कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ; 81.49 TMC भरलं धरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सध्या पावसाचा वाढला जोर कमी झाला असला असल्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्याने 80 टीएमसीचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान, रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत धरणाचा एकूण पाणीसाठा 81.49 टीएमसी झाला असून, सुमारे 77.42 टक्के धरण भरले आहे.

कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून 2 हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून कोयना क्षेत्रात धुवांधार पाऊस कोसळल्याने येथील ओढे-नाले तुडूंब भरुन वाहू लागले आहेत. कोयना धरण क्षेत्रात रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 81.49 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. तसेच गेल्या 24 तासात कोयनेला – 27 मिलीमीटर, नवजा – 31 मिलीमीटर व महाबळेश्वरला – 27 मिलीमीटर पाऊस पडला.

त्याचबरोबर आतापर्यंत झालेल्या पावसापैकी कोयनेला – 3 हजार 100, नवजा – 4 हजार 407 आणि महाबळेश्वरला – 4 हजार 67 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या कोयना धरणातून 2100 क्युसेस इतक्या क्षमतेने पाणी नदीपात्रात सोडले जात आहे.

कोयना धरणात किती पाणी याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी खालील आकडेवारी पहा –

Koyna Dam
Date : 06/08/2023
Time : 08:00 AM
Water level : 2142′ 10″ (653.136m)

Dam Storage:
Gross : 81.49 TMC (77.42%)

Inflow : 11,584 cusecs

Discharges
KDPH :
2100 Cusecs.
Total Discharge in koyna River: 2100 Cusecs

Rainfall in mm : (Daily/Cumulative)
Koyna : 27/3100
Navaja : 31/4407
Mahabaleshwar : 25/4067

Date : 06/08/2023
Time : 07:00 AM
1) कोयना जुना पूल कराड –
पाणी पातळी- ५५५.२५७(१७ʼ०३”) (इशारा -४५ʼ) (धोका-५८ʼ४ʼʼ)
2) वारुंजी –
पाणी पातळी – ५५४.१६७ (१५’०६”) विसर्ग ८९१३क्युसेक
(इशारा-४३ʼ१०”)(धोका – ५१ʼ८”)
3) हेळवाक पुल
पाणी पातळी – ५७४.२० मी.
(ईशारा ५७६.८० मी.) (धाेका ५७८.६० मी)
4) केरा पुल पाटण
पाणी पातळी – ५६७.०० मी.
(ईशारा ५७०.४५ मी.) (धाेका ५७२.९७ मी.)