चौकशी सुरु असतानाच ‘त्यानं’ पोलिसांसमोर स्वतःवर केले वार; पुढं घडलं असं काही…

Karad City Police

कराड प्रतिनिधी । खंडणी प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीने पोलीस ठाण्यातच पोलिसांसमोर स्वतःवर काचेच्या वार करून आत्महत्या करण्याचा धक्कादायक प्रकार कराड शहर पोलीस ठाण्यात केला आहे. या घटनेने पोलीस ठाण्यात धावपळ उडाली तर अखेर पोलिसांनी रात्री उशिरा संबंधित आरोपीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पवन देवकुळे (रा. बुधवार पेठ, कराड) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या आरोपीचे नाव … Read more

कराडचे मुख्याधिकारी खंदारेंची बदली; ‘हे’ अधिकारी पाहणार आता कामकाज

Shanakar khandare News 20230811 101909 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड नगरपालिकेत मुख्याधिकारी टिकेनात अशी सद्या अवस्था झाली आहे. कारण काही महिन्यांपूर्वीच पदभार स्वीकारलेल्या मुख्याधिकारी शंकर खंदारे यांची अकोला महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यामुळे कराड त्यांना नुकतेच मुख्याधिकारी पदावरून कार्यमुक्त करण्याचे आदेश सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने गुरुवारी रात्री देण्यात आले. त्यामुळे खंदारे यांच्या जागी आता फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी … Read more

ग्राम स्वच्छता अभियानात बनवडी ग्रामपंचायत पुणे विभागात प्रथम

Banavadi Gramapachayat News 20230811 001745 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील बनवडी ग्रामपंचायतीने शासनाच्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात पुणे विभागामध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे. यामुळे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गावाचे काैतुक केले आहे. कराड तालुक्यातील बनवडी येथील घनकचरा प्रकल्प हा संपूर्ण राज्यासाठी दिशादर्शक ठरला आहे. आता पर्यंत सातारा जिल्ह्यातील अनेक गावांनी आणि राज्यातील … Read more

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर अचानक साताऱ्यात उतरलं अन त्यानंतर…

Eknath Shinde

सातारा प्रतिनिधी । मागील महिन्यात धुळे शहरात शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री अजित पवार धुळ्याकडे रवाना झाल्यानंतर अचानक पावसाचे सावट आल्याने हेलिकॉप्टरचा मार्ग बदलण्यात आला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्याचे विमान जळगावला उतरवावे लागले होते. पाऊस, धुक्यामुळे धुळे विमानतळावरून सिग्नल न मिळाल्यामुळे अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री … Read more

देवदर्शनाला जाताना Omni Car झाडावर आदळली; अपघातात 3 जण जागीच ठार

Car Accident News 20230810 094958 0000 jpg

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील धोंडेवाडी, ता. खटाव येथील पेट्रोल पंपानजिक सूर्याचीवाडी हद्दीतीतून देवदर्शनासाठी निघालेली ओमिनी कार झाडावर आदळून भीषण अपघात झाला. यामध्ये 3 जण जागीच ठार झाले असून चौघेजण गंभीर जमखी झाले असल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली येथील पांडुरंग देशमुख यांच्या … Read more

दुशेरेत ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त डॉ. अतुल भोसलेंकडून हुतात्मा स्मृती स्तंभास अभिवादन

August Revolution Day in Dushere Karad jpg

कराड प्रतिनिधी । ऑगस्ट क्रांती दिनाच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनेक क्रांतिकारकांनी अनमोल योगदान दिले आहे. त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन तरुण पिढीने काम करावे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी केले. दुशेरे ता. कराड येथील हुतात्मा स्मारक स्तंभाला डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ … Read more

साताऱ्यातील मेडिकल कॉलेजच्या नामाधिकारणाचा विषय मार्गी; राज्य शासनाने दिला ‘हा’ महत्वाचा आदेश

Government Medical College Satara jpg

सातारा प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांपासून सातारा येथील मेडिकल कॉलेजच्या नामांतराबाबत चांगलीच चर्चा केली जात होती. त्यामुळे शासकीय मेडिकल कॉलेजला कोणते नाव दिले जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहगिले होते. अखेर या कॉलेजचा नामाधिकरणाचा विषय आता सुटला आहे. सातारा मेडिकल कॉलेजचे नाव आता छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय असे करण्यात आले आहे. … Read more

साताऱ्यात ऑगस्ट क्रांतिदिनी हुतात्म्यांना साक्षी ठेऊन शहरवासियांनी घेतली शपथ!

Satara August Revolution Day News jpg

सातारा प्रतिनिधी । देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी कारावास भोगला रक्त चालले हजारो स्वातंत्र्य सैनिक शहीद झाले. अशा हौतात्म्य पत्करलेल्या सातारा येथील हुतात्मा स्मारक येथे हुतात्म्यांना अभिवादन करून शहरवासियांनी शपथ घेत ऑगस्ट क्रांतिदिन साजरा केला. ऑगस्ट क्रांती दिनाला अर्थात दि. 9 ऑगस्ट 1942 ला आज 81 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या दिनाचे … Read more

चुकून 3 हजार रुपये ऑनलाईन गेलेले पैसे मागितले म्हणून ‘तिनं’ थेट ‘त्याला’ दिली धमकी; पुढं घडलं असं काही…

Satara Crime News jpg

सातारा प्रतिनिधी । ऑनलाईन पद्धतीने पैसे पाठवताना प्रत्येकजण खूप काळजी घेत असतो. अगदी डोळ्यात तेल घातल्याप्रमाणे ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचा फोन नंबर, पैसे तसेच पासवर्ड चेक करतो. मात्र, चुकून जर एखाद्याला पैसे गेलेच तर ते मागे मिळवण्यासाठी खूप आटापिटा करावी लागते. परंतु, या सर्व गोष्टींमध्ये जर समोरची व्यक्ती समजून घेणारी नसेल तर भांडणही होण्याची … Read more

साताऱ्यात ‘क्रांतीदिनी’ 11 संघटनांनी पुकारला ‘एल्गार’; केली ‘ही’ महत्वाची मागणी

11 Organizations Old Pension demand News jpg

सातारा प्रतिनिधी । जुन्या पेन्शनसह अनेक प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाचे पडसाद सातारा जिल्ह्यातही उमटले. सातारा जिल्ह्यातील संगठीत व असंगठीत क्षेत्रातील कामगारांच्या तब्बल ११ संघटनांनी एकत्र येऊन सातारा शहरातून बाईक रॅली काढली. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर आंदोलन केले. सातारा जिल्ह्यातील ११ संघटनांनी जुनी पेन्शन योजनेबाबत मागणी केल्यानंतर शासनाकडून ती पूर्ण करण्यात आली … Read more

‘ऑगस्ट क्रांती’चा इतिहास 80 वर्षानंतरही जिवंत! साताऱ्याच्या कॉम्रेड दादू रमजूंनी केलं होतं चित्रिकरण

Comrade Dadu Ramju News jpg

सातारा प्रतिनिधी । आजचा दिवस हा जगभरात एक ऐतिहासिक दिवस म्हणून साजरा केला जातो. कारण मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर 8 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधीजी यांनी काँग्रेस अधिवेशनात ब्रिटिशांना ‘चले जाव’चा नारा दिला आणि 9 ऑगस्ट रोजी क्रांतीचा वणवा पेटला. ब्रिटीशांनी कार्यकर्त्यांवर लाठीमार करत नेत्यांची धरपकड केली. त्या ऑगस्ट क्रांतीला आज 81 वर्षे पूर्ण होत … Read more

दिव्यांग कल्याण अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करवे : जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

Collector Jitendra Doodi News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांग कल्याण अभियानाची नुकतीच एक बैठक पार पडली. यावेळी दिव्यांग कल्याण अभियान दिव्यांगाच्या दारी यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. तसेच दिव्यांगांचे सर्वेक्षण व तपासणीसाठी दोन पथके तयार करण्यात यावीत,अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. सातारा येथे पार पडलेल्या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, जिल्हा … Read more