पत्नी गौरीचा बंगळूरमध्ये खून करून पळून निघालेल्या पती राकेशला शिरवळ पोलिसांनी ठोकल्या बेड्या

0
3012
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । मुंबईतून एक महिन्यापूर्वी बंगळूर – कर्नाटक येथे राहण्यासाठी पत्नी गौरीसह गेलेल्या पती राकेश याने गौरी हिची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना बुधवारी घडली. पत्नी गौरीची चाकूने भोकसून हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून तो बथरूममध्ये ठेऊन मुंबईच्या दिशेने पळून निघालेल्या आरोपी राकेश खेडेकर याला शिरवळ पोलिसांनी शिरवळ हद्दीत गुरुवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. यावेळी विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याच्या विचारात असलेल्या राकेशला शिरवळ पोलिसांनी पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर राकेशला बंगळूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पत्नीचा खून केल्यानंतर पती राकेशने स्वतः विषारी औषध प्राशन करुन स्वतः ला संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिरवळ पोलिसांनी वेळीच त्याला ताब्यात घेतले आणि चौकशी अंती त्याने पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली.

राकेश राजेंद्र खेडेकर (वय 35, रा. जोगेश्वरी मुंबई) असे आरोपी पतीचे नाव आहे तर गौरी सांबरेकर (वय 32) असे हत्येत मृत्यू झालेल्या पत्नीचे नाव आहे. याबाबत शिरवळ पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, राकेश राजेंद्र खेडेकर (वय 36) पती आणि त्याची पत्नी गौरी सांबरेकर (वय 32) हे दोघे मुंबईत राहत होते. महिनाभरापूर्वीच राकेश आणि गौरी हे दोघे बंगळुरुला राहायला गेले होते. हे दोघे दक्षिण बंगळुरुतील दोड्डकम्मानहल्ली परिसरातील एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होते. राकेश हा एका खासगी सॉफ्टवेअर कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून व सध्या वर्क फ्रॉम होमचे काम करीत होता तर त्याची पत्नी गौरी जॉबच्याअ शोधात होती.

दि. 26 मार्च रोजी रात्री राकेश याच्याकडे पत्नी गौरी हिने पुन्हा मुंबईला जाण्याचा आग्रह धरला. दोघांच्यामध्ये सुरुवातीला शाब्दिक वाद झाला. नंतर गौरी घरातील भांडी आपटू लागली. तेव्हा पती राकेशने आपण आता राहत असलेल्या रूमचे डिपॉझिट भरलेले आहे. आपण जर रूम सोडली तर डिपॉझिटचे पैसे मिळणार नाहीत व येथे येण्यासाठी खूप खर्च झाला आहे. असे तिला समजावीत होता. तरीही गौरी ही त्याचे ऐकत नसल्यामुळे त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. शेवटी पत्नी सौ गौरी हिने घरातील चाकू घेऊन राकेशला मारण्याची भीती दाखवली. त्याचा राग राकेशला आल्याने राकेशने तिच्या हातातील चाकू घेऊन पत्नी गौरीचे मानेवर, गळ्यावर पाठीवर चाकूने वार केले व तिचा खून करून राकेश मुंबईकडे रवाना झाला. यावेळी त्याला शिरवळ पोलिस ठाण्याच्या पोलीसांनी गुरुवारी रात्री उशिरा बारा वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले.

सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक सातारा श्री.समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत कृष्णा नलावडे, पोलीस हवालदार कुंभार, नलावडे, धुमाळ, मोहरे पोलीस शिपाई दीपक पाले पवार व होमगार्ड याच्या पथकाने केली.

हत्येनंतर गौरीचा मृतदेह बॅगेत ठेवला…

गौरी जखमी अवस्थेत घराचे लॉबीमध्ये निपचिप पडली. त्यानंतर राकेशला तीचा मृत्यू झाल्याची खात्री झाली. त्यानंतर राकेशने घरातील मोठी बॅग रिकामी करून त्यामध्ये पत्नी गौरीचा मृतदेह ठेवून बॅगेची चेन लावली व ती बॅग घरातील बाथरूम बाहेर नेऊन ठेवली. त्यानंतर दि. 27 मार्च रात्री 12 वाजण्याच्या सुमारास राकेश त्याचे साहित्य सोबत घेऊन त्याचे मालकीची कार घेऊन जोगेश्वरी मुंबई येथे जाण्याकरता बेंगलोर येथून रवाना झाला.

खून केल्यानंतर फोन करून वडिलांना दिली माहिती

पत्नीचा खून केल्यामुळे राकेशला टेन्शन आले. त्याने महाराष्ट्रातील कागल या गावी आल्यावर एका मेडिकल दुकानांमधून हार्पिक सनीफीनाईल व झुरळ मारण्याचे औषध घेतले. कोल्हापूर ते कराड येथे प्रवास करीत असताना राकेशने त्याचे बेंगलोर येथील इमारतीमधील खालचे मजल्यावर राहणाऱ्या इसमाला व मुंबईत राहणाऱ्या वडिलांना फोन करून गौरीचा आपण खून केला असून तिचा मृतदेह बॅगेत ठेवल्याची माहिती दिली.

खंबाटकी घाट उतरताच राकेशने कीटकनाशकाचे केले प्राशन

पत्नी गौरीची हत्या केल्यानंतर मुंबईला निघालेला राकेश सातारा जिल्ह्यतील खंडाळा तालुक्यातील खंबाटकीचा घाट उतरल्यावर शिरवळ येथील निप्रो कंपनीजवळ महामार्गावर कार घेऊन आला. यावेळी त्याला केलेल्या खुनाचे टेन्शन आल्याने त्याने विकत घेतलेले सर्व कीटकनाशक व औषधे एकत्र करून प्राशन केले. त्यानंतर त्याला याचा त्रास होऊ लागल्याने राकेश कारमधून बाहेर येऊन रस्त्यावर बसला. राकेश याला पाहून एका दुचाकीस्वाराने त्याची विचारपूस केली. त्यावेळी त्याने विषारी औषध पिल्याची माहिती दिली. दुचाकीस्वाराने हे एकटाच राकेशला तात्काळ त्याच्या कारमधून शिरवळ येथील जोगळेकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.

चौकशीत खून केल्याची दिली कबुली

यानंतर याची माहिती शेरवळ पोलिसांना देण्यात आल्यानंतर त्याठिकाणी शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार कुंभार यांनी राकेशकडे अधिक चौकशी केली असता त्याने पत्नी गौरीचा खून केल्याची माहिती दिली. यानंतर पोलीस हवालदार कुंभार यांनी शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांना माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक नलावडे जोगळेकर हॉस्पिटलमध्ये इतर पोलिसांसह दाखल झाले. त्यांनी राकेशकडून आवश्यक माहिती घेऊन पोलीस अधीक्षक समीर शेख यांना घडलेलया प्रकाराबाबत सविस्तर माहिती दिली. पोलीस अधीक्षक शेख यांनी तात्काळ बेंगलोर येथे संपर्क करून गौरीचे खुणाबाबत खात्री केली. तसेच तेथील संबंधित वरिष्ठ अधिकारी पोलीस स्टेशन इन्चार्ज व इतर संबंधितांचे फोन नंबर पोलीस निरीक्षक नलावडे यांना पुरविले व पुढील तपासकामी सूचना दिल्या.

खुनानंतर पळून जाऊन औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न

अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर, पोलीस उपविभागीय अधिकारी फलटण विभाग फलटण श्री. राहुल धस यांना राकेशच्या प्रकरणाबाबत माहिती दिली. त्यानंतर राकेशचे नातेवाईक व बेंगलोर येथील पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क करून त्यांना आरोपीबाबतची व उपचार बाबतची माहिती दिली. राकेशला अधिक उपचाराची गरज असल्याने त्याला तात्काळ पोलिसांनी भारतीय विद्यापीठ हॉस्पिटल व त्यानंतर ससून हॉस्पिटल पुणे येथे उपचारा करता दाखल केले. बंगळूर येथील संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी ससून हॉस्पिटल येथे जाऊन आरोपी राकेशल ताब्यात घेतले. आरोपी राकेश हा पळून जाण्याच्या व नंतर विषारी कीटकनाशके पिऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होता. परंतु त्याला शिरवळ पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेत दवाखान्यात दाखल केले.