुरुवात कोरेगावातून करावी लागेल. सध्या राज्य लुटण्याचा पण सत्ताधाऱ्यांनी केला आहे. मागतील … Read more

जिल्ह्यातील आमदार साहेबांना सोशल मीडियात किती आहेत फॉलोअर्स?

Satara News 96

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आमदारकीसाठी अनेक नेतेमंडळींनी दंड थोपटले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी विद्यमान आठ आमदारांनाही आपापल्या पक्षाकडून उमेदवारी मिळण्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात ९ आमदार राहतील अशी परिस्थिती सध्या दिसत आहे. विधानसभेची निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होणार असून या निवडणुकीत जे आमदार आणि इच्छुक उभे राहणार आहेत त्यांच्याकडून सोशल … Read more