नागठाणेत दगडाने ठेचून महिलेचा निर्घृणपणे खून; संशयितास अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | जुन्या भांडणाच्या वादातून महिलेचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना गुरुवारी रात्री नागठाणे येथे घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी बोरगाव पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे.

कोरी मिशन शौकत भोसले (वय 39) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी राहुल ऊर्फ शेर्‍या प्रकाश चव्हाण (वय 35, मूळ रा.लिंब सध्या रा. नागठाणे) याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी, कोरी मिशन शौकत भोसले या नागठाणे येथे बेघर वसाहत परिसरात वास्तव्यास होती. किरकोळ व मजुरी करून ती आपला उदरनिर्वाह करत होती. संशयित राहुल हा या महिले सोबतच राहत होता. काही दिवसांपासून त्यांच्यात विविध गोष्टींवरून खटके उडत होते.

गुरुवारी रात्रीही बाजार पटांगण शेजारी असलेल्या ऑईल मिल परिसरात संशयित राहुल व महिलेमध्ये कडाक्याचे भांडण झाले. हा वाद विकोपाला गेला. तासभर जोरदार वाद झाला. यावेळी संशयिताने महिलेस मारहाण केली. तिचे दोन्ही पाय शर्टाच्या साह्याने बांधून डोक्यावर, चेहर्‍यावर दगडाने ठेचले. यामध्ये ती गंभीर जखमी झाली.

यानंतर तिला सातारा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटेनची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक चौकशी केल्यानंतर संशयित राहुल याला अटक करण्यात आली.