अज्ञात वाहनाच्या धडकेत शिरवळ येथील तरुण ठार; वाहन चालक पसार

Accident at Shirwal

कराड प्रतिनिधी । पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सातारा येथील कणसे ढाब्यासमोर अज्ञात वाहनाने एका दुचाकीला जोरात धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील रघुनाथ विठ्ठल मोपरे (वय 31, रा. शिरवळ, ता. खंडाळा) हा तरुण ठार झाला. हि अपघाताची घटना सोमवारी घडली असून पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिरवळ येथील रघुनाथ मोपरे … Read more

नवविवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासूवर गुन्हा दाखल

jpg 20230625 232804 0000

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील विंग येथे नवविवाहितेने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली होती. या घटनेप्रकरणी विवाहितेच्या पतीसह सासूवर कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मृत विवाहितेची आई मिना अरुण कांबळे (रा. रविवार पेठ, बीड) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. यावरून पती अनिकेत अंकूश माने व सासू राणी अंकूश माने (रा. … Read more

पोलीस मुख्यालयातील महिला पोलिस कॉन्स्टेबलची आत्महत्या; नेमकं कारण काय?

20230627 080909 0000

कराड प्रतिनिधी : मुंबई पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या विवाहित महिला कॉन्स्टेबलने सासरच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सातारा जिल्ह्यातील फलटणमधील नागेश्वरनगर – चौधरवाडी येथे घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. ऋतुजा सुशांत रासकर (वय २२), असे आत्महत्या केलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी ऋतुजा यांचे सासरे बाळू रासकर यांनी फिर्याद दिली … Read more

5 वर्षापासून वेषांतर करून देत होता चकवा; अखेर कराड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Karad City Police

कराड प्रतिनिधी । एका गुन्ह्यातील आरोपी गेल्या पाच वर्षांपासून पोलिसांना चकवा देत होता. काढो तो वेषांतर करायचा तर कधी लपून-छपून पोलिसांसमोरून निघून जायचा. अशा पाच वर्षांपासून चकवा देत फिरत असलेल्या खटाव तालुक्यातील आरोपीला कराड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. साजन किर्लोस्कर शिंदे (रा. सिद्धेश्वर कुरोली, ता. खटाव) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी … Read more

मैत्रिणीला उपचारासाठी घेऊन गेला, दवाखाना बंद असल्याचे पाहताच त्यानं बंदुकीतून झाडली गोळी; पुढं घडलं असं काही…

Satara Crime News 2

कराड प्रतिनिधी । मैत्रिणीच्या हाताला जखम झाल्याने तिला दवाखान्यात घेऊन गेलेल्या तरुणाने दवाखाना बंद असल्याचे पाहताच बंदुकीतून गोळी झाडली. मात्र, सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. ही धक्कादायक घटना साताऱ्यातील कोडोली परिसरात रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नेताजी बोकेफोडे … Read more

Satara News : ट्रॅक्टर ट्राॅली कालव्यात कोसळून 4 महिलांचा बुडून मृत्यू, 2 महिलांची प्रकृती गंभीर

Satara News

Satara News | साताऱ्यातील कारंडवाडीत मोठी दुर्घटना घडली आहे. शेतातून घरी परत येताना ट्रॅक्टर ट्राॅली कण्हेर उजव्या कालव्यात कोसळून एकाच गावातील चार महिलांचा बुडून मृत्यू झाला आहे तर पाण्यात बुडालेल्या दोन महिलांना वाचविण्यात यश आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. कारंडवाडी गावावर शोककळा कारंडवाडी गावातील चार महिलांच्या अपघाती मृत्युने संपूर्ण … Read more

लग्नात खाऊन-पिऊन चोरट्यानं मारला दागिन्यांवर डल्ला

Crime News

कराड प्रतिनिधी । सनई चौघड्याचा आवाज, सर्वत्र पाहुण्यांचा गोंधळ, एकमेकांच्या सोबत बोलण्यात, भेटीगाठी घेण्यात दंग असलेल्या लग्नसोहळ्यात अज्ञात चोरट्याने अगदी जेवणाचा आस्वाद घेऊन तब्बल 3 लाख 14 हजारांचे दागिने लंपास केल्याची घटना सातारा तालुक्यातील वर्ये या ठिकाणी शुक्रवार, दि. 23 रोजी घडली. याप्रकरणी अज्ञातावर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी … Read more

लाईट जाताच चोरटयांनी घातला धुमाकूळ; 7 ठिकाणी दागिन्यांसह नवीन कपड्यांवर मारला डल्ला

Crime News 1

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यात ग्रामीण भागात चोरटयांकडून सध्या चांगलाच धुमाकूळ घातला जात आहे. रात्रीच्यावेळी चोरट्याकडून रोकड, सोने चांदीच्या दागिन्यांसह नवीन कपड्यांवर डल्ला मारला जात आहे. अशीच घटना कराड तालुक्यातील येळगाव येथे शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. या ठिकाणी अज्ञात चोरटयांनी ७ ठिकाणी घरफोडी करुन रोकड, सोने चांदीच्या दागिन्यांसह नवीन कपड्यांवर डल्ला मारला. रात्रीच्यावेळी लाईट … Read more

अगोदर मोबाईलवर ठेवला स्वतःच्या श्रद्धांजलीचा स्टेटस; नंतर नवविवाहित तरुणानं केलं असं काही…

Suicide , Crime News

कराड प्रतिनिधी । दोन महिन्यापूर्वी लग्न झालं. खासगी वाहनचालकाची नोकरी करून स्वप्नील आपला संसार चालवत होता. बायको माहेरी गेल्यानंतर त्याने मोठा निर्णय घेतला. मोबाईलवर स्वतःच्या श्रद्धांजलीचा स्टेटस ठेऊन राहत्या घरात गळफास घेवून स्वप्नीलने आत्महत्या केली. पाटण तालुक्यातील करपेवाडी गावात घडलेल्या या खळबळ उडाली आहे. स्वप्नील उर्फ बंटी दिनेश करपे (वय 22), असे नवविवाहित तरुणाचे नाव … Read more

सातारा पोलिसांची पुन्हा वेशांतर करुन कारवाई; वारकरी बनून पालखीत गेले अन्…

Crime News 1 1

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात मोठ्या भक्तिभावाने श्री संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे भाविकांनी दर्शन घेतले. पालखी सोहळा जिल्ह्यात आल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली होती. पालखी सोहळ्यावेळी चोरीचे प्रकार होणार असल्याचे गृहीत धरत 7 वारकरी वेशातील पथके अंमलदारांसह लक्ष ठेऊन होते. संबंधित वारकरी वेशांतर करून वारीमध्ये बेशिस्तरीत्या वर्तन करताना … Read more

CM एकनाथ शिंदेंच्या गावालगत पूल कोसळला; 3 जण गंभीर जखमी

Eknath Shinde News

कराड प्रतिनिधी । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस झाले सातारा जिल्ह्यातील दरे या त्यांच्या मूळ गावी आले आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या गावालगत असलेल्या शिंदी ते आरवला या दोन गावांना जोडणारा पूल कोसळून अपघात झाल्याची घटना 2 दिवसांपूर्वी घडली आहे. या अपघातात 3 ग्रामस्थ गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खेड येथे दाखल करण्यात आले. तसेच … Read more

उदयनराजेंसह 50 जणांवर गुन्हा दाखल; दमदाटी, मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी फिर्याद

Udayanraje Bhosale

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडकेभाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासह ५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमावरून उदयनराजे आणि शिवेंद्रराजे या दोन्ही गटामध्ये जोरदार राडा झाला. शिवेंद्रराजे यांच्या हस्ते पार पडणारे भूमिपूजन उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावलं. स्वतः उदयनराजे यांच्या उपस्थितीत सदर ठिकाणी असलेला कंटेनरहि कार्यकर्त्यांकडून पलटी … Read more