कोयना धरणातून पाणी सोडताना धरण व्यवस्थापनाने काय करावे?; पालकमंत्री देसाईंनी अधिकाऱ्यांना केल्या ‘या’ सूचना

Shambhuraj Desai News 20240727 221634 0000

कराड प्रतिनिधी | पुरस्थितीच्या पार्श्वभुमीवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज आढावा बैठक घेतली. यावेळी कोयना धरणातुन पाणी सोडताना नदीकाठच्या गावात पुरस्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. धरणातुन पाणी येतय म्हणून जादा पाणी सोडू नये. त्यासाठी धऱण व्यवस्थापनाने नियोजन करावे, अशा सुचना पालकमंत्री देसाई यांनी धरण व्यवस्थापनच्या अधिकाऱ्यांना दिल्या. कराड येथील शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या … Read more

कोयना पाणलोट क्षेत्रात संततधार; 105 टीएमसी साठवण क्षमता असलेले कोयना धरण भरले ‘इतके’ TMC

Patan News 4

पाटण प्रतिनिधी । गत दहा दिवसांपासून कोयना परिसराला झोडपून काढलेल्या मुसळधार पावसाचा जोर शुक्रवारी सकाळपासून कमी झाला आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसाने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक 47 हजार 799 क्युसेक आहे. गुरूवारपासून उघडलेले धरणाचे सहा वक्र दरवाजे सहा फुटांवर स्थिर ठेवण्यात आले आहे. कोयना नदीवर बांधण्यात आलेल्या कोयना धरणाची साठवण क्षमता 105 टीएमसी … Read more

सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट; कोयना धरणात ‘एवढा’ पाणीसाठा

Patan News 20240727 084937 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात शुक्रवारी पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी धरण पाणलोट क्षेत्रात रात्रभर पावसाची संततधार कायम राहिली असल्याने धरणात पाण्याची अवाक चांगली झाली आहे. कण्हेर, वीर आणि कोयना धरणातील विसर्ग कायम असून सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर कोयना धरणात 82.98 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. मुसळधार पावसाने पश्चिमेकडे हाहाकार … Read more

पाटण तालुक्यातील नागरिकांच्या गैरसोयी होऊ नये याची प्रशासनाने दक्षता घ्यावी; पालकमंत्री शंभूराज देसाई

Patan News 20240727 081545 0000

पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पाटण तालुक्यात देखील पावसाचे प्रमाण खूप आहे. त्यामुळे नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी फिल्डवर उतरून काम करावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रशासनास दिले. पाटण तालुक्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शुक्रवारी घेतला. पाटण पंचायत समितीच्या लोकनेते … Read more

पावसाचा जोर पुन्हा वाढला; कोयना धरणात ‘एवढा’ TMC झाला पाणीसाठा

Koyna Rain News 20240726 215634 0000

पाटण प्रतिनिधी | कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आज पावसाने कमी हजेरी लावली. मात्र, सायंकाळी पाच वाजल्यानंतर पावसाचा जोर पुन्हा वाढल्यामुळ कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे. शुक्रवारी रात्री आठ वाजता आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणामध्ये ८२.०१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. आज सायंकाळी पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने धरणातुन कोयना नदीत उद्या शनिवारी सकाळी ९ वाजता १० … Read more

कोयनानगरमध्ये निवारा शेड उभारून खोल्या उपलब्ध करून द्या; अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडेंच्या प्रशासनाला सूचना

Koynanagr News 20240726 203330 0000

पाटण प्रतिनिधी | कोयना परिसरात मुसळधार पावसाने दहा दिवसांपासून हाहाःकार उडवल्यामुळे निर्माण झाला आहे. पुर परिस्थितीची व नुकसानीची पाहणी अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी केली. या सर्व लोकांना निवाराशेड नवीन बांधून देण्यासाठी कोयना प्रकल्पाने तातडीने खोल्या उपलब्ध करून देण्याची हालचाल करावी, अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी प्रशासनाला दिल्या. तीन वर्षांपूर्वी भूसल्खनग्रस्त असणाऱ्या मिरगाव … Read more

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात संततधार; कोयना धरणात 81.64 TMC पाणीसाठा

Patan News 3 1

पाटण प्रतिनिधी । गेल्या दोन आठवड्यापासून पाटण तालुक्यात मुसळधार पाऊस पडत त्यामुळे कोयना, केरा, काजळी, काफनासह सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पाटण तालुक्यातील अनेक पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहे. दरम्यान, आज कोयना धरण पाणलोट क्षेत्रात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने दुपारी विश्रांती घेतली. पावसाचा जोर कमी झाल्याने कोयना धरणातील पाणी साठ्यात येणाऱ्या … Read more

दिवशी घाटातून जाताय सावधान; जीव मुठीत धरून स्थानिकांना करावा लागतोय प्रवास

Karad News 4

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात हवामान विभागाकडून आज रेड अलर्टचा इशारा देण्यात आला असल्याने जिल्हा प्रशासनाकडून सतर्कता बलागली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्रीच जिल्ह्यातील पर्यटनस्थळे हि दि.२८ रोजीपर्यंत पर्यंतचा बंद केलेली आहेत. कारण या ठिकाणी जाणाऱ्या घटस्त्यावर दरडी कोसळण्याची शक्यता आहे. मात्र, ढेबेवाडी-पाटण रस्त्यावरील दिवशी घाटामध्ये अनेक ठिकाणी दरडी सुटलेल्या आहेत. पावसाचा जोर कायम असल्याने … Read more

कृष्णेची पातळी 38 फुटांवर; कोयनेतून वाढीव विसर्गही स्थगित

Karad News 3 1

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कोयना धरणातील पाणी साठ्यात वाढ होत आहे. दरम्यान, आज हवामान विभागाकडून जिल्ह्यात रेड रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, कोयना धरण क्षेत्रासह जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्यामुळे सातार, कराडकरांना काहीच दिलासा मिळाला आहे. कोयना धरणातून १० हजार क्युसेकने वाढविण्यात येणारा विसर्गही स्थगित … Read more

पोलिसांची हुल्लडबाज पर्यटकांवर कारवाई; पाटणमध्ये 11 गुन्हे दाखल

Patan News 2 2

पाटण प्रतिनिधी | पाटण तालुक्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. पाण्याचे उंचावरून पडणारे धबधबे, ओढे-नाले आणि धरणामुळे मनमोहक हिरवाई पाहण्याचा अनुभव पर्यटकांना मिळतो. त्यामुळे दर पावसाळ्यात हजारो पर्यटक पाटण तालुक्यात चिंब भिजण्याचा आनंद घेण्यासाठी हजेरी लावतात. त्यातच हुल्लडबाज, मद्यपी, पर्यटकांची संख्या सार्वधिक असते. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्याते धबधब्यावर सहलीसाठी येणाऱ्या हुल्लडबाज पर्यटकांना रोखण्यासाठी पाटण … Read more

कराडात कृष्णा घाटाच्या पायऱ्यांना पाणी; कोयना धरणात ‘एवढा’ TMC झाला पाणीसाठा

Karad News 2 1

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कोयना धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. दरम्यान, काल सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फूट उचलून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. यानंतर कोयना धरणातील पाणी कराड येथील प्रीतिसंगम घाटावरील पायऱ्यांना सायंकाळी लागले आणि पायऱ्या पाण्याखाली … Read more

संवेदनशील क्षेत्रातील अदानींच्या प्रकल्पाला कायदेशीर नोटीस; पर्यावरण कार्यकर्ते यांचा पुढाकार

Sushant More News 20240726 095616 0000

सातारा प्रतिनिधी | तारळी येथील अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडद्वारे बांधकामाधीन असलेल्या तारळी पंपिंग स्टोरेज हायड्रो प्रकल्पाच्या कायदेशीरतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पर्यावरण कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी जिल्हाधिकारी सातारा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, वन विभाग तसेच अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. नोटीसमध्ये सुशांत मोरे यांनी प्रकल्पाच्या कायदेशीरतेवर गंभीर प्रश्न उपस्थित … Read more