फरार आरोपीला बैलगाडी शर्यतीतच ‘खाकी’नं ठोकल्या बेड्या

Karad News 9 1 jpg

कराड प्रतिनिधी । मोक्का कायदा तसेच अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला पोलिसांनी बैलगाडी शर्यतीतून उचलले. पाचवड फाटा, ता. कराड येथे शेतकऱ्यांच्या वेशात शर्यतीमध्ये घुसून पोलिसांच्यावतीने ही कारवाई करण्यात आली. अक्षय अनिल तळेकर (वय २९, रा. हरपळवाडी, ता. कराड) असे पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड तालुक्यातील हरपळवाडी येथील अक्षय … Read more

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत गतिमानता पंधरवडा; लाभ घेण्याचे आवाहन

Satara News 20 1 jpg

सातारा प्रतिनिधी । राज्य शासनाच्या उ‌द्योग विभागामार्फत ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ (सीएमईजीपी) योजना राबविण्यात येत आहे. या अंतर्गत दि. ३० डिसेंबरपर्यंत सुरू असलेल्या गतिमानता पंधरवड्याचा लाभ नवउद्योजकांनी नवीन उद्योग, अस्तित्वातील उद्योगांचे विस्तारीकरण आदींसाठी घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उ. सु. दंडगव्हाळ यांच्यावतीने करण्यात आले आहे. विकास आयुक्त (उद्योग) दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्या संकल्पनेनुसार १७ … Read more

‘त्यानं’ चुलत भावाचाच काढला काटा; पुरावा नष्ट करताना केलेल्या एका चुकीमुळं अडकला जाळ्यात

Satara News 19 1 jpg

सातारा प्रतिनिधी । शेताच्या बांधावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून ज्ञानेश्वर उर्फ नोन्या विलास धायगुडे याने त्याचा चुलत भाऊ मोहन सुरेश धायगुडे याचा डोक्यात दगड घालून खून केला. ही भयंकर घटना खंडाळा तालुक्यातील अहिरे येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अहिरे (ता. खंडाळा) येथील शेरी नावाच्या … Read more

रेल्वेमंत्र्यांसोबतच्या भेटीवेळी खा. उदयनराजेंनी केली ‘या’ महत्वाच्या विषयावर चर्चा

Satara News 18 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणाऱ्या कराड- चिपळूण रेलवेमार्गासह रेल्वे प्रवाशांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी रेल्वे आणि दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. रेल्वेमार्ग दुपदरीकरणामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांचा विषय तसेच अजिंक्यतारा एक्सप्रेस आणि बाधित शेतकऱ्यांच्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने मागणी केली. खा. उदयनराजेंशी चर्चा झाल्यानंतर याबाबत तातडीने पाहणी करण्याच्या … Read more

ऊसाच्या फडात 13 वर्षीय मुलावर धारदार शस्त्राने सपासप वार

Crime News 10 jpg

सातारा प्रतिनिधी । उसाच्या फडात धारधार शस्त्राने सपासप करण्यात आलेल्या वारामध्ये एका १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना कोरेगाव तालुक्यात शनिवारी सायंकाळी घडली. तालुक्यातील भाडळे खोऱ्यात असलेल्या हिवरे गावातील विक्रम विजय खताळ (वय १३) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. त्याचा मृतदेह उसाच्या फडात शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आढळून आला. खुनामागचे नेमके कार्म मात्र, … Read more

प्रतापगडाच्या पायथ्याशी लवकरच बसणार अफजल खान वधाचे शिल्प; काम अंतिम टप्प्यात

Satara News 17 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाच्या कबरीसमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे शिल्प उभे करावे, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर अफजलखान वधाच्या जागेसमोर अफजलखान वधाचे शिल्प उभा करण्याचे काम मुंबईतील जे. जे. आर्टस ऑफ कॉलेजला देण्यात आले होते. हे काम ९० टक्के पूर्ण झाले असून या कामाची पाहणी जे. जे. स्कूल ऑफ … Read more

वाल्मीक पठारावर 4 गव्यांचा युवकावर हल्ला

Karad News 7 1 jpg

कराड प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील वाल्मीक पठारावरील पानेरी गावातील शेतकरी बाबू हरिबा झोरे (वय 32) यांच्यावर 4 गव्यांनी हल्ला केला. या गव्यांच्या हल्ल्यात ते जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ८:३० च्या सुमारास घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पुणेरी बाबू झोरे हे शनिवारी सायंकाळी आईला मुंबईला सोडण्यासाठी ढेबेवाडी येथून परत घरी जात असताना पानेरी … Read more

शहीद जवान अनिल कळसेंच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Karad News 6 1 jpg

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील रेठरे खुर्द येथील भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले अनिल दिनकर कळसे यांना मणिपूर येथे सेवेत असताना अपघातात वीरमरण आले. त्यांच्या पार्थिवावर आज कराड तालुक्यातील रेठरे खुर्द येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण, कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आनंद पाथरकर, गटविकास अधिकारी … Read more

विकसित भारत संकल्प यात्रा 100 टक्के यशस्वी करा – सहसचिव अनिता शहा अकेला

Satara News 15 1 jpg

सातारा प्रतिनिधी । केंद्र शासनाच्या ग्रामीण विकासाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी राबविण्यात येत असलेली ‘विकसित भारत संकल्प यात्रा शंभर टक्के यशस्वी करावी, असे आवाहन, केंद्र शासनाच्या कार्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या सहसचिव अनिता शहा अकेला यांनी केले. विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमाच्या सातारा जिल्ह्यातील सुरु असलेल्या अंमलबजावणीचा आढावा श्रीमती शहा अकेला यांच्या अध्यक्षतेखाली … Read more

खंबाटकी घाटात पुन्हा वाहतूक कोंडी; इंजिन गरम झाल्यानं शंभरहून अधिक वाहनं पडली बंद

Khambataki Ghat News jpg

सातारा प्रतिनिधी । तीन दिवस सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात पर्यटनस्थळी जाण्यासाठी बाहेर पडले आहेत. मात्र, या पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे. कारण पुणे-बंगळुरू महामार्गावरील खंबाटकी घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विकेंडसाठी गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांसाठी मुंबई-पुणे-कोल्हापूर हा मार्ग सोयीचा राहतो. त्यामुळे या महामार्गावरून जास्त वाहनांची रेलचेल असते. … Read more

मांढरदेवीची यात्रा उत्साहात पार पाडण्यासाठी प्रयत्न करावे; तहसीलदार मेटकरी यांच्या सूचना

Satara News 14 1 jpg

सातारा प्रतिनिधी । वाई तालुक्यातील मांढरदेव येथील श्री काळेश्वरी देवीची यात्रा येत्या दि. २४ व २५ जानेवारीला होत आहे. या यात्रेसाठी महिनाभर राज्यातून आणि राज्याबाहेरून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. यात्रा काळात येणाऱ्या सर्व भाविकांना अधिक चांगल्या सुविधा देण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची आहे. त्यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी झोकून देऊन काम करावे, अशा सूचना तहसीलदार सोनाली … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा आढळला पहिला रुग्ण

Satara News 13 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सध्या आरोग्य विभागाकडून सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात आरोग्य तपासणी मोहीम राबविली जात आहे. ताप थंडीसह खोकल्याचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेकडून अशा रुग्णावर उपचार देखील केले जात आहेत. अशात कोरोनाचे रुग्ण देखील इतर जिल्ह्यात आढळत असल्याने सातारा जिल्हा प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात असताना सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेगाव येथे … Read more