कोयना धरण पाणलोट क्षेत्रात वाढ; 79.70 TMC झाला पाणीसाठा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सध्या पावसाचा जोर वाढला असल्यामुळे धरणाच्या जलाशयात दररोज एक ते दोन टीएमसीने भर पडत आहे. दरम्यान, कोयना धरणाचा एकूण पाणीसाठा 79.70 टीएमसी झाला असून, सुमारे 75.72 टक्के धरण भरले आहे. जलाशयात प्रतिसेकंद 19 हजार 297 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. पायथा वीजगृहातून 2 हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे.

गेल्या सात-आठ दिवसांपासून कोयना क्षेत्रात धुवांधार पाऊस कोसळल्याने येथील नद्या तुडूंब भरुन वाहू लागल्या आहेत. कोयना धरण क्षेत्रात शुक्रवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 79.70 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. तसेच गेल्या 24 तासात कोयनेला – 50 मिलीमीटर, नवजा- 116 मिलीमीटर व महाबळेश्वरला – 47 मिलीमीटर पाऊस पडला. त्याचबरोबर आतापर्यंत कोयनेला – 3 हजार 60, नवजा – 4 हजार 361 आणि महाबळेश्वरला – 4 हजार 26 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या कोयना धरणातून 2100 क्युसेस इतक्या क्षमतेने पाणी नदीपात्रात सोडले जात आहे.

कोयना धरणात किती पाणी याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी खालील आकडेवारी पहा –

Koyna Dam
Date : 04/08/2023
Time : 08 : 00 AM
Water level : 2140′ 10″ (652.526m)

Dam Storage :
Gross : 79.70 TMC (75.72%)

Inflow : 19,297 cusecs

Discharges
KDPH : 2100 Cusecs.
Total Discharge in koyna River : 2100 Cusecs

Rainfall in mm : (Daily/Cumulative)
Koyna : 50/3060
Navaja : 116/4361
Mahabaleshwar : 47/4026