कराडात कृष्णा घाटाच्या पायऱ्यांना पाणी; कोयना धरणात ‘एवढा’ TMC झाला पाणीसाठा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कोयना धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. दरम्यान, काल सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फूट उचलून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. यानंतर कोयना धरणातील पाणी कराड येथील प्रीतिसंगम घाटावरील पायऱ्यांना सायंकाळी लागले आणि पायऱ्या पाण्याखाली गेल्या. रात्री उशिरा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानंतर पूर परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून शहरातील सखल भागात पुराच्या पाण्याचा शिरकाव होण्याची शक्यता आहे. तर आतापर्यंत कोयना धरणात एकूण 81.19 टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण 77.14 टक्के भरले आहे.

सद्यस्थितीत कोयना धरणाच्या सांडव्यावरून ३०००० क्यूसेक्स विसर्ग चालू आहे. पाणलोट क्षेत्रामधील मुसळधार पावसामुळे येव्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. आज सकाळी आलेल्या आकडेवारीनुसार कोयनेत 198 मिलीमीटर, नवजात 172, महाबळेश्वरमध्ये 267 सर्वाधिक पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.

कराडसह पाटण तालुक्यात आठवडाभरापासून मुसळधार पाऊस सुरू असून त्यामुळे ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. परिणामी कोयना तसेच कृष्णा नदीची पाणी पातळी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यातच गुरुवारी सायंकाळी कोयना त धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडून व सुरुवातीला नदीपात्रात ११ हजार क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. त्यानंतर विसर्ग वाढवून तो २० हजार क्युसेक प्रतिसेकंद करण्यात आला आहे. त्यामुळे कोयना नदीची आणि पर्यायाने कृष्णा नदीची पाणी पातळीही मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. अगोदरच या दोन्ही नद्यांचे पाणी पात्राबाहेर गेले आहे. त्यातच आता धरणातून विसर्ग वाढविल्यामुळे ठिकठिकाणी पाण्याचा शिरकाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Koyna Dam
Date: 26/07/2024
Time: 08:00 AM
Water level: 2142’06” (653.034m)

Dam Storage:
Gross: 81.19 TMC (77.14%)
Live: 76.07 TMC (75.97%)

Inflow : 78,487 Cusecs.

Discharges
Radial Gate: 30,000 Cusecs.
KDPH: 2100 Cusecs.

Total Discharge in koyna River: 32,100 Cusecs

Rainfall in mm-(Daily/Cumulative)
Koyna- 198/3255
Navaja- 172/3794
Mahabaleshwar- 267/3375