सातारा प्रतिनिधी | श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे उद्या दि.०६/०७/२०२४ रोजी सातारा जिल्ह्यात आगमन होणार आहे. दि.११/०७/२०२४ रोजी कालावधीमध्ये सातारा जिल्हयातून लोणंद, तरडगाव, फलटण, बरड या मार्गाने पालखी मार्गक्रमन होणार आहे. दि.०६/०७/२०२४ रोजी निरा पुल येथे श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे सातारा जिल्हयात आगमन होणार असून नमुद पालखी सोहळ्यास सुमारे ५ ते ६ लाख वारकरी भाविक उपस्थित राहणार आहेत.
श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी श्री.संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यास येणाऱ्या वारकरी व भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोचरताचे विशेष प्रकारे नियोजन केले आहे. नमुद पालखी सोहळ्याकरीता पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक पदाचे एकूण ८० अधिकारी व ८०० पोलीस अंमलदार यांची बंदोबस्ताकरीता नियुक्ती करण्यात आलेली आहे.
श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा बंदोबस्ताकरीता चहुसंख्य पोलीस अधिकारी व अंमलदार यांची नियुक्ती करण्यात येते. बंदोबस्ताकरीता बहुसंख्येने हजर असणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या कर्तव्याचे नियोजन करण्याकरीता मोठ्या प्रमाणावर मनुष्यचळ खर्ची पडते, तसेच पालखी सोहळयामध्ये मोठया प्रमाणावर वारकरी भाविक यांची गर्दी असते यामध्ये पोलीस अंमलदार यांची हजेरी घेण्यास खूप वेळ वाया जातो. वा सारासार गोष्टींचा विचार करुन वेळेचा अपव्यय टाळण्याकरीता श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती ऑचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी पोलीस चंदोबस्ताचे योग्य प्रकारे नियोजन करण्याकरीता डिजीटल अॅप तयार करण्यात आले असून त्याच्या अधारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या कर्तव्याचे नियोजन करण्यात आले आहे.
पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्याकरीता तयार करण्यात आलेले डिजीटल अॅपची लिंक सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पाठविण्यात आली असून, त्या लिंकच्या आधारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी हजर असणाऱ्या ठिकाणी सेल्फी काढल्यानंतर त्या ठिकाणचा Latitude (अक्षांश), Longitude (रेखांश) च्या माहितीची नोद होणार आहे. तद्नंतर सेल्फी व जिओ टॅगिंगच्या माहितीची तुलना होवून नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार बंदोबस्ताचे ठिकाणी हजर असल्याबाबतचा मेसेज त्याचे मोबाईल नंबरवर येणार आहे.