पाऊस पडताच जिल्ह्यातील 77 गावे अन् 263 वाड्यांतील टॅंकर झाले बंद मात्र, ‘इतक्या’ गावात 148 टॅंकर सुरूच

Satara News 63

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सध्या सर्वत्र पाऊस पडत आहे. त्यामुळे दुष्काळी तालुक्यात सुरु असलेली टॅंकरची संख्या कमी झाली आहे. सध्या जिल्ह्यातील १४१ गावे आणि ४५३ वाड्यांत पाणी टंचाईची स्थिती असून या गावात १४८ टॅंकरने तहान भागवण्याचे काम सुरु आहे. २ लाख १७ हजार ५९१ नागरिक आणि १ लाख ५५ हजार ७४० पशुधनास टँकरने पाणी … Read more

रात्रीत लांडग्याच्या टोळीचा 15 शेळ्या मेंढरांवर हल्ला; ‘या’ गावात घडली घटना

Satara News 40

सातारा प्रतिनिधी । लांडग्याच्या टोळीने एकत्रितपणे सुमारे १५ शेळ्या मेंढरांवर हल्ला केल्याची घटना म्हसवड येथील शिंदे वस्ती येथे शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात सुमारे १५ शेळ्या आणि मेंढरांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, घटनास्थळाचा अधिकाऱ्यांकडून पंचनामा करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, म्हसवड येथील विरकरवाडी नजिक शिंदे वस्ती आहे.या वस्तीवर धनाजी शिंदे यांनी … Read more

पहाटे 5 च्या सुमारास आयशर कंटेनरला अचानक आग लागली; लाखो रुपयांचे नुकसान

Crime News 20240603 073445 0000 1

सातारा प्रतिनिधी | खटाव तालुक्यातील चोराडे येथील नांगरे वस्तीनजीक रविवारी पहाटे 5 च्या सुमारास आयशर कंटेनरला (एमएच-11-डीडी-6871) अचानक आग लागली. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही. मात्र, कंटेनरचे 22 ते 25 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेत चालक सूर्यकांत सदाशिव यादव हे जखमी झाले आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पॅकिंगचे साहित्य भरलेला कंटेनर … Read more

जिल्ह्याच्या पश्चिम भागालाही टंचाईच्या झळा; 3 लाख लोकांची तहान भागतेय टँकरवर

Satara News 2024 05 13T141323.067

सातारा प्रतिनिधी | पावसाने ओढ दिल्यामुळे या वर्षीची पाणी टंचाई जिल्ह्याच्या पूर्व भागाबरोबरच पश्चिम भागालाही जाणवत आहे. कराड, पाटण तालुक्यातही काही गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला आहे. कराड तालुक्यात 4, तर पाटण तालुक्यातही 9 आणि वाई तालुक्यात 4 टँकर सुरू आहेत. याशिवाय अनेक गावांतून टँकरची मागणी नसली तरी त्या ठिकाणी पाण्याचा ठणठणाट आहे. संपूर्ण जिल्ह्यात … Read more

कोण कुणाशी कधी लग्न करतं अन् कधी घटस्फोट घेतं…; पक्ष फोडाफोडीवर गडकरींच वक्तव्य अन् सारवासारव

Nitin Gadkari News 20240504 210007 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील दहिवडी येथे महायुतीच्यावतीने आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जाहीर सभा घेण्यात आली. या सभेस भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील पक्ष फोडाफोडीवर सडेतोड मत मांडलं. मात्र, लगेचच त्यांनी सारसारव करण्याचा प्रयत्न केला. प्रचारसभेत मंत्री गडकरी म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रात अमेरिकन संस्कृती … Read more

सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई; 786 गावांना 177 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

Katav News 20240430 104729 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. सध्या जिल्ह्यातील ७८६ गावांना १७७ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. माण, खटाव, फलटण, कोरेगाव या चार तालुक्यांत प्रामुख्याने टंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील गाय, म्हैस, शेळी, मेंढी अशा एकूण १२ लाख २९ हजार ५८५ जनावरांपैकी ७० टक्के जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी … Read more

खटाव तालुक्यात टंचाईची दाहकता वाढली; ‘इतक्या’ गावात टँकरने पाणीपुरवठा

Khatav News 20240421 143856 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | दुष्काळी खटाव तालुक्यात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. नेर सोडून तालुक्याच्या पूर्व भागातील येरळवाडीसह सर्वच तलाव, धरणे आणि बहुतांश विहिरी कोरड्या ठाक पडल्या आहेत. प्रशासनाकडून ३० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. 11 गावांना विहिरी आणि कूपनलिका अधिग्रहित करून पाणी पुरवले जात आहे. पशुधनाच्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांना धावाधाव करावी लागत असून पशुपालक मेटाकुटीला … Read more

सातारा जिल्ह्यात टँकरची वाटचाल दीड शतकाकडे; 8 तालुक्यांना ‘इतक्या’ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Water News 20240403 185013 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील पाणीटंचाई दिवसेंदिवस भीषण होऊ लागली आहे. जिल्ह्यात एकूण ११ तालुक्यांची संख्या आहे. या तालुक्यांपैकी ८ तालुक्यांत सद्या टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. जिल्ह्यात १३७ गावे व ४३५ वाड्या-वस्त्यांवरील २ लाख ४२ हजार २५१ जनतेस १४८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. माण तालुक्यात सर्वाधिक ७५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. सातारा जिल्ह्यात … Read more

वाळू उपशावर कारवाईसाठी गेलेल्या सर्कल अन् तलाठ्याच्या अंगावर जेसीबी घालून खुनाचा प्रयत्न

Crime News 20240402 091117 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | नढवळ (ता. खटाव) गावच्या हद्दीत येरळवाडी धरण क्षेत्रातून बेकायदा वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या निमसोडच्या मंडलाधिकाऱ्यासह तलाठ्याला मारहाण करून जेसीबी अंगावर घालत खुनी हल्ला केल्याप्रकरणी वडूजच्या सात वाळूमाफियांविरोधात वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. निमसोड विभागाचे मंडलाधिकारी शंकर चाटे (सध्या रा. वडूज, मूळ रा. खापरतोंड, ता. अंबाजोगाई, जि. बीड) यांनी फिर्याद … Read more

विजापूरहून आलेला 13 लाखांचा गुटख्याचा साठा पोलिसांनी केला जप्त

Crime News 20240328 174539 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | विजापूरहून सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्याकडे नेण्यात येणाऱ्या अवैध सुगंधीत तंबाखु, पानमसाला आणि गुटख्याचा ५१ पोत्यांचा सुमारे १३ लाख ६५ हजाराचा साठा विटा पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी संबंधित चारचाकी गाडीसह चालक ऋषिकेश चंद्रकांत कदम (वय २२, रा. दारुज ता.खटाव, जि. सातारा) यास विटा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर त्यांच्याकडील मुद्देमालासह गाडीही जप्त … Read more

50 हजाराची लाच घेताना वडुजचा उपविभागीय अभियंता ‘जाळ्यात’; ACB विभागाची कारवाई

Crime News 20240327 082834 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा रोजगार हमी योजनेतील चार कामे पूर्ण केल्याचा दाखला देण्यासाठी बिलाच्या दोन टक्क्याप्रमाणे ६८ हजार रूपये लाचेची मागणी करून ५० हजार रूपयाची लाच स्वीकारताना जिल्हा परिषद बांधकाम विभागातील उपविभागीय अभियत्यास सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. जितेंद्र राजाराम खलिपे (रा. पेडगाव रोड, वडूज, ता. खटाव), असे लाचखोर अभियत्याचे नाव आहे. याबाबत लाचलुचपत … Read more

सर्वांत जास्त ऊस गाळपात जिल्ह्यातील ‘या’ कारखान्याने मिळवला दुसरा क्रमांक

Satara News 20240326 092917 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | राज्यातील सर्वांत जास्त उसाचे गाळप करण्याचा मान पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे येथील बारामती अॅग्रो प्रा. लि. या कारखान्याने १८ मार्च अखेर मिळवला असून या कारखान्याने तब्बल २१ लाख ३५ हजार ७२१ मेट्रीक टन उसाचे गाळप केले आहे. त्यापाठोपाठ सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर शुगर मिल्स प्रा. लि. या साखर कारखान्याने १८ … Read more