पाटण प्रतिनिधी । कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सध्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी सततच्या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. दरम्यान, शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंत धरणाचा एकूण पाणीसाठा 80.67 टीएमसी झाला असून, सुमारे 76.64 टक्के धरण भरले आहे.
कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून 2 हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. गेल्या सात-आठ दिवसांपासून कोयना क्षेत्रात धुवांधार पाऊस कोसळल्याने येथील नद्या तुडूंब भरुन वाहू लागल्या आहेत. कोयना धरण क्षेत्रात शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 80.67 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. तसेच गेल्या 24 तासात कोयनेला – 13 मिलीमीटर, नवजा- 15 मिलीमीटर व महाबळेश्वरला – 16 मिलीमीटर पाऊस पडला.
त्याचबरोबर आतापर्यंत झालेल्या पावसापैकी कोयनेला – 3 हजार 73, नवजा – 4 हजार 376 आणि महाबळेश्वरला – 4 हजार 42 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या कोयना धरणातून 2100 क्युसेस इतक्या क्षमतेने पाणी नदीपात्रात सोडले जात आहे.
रायगडसह पुणे, सातारा जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट
हवामान विभागाच्या वतीने आज महत्वाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आजही राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून कोकणातील रायगड जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
कोयना धरणात किती पाणी याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी खालील आकडेवारी पहा –
Koyna Dam
Date : 05/08/2023
Time : 08:00 AM
Water level : 2141′ 11″ (652.856m)
Dam Storage :
Gross : 80.67 TMC (76.64%)
Inflow : 13,309 cusecs
Discharges
KDPH : 2100 Cusecs.
Total Discharge in koyna River: 2100 Cusecs
Rainfall in mm : (Daily/Cumulative)
Koyna : 13/3073
Navaja : 15/4376
Mahabaleshwar : 16/4042