विडणी महिला हत्या प्रकरण : 15 एकर ऊसाच्या तोडीनंतर सापडली हत्या करण्यासाठी वापरलेली सुरी, एक सत्तूर

0
177

सातारा प्रतिनिधी | फलटण तालुक्यातील विडणी येथे महिलेच्या झालेल्या निर्घृण खुनाने परिसर हादरला आहे. गेल्या तीन दिवसांपासून पोलीस घटनास्थळी तपास करत असून परिसरातील 15 एकर ऊसाचे क्षेत्र तोडून मोकळे केल्यानंतर परिसरात दोन सुरी, एक सत्तूर अशी तीक्ष्ण हत्यारे मिळून आली आहेत. या घटनेबाबत परिसरात तर्कविर्तक सुरु असून पोलिसांचा तपास सुरु आहे.

महिलेची ज्या प्रकारे हत्या करण्यात आलेली आहे. तो अघोरी अंधश्रध्देचा प्रकार असल्याचे आढळून आल्याने ऊसाचे पंधरा एकरातील क्षेत्र ऊस तोडून मोकळे करण्यात आले आहे. घटनेचे गांभिर्य ओळखून पोलिसांनी वरिष्ठ अधिकार्‍यांसह वेगवेगळ पथक नेमून श्वानाव्दारे तपासणी केली. फॉरेन्सिक पथकाने नमुने घेण्यात आले. मृतदेहाची कवटी अर्धवट मृतदेह तपासणीसाठी नेण्यात आली आहे.

घटनास्थळी तोडलेल्या ऊसात तपासणी करताना दोन सुरी व एक सतुर असे तीक्ष्ण हत्यार मिळून आले असून ही हत्यारे देखील फॉरन्सिक विभागाकडे हाताचे ठसे व रक्ताचे नमुने घेण्यासाठी पाठविण्यात आली आहेत. महिलेच्या खुनासंदर्भात हत्यारे सापडल्याने पुरावा सापडला असला तरी महिलेच्या शरीराचा अर्धा भाग अद्यापही मिळून आला नाही.

अज्ञातांनी ही हत्या अंधश्रध्देतून केली आहे की दिशाभूल करण्यासाठी असा दिखावा केला आहे की घातपाताचा प्रकार आहे याचा उलगडा पोलिसांना झाला नाही. अद्यापही सबंधित आरोपीही मिळाला नसल्याने तपास सुरूच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here