कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा हाहा:कार; धरणात झाला ‘इतका’ TMC पाणीसाठा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे धरणातील पाणीसाठा 75.26 टीएमसी झाला आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजता आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरण 71.51 टक्के भरले असून धरणात 75 हजार 215 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. दरम्यान, आज दुपारी ४ वाजता धरणाचे दरवाजे १ फूट ६ इंजाने उघडण्यात येणार आहेत. दरवाजातून १० हजार आणि आणि पायथा वीजगृहातून १०५०, असा एकूण ११ हजार ५० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात होणार आहे.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत कोयनानगर येथे 163, नवजामध्ये 237 आणि महाबळेश्वरला 307 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. धरणात प्रतिसेकंद ७५ हजार क्युसेक्स वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. एक जूनपासून आतापर्यंत कोयनेत 3 हजार 057 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर नवजा येथे आतापर्यंत 3 हजार 622 आणि महाबळेश्वरमध्ये 3 हजार 108 मिलीमीटर पाऊस झाला आहे. कोयना धरणात आवक वाढली आहे.

कराडात धुवाधार; 17 दिवसांत 300 पार

कराड तालुक्यात सरासरी १८० मि.मी.च्या आसपास पाऊस पडतो. मात्र, गत चोवीस दिवसांपैकी सतरा दिवसांतच पावसाने ही सरासरी ओलांडली आहे. मंगळवार अखेर तालुक्यात तीनशे मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस कोसळला आहे. त्यातही उंडाळे, कोळे आणि उंब्रज मंडळात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. कराड तालुक्यात भौगोलिकदृष्ट्या असमतोल पाहायला मिळतो. तालुक्याचा पूर्वेकडील भाग दुष्काळी, तर पश्चिमेकडील भागात चांगला पाऊस होतो. यंदा जुलै राहू महिन्याच्या सुरुवातीला पावसाने ओढ दिली. त्यामुळे चिंतेचे ढग दाटून आले होते. मात्र, त्यानंतर सुरू झालेला पाऊस अद्यापही थांबलेला नाही. जुलै महिन्यातील आतापर्यंतच्या २४ या दिवसांपैकी १७ दिवस पावसांनी हजेरी लावली आहे. सरासरीपेक्षा जास्त चा पाऊस या सतरा दिवसांमध्ये पडला चे असून १६७.४ टक्के इतका पाऊस का झाला आहे.

Koyna Dam

Date: 25/07/2024
Time: 08:00 AM
Water level: 2135’10” (651.002m)

Dam Storage:
Gross: 75.26 TMC (71.51%)
Live: 70.14 TMC (70.05%)

Inflow : 75,215 Cusecs.

Discharges
KDPH: 1050 Cusecs.
Total Discharge in koyna River: 1050 Cusecs

Rainfall in mm-(Daily/Cumulative)
Koyna- 163/3057
Navaja- 237/3622
Mahabaleshwar- 307/3108