पाटण तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर

Gram Panchayat Elections News jpg

पाटण प्रतिनिधी । राजकीयदृष्टया स्थानिक पातळीवर महत्वाच्या असलेल्या पाटण तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रमी निवडणूक अधिकाऱ्यांनी नुकताच जाहीर केला आहे. त्यानुसार जानेवारी ते डिसेंबर २०२३ या कालावधीत मुदत संपलेल्या पाटण तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असून, थेट सरपंच पदासह सदस्य पदांसाठी पंचवार्षिक आणि २४ ग्रामपंचायतींमधील सदस्य व सरपंच या रिक्त पदांसाठी पोट निवडणुका होत आहेत. … Read more

साताऱ्यातील 14 कोटी 65 लाखांच्या विकास कामांना प्रशासकीय मंजूरी : खा. उदयनराजे भोसले

Satara News 1 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा नगरपरिषदेसाठी शासनाकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन सातारा शहराचा समतोल सर्वंकष विकास साधत विविधांगी सेवा-सुविधा सातारकरांना पुरवण्यावर सातारा विकास आघाडीचा भर राहीला आहे. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीमधुन एकूण 19 अशा सुमारे 14 कोटी 65 लाख रुपयांच्या विकास कामांना प्रशासकीय मंजूरी मिळाली असल्याची माहिती खा. उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे. . … Read more

छत्रपती शिवाजी महाराज सोडले तर कोणत्या राजाने वाघनखांनी कोथळा काढलाय? : आ. शिवेंद्रराजे भोसले

Shivendraraje Bhosale News jpg

सातारा प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनख्यांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला याची इतिहासात नोंद आहे. त्यांच्या व्यतिरिक्त अन्य कुठल्याच राजाची अशी नोंद कुठेही आढळून येत नाही. याचाही कुठेतरी विचार करायला हवा. जो काही चुकीचा इतिहास पसरवला जातोय तो थांबविण्यासाठी श्री रामदासस्वामी संस्थान व आपल्या सर्वांच्या माध्यमातून प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा भाजप आमदार शिवेंद्रराजे यांनी व्यक्त … Read more

प्रतापगड आज साजरा होणार शूरवीर जिवाजी महाले यांचा जयंती उत्‍सव !

Jiwa Mahal News 20231009 095915 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | शूरवीर जिवाजी महाले यांचा जयंती उत्‍सव आज दि. ९ ऑक्‍टोबर या दिवशी सर्वत्र साजरा केला जातो. दरम्यान आज सातारा जिल्ह्यातील प्रतापगड येथे जयंती उत्सव साजरा केला जाणार आहे, अशी माहिती ‘स्‍वाभिमानी नाभिक संघटने’चे राज्‍याध्‍यक्ष शंकरराव गायकवाड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या अश्‍वारूढ मूर्तीचे आणि शूरवीर जिवाजी महाले यांच्‍या प्रतिमेचे … Read more

Satara News : गाढव चावल्याने चिमुरडी जखमी; गाढवाच्या मालकावर गुन्हा दाखल

Donky News 20231009 091843 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | आतापर्यंत आपण कुत्रा किंव्हा साप चावल्याच्या घटना एकल्या असतील. मात्र, आता चक्क एका पाळीव गाढवाने चावा घेतल्याने एक अडीच वर्षाच्या चिमुकली जखमी झाल्याची घटना खटाव तालुक्यातील मायणी येथे घडली आहे. या घटनेप्रकरणी गाढवाच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहिरा मोहसीन मुजावर (वय 2.5 रा. मायणी, ता. खटाव) असे मृत्यू झालेल्या चिमुरडीचे … Read more

“मी पवारांचा चमचा नाही, माझ्या नादाला लागू नका”; आ. जयकुमार गोरेंचा नेमका कुणाला इशारा?

Jaykumar Gore News 20231008 110720 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | मी तालुक्‍यात आलो तेव्हाही चांगली गाडी घेऊनच आलो होतो. माझे जे काही आहे ते व्यवसायातून आणि खुल्या किताबाप्रमाणे आहे. मी प्रांत, कलेक्‍टर, आयुक्त, सचिव आणि पवारांचा चमचा नाही. पवारांनी माझी पाच वेळा चौकशी लावली होती. मात्र, ज्या दिवशी तुमची चौकशी लावू त्यादिवशी तुमची जागा कुठे असेल याचा विचार करा. जयकुमारला डिवचू नका. … Read more

माहिती न देणं पडलं महागात; ग्रामविकास अधिकाऱ्यास 25 हजारांचा दंड

Shirval Grampachayat News 20231008 095519 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | एखादा प्रशासकीय अधिकारी अथवा कर्मचारी आल्यास तो कामावर असताना त्याला त्याच्याकडे माहिती मागायला आल्यास ती देणे आवश्यक असते. मात्र, अनेकवेळा काही अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून लोकांना माहितीच दिली जात नाही. नंतर त्याचा चांगला परिणाम त्या अधिकारी, कर्मचाऱ्यास सहन करावा लागतो. अशीच घटना खंडाळा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील समजल्या जाणा-या शिरवळ ग्रामपंचायतीमध्ये घडली. येथील ग्रामविकास अधिकारी … Read more

वेळ आली तर लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदी हिटलरप्रमाणे वागतील; डॉ. प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

Prakash Ambedkar targeted Narendra Modi News 20231008 090025 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हिटलरने केले ते सगळे करतील यात शंका नाही. दिवाळीपूर्वी अटकसत्र सुरू होणार असून, ते निवडणुकीपर्यंत राहील. गोध्रा हत्याकांड, मणिपूर दंगल घडली, त्याप्रमाणे पुन्हा घडण्याची शक्यता आहे, असा आरोप ‘वंचित’चे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी करीत पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. संविधान जनजागृती विचारमंचतर्फे काल अ‍ॅड. प्रकाश … Read more

वाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाची हॉटेलवर धाड; हॉटेल चालकासह 10 जणांना अटक

Wai Crime News 20231008 081350 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | राज्य उत्पादन शुल्क विभागाने शहाबाग फाटा ता. वाई जि. सातारा गावचे हद्दीत वाई सुरूर रस्त्यावर असलेल्या धनश्री हॉटेल येथे शुक्रवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास अचानक धाडी टाकली. यामध्ये हॉटेल चालकासह 10 जणांना ताब्यात घेतले तसेच त्यांच्याकडून टेबले, खुर्च्या, विविध विदेशी दारुच्या बाटल्या असा एकूण 6 हजार 585 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. … Read more

साताऱ्यात पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या पत्रकार परिषदांवर बहिष्कार; पत्रकारांना उध्दट उत्तरे दिल्याने निर्णय

Shambhuraj Desai News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा येथे काल जिल्हा शासकीय क्रांतीसिह नाना पाटील रुग्णालयात आयोजित पत्रकार परिषदेवेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यात व प्रसिद्धीमाध्यम प्रतिनिधींच्यामध्ये वादावादीचे घटना घडली. शंभूराजे देसाई यांनी शुक्रवारी साताऱ्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांशीच हुज्जत घातली. प्रश्नाची माहिती न घेता पत्रकारांनाच आपला प्रश्न अपुऱ्या माहितीच्या आधारे आहे असा प्रतिप्रश्न करण्याचा … Read more

कोयना वसाहत येथे स्व. जयवंतराव भोसले स्मृती उद्यान कामाचे भूमिपूजन उत्साहात

Koyna Colony News jpg

कराड प्रतिनिधी । कोयना वसाहत, ता. कराड येथे स्व. जयवंतराव भोसले स्मृती उद्यान साकारण्यात येणार आहे. या नियोजित स्मृती उद्यानाचे भूमिपूजन कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले. कोयना वसाहत येथील ग्रामपंचायतीच्या प्रांगणात सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्या नावाने स्मृती उद्यान साकारले जाणार आहे. यावेळी डॉ. भोसले म्हणाले की, गावाच्या … Read more

Satara News : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजने अंतर्गत सातारा जिल्ह्यात 1 कोटींचे वितरण

Agriculture News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । राज्य शासनाने 18 एप्रिल 2023 पासून रोजी विमा कंपनी विरहीत योजनेची निर्मिती करून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना या नावाने नवीन योजना राज्यामध्ये सुरु केली आहे. या योजनेत अपघाती मृत्यूसाठी 2 लाख रुपये तर अपघाती अपंगत्वासाठी 1 लाख रुपये संरक्षण देण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यातील दि. 18 एप्रिल ते … Read more