जिल्ह्यात पावसाने केले राैद्ररूप धारण; कोयना धरणातील पाणीसाठा 70 TMC च्या उंबरठ्यावर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने राैद्ररूप धारण केल्यामुळे कोयना आणि कृष्णा नदीतील पाणीपातळीत चांगली वाढ झाली आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत असल्यामुळे पश्चिमेकडील घाटमार्गात दरडी कोसळू लागल्या आहेत. नागरिकांनाही सुरक्षितस्थळी हलविले जात असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर २४ तासांत सर्वाधिक पाऊस कोयना येथे १६२ तर नवजाला १५७ मिलीमीटर झाला आहे. दरम्यान, कोयना धरणाचा पाणीसाठाही ७० टीएमसीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.

सातारा जिल्ह्यात हवासामान विभागाकडून आजपर्यंत आॅरेंज अलर्ट दिला असलातरी गेल्या चार ते पाच दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. सातारा जिल्ह्यातील कास, बामणोली, ठोसेघर, कोयना, नवजा
भागासह महाबळेश्वर तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे. बुधवारी सकाळपासूनच पश्चिम भागात पावसाने राैद्ररूप धारण केल्यामुळे अनेक ठिकाणी जनावरांचा मृत्यू, घरांची पडझड, पिकांचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

मुसळधार पावसामुळे कोयना धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून बुधवारी सकाळी सुमारे ५० हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरण पाणीसाठा ६८.८२ टीएमसी झालेला. सध्या धरण ६५ टक्क्यांवर भरलेले आहे. तर धरणाच्या पायथा वीजगृहाच्या एका युनीटमधून १ हजार ५० क्यूसेक वेगाने पाणी विसर्ग सुरूच आहे.