सातारा प्रतिनिधी । सातारा शहरात वाढत असलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांमागील चोरटयांना अटक करण्याचे आव्हान पोलिसांपुढे असताना शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि. 21 डिसेंबर रोजी दुचाकी चोरीची घटना घडली होती. यानंतर पोलिसांनी या चोरीचा अधिक तपास करत एकास अटक केली.
चैतन्य अशोक मते (रा. 385 सोमवार पेठ, सातारा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शाहूपुरी पोलीस मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी यांनी पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या स्टाफला मोटारसायकल चोर इसमांवर कारवाई करणे बाबत मार्गदर्शन करुन सुचना दिलेल्या होत्या.
दि. 28 डिसेंबर रोजी शाहुपूरी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार हे मोटारसायकल चोरीच्या गुह्यातील संशयीत इसमाचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर संशयीत इसम हा सातारा एस.टी.स्टँड परिसरात असल्याबाबत माहिती प्राप्त झाली. त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार यांनी सदर परिसरात जावुन संशयीत इसमाचा शोध घेतला असता तो मोटारसायकलसह मिळुन आला. सदर इसमास मोटारसायकलसह ताब्यात घेवुन त्याचेकडे कौशल्यपुर्वक चौकशी केली असता त्याने नमुद गुन्ह्यातील मोटारसायकल चोरी केलेची कबुली दिली. अशाप्रकारे शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने शाहुपुरी पोलीस ठाणे गु.र.नं.564/2023 भा.द.वि.सं.क.379 हा गुन्हा उघडीस आणला आहे. सदर गुन्हाचा तपास दादा राजगे पो.हवा.ब.नं.907 हे करित आहेत.
अशाप्रकारे शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोटारसायकल चोरीतील आरोपीस गोपनिय व तांत्रिक माहितीचे आधारे ताब्यात घेवुन त्याचेकडुन 55,000/- रुपये किंमतीचा मोटारसायकल हस्तगत करुन मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी, पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार सुरेश घोडके, मनोज मदने, निलेश काटकर, जोतीराम पवार, महेश बनकर, अभय साबळे, सुमित मोरे, सचिन पवार, स्वप्निल पवार, स्वप्नील सावंत, सुनिल भोसले यांनी केली आहे.