कोयना धरणाचा पाणीसाठा झाला 80.08 TMC

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । मागील काही दिवसांपासून जिल्ह्याच्या पश्चिम भागातील कोयना, नवजा, महाबळेश्वरसह संपूर्ण कांदाटी खोऱ्यात चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणांतील पाणीसाठ्यातही वेगाने वाढ होत आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात देखील पावसाचा जोर वाढला असल्यामुळे धरणाच्या जलाशयात पाण्याची चांगली भर पडत आहे. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयना धरणाचा एकूण पाणीसाठा 80.08 टीएमसी झाला असून सुमारे 76.08 टक्के इतक्या क्षमतेने धरण भरले आहे.

कोयना जलाशयात प्रतिसेकंद 17 हजार 606 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. पायथा वीजगृहातून 2 हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. दिवसभरात कोयनेला – 07 मिलीमीटर, नवजा- 05 मिलीमीटर व महाबळेश्वरला – 47 मिलीमीटर पाऊस पडला. त्याचबरोबर आतापर्यंत कोयनेला – 3 हजार 67, नवजा – 4 हजार 371 आणि महाबळेश्वरला – 4 हजार 31 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या कोयना धरणातून 2100 क्युसेस इतक्या क्षमतेने पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. सध्या धरणातील पाण्याची पातळी हि 2141′ 03″ (652.653m) इतकी झाली आहे.

कोयना धरणात किती पाणी याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी खालील आकडेवारी पहा –

Koyna Dam
Date : 04/08/2023
Time : 05:00 PM
Water level : 2141′ 03″ (652.653m)

Dam Storage :
Gross : 80.08 TMC (76.08%)

Inflow : 17,606 cusecs

Discharges
KDPH : 2100 Cusecs.
Total Discharge in koyna River : 2100 Cusecs

Rainfall in mm : (Daily/Cumulative)
Koyna : 07/3067
Navaja : 10/4371
Mahabaleshwar : 05/4031