सातारा जिल्ह्यास आज – उद्या ऑरेंज अलर्ट; कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग

0
685
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । राज्यासह सातारा जिल्ह्यात सध्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. राज्यभर पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. हवामान विभागाने पुढील चार दिवस संपूर्ण राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे सध्या राज्यात सर्वत्र पावसाची संततधार सुरू आहे. आज पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, रायगड, भंडारा, गोंदिया, नाशिक आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’ आहे. दरम्यान, पावसामुळे कोयना धरणातील पाणी साठ्यात देखील वाढ झाली असल्या कारणामुळे धरणातून पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात आला आहे. परिणामी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील चालू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. कोयना धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी काल रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास धरण पायथा विद्युतगृहाचे दुसरे युनिट सुरू करून १०५० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे. कोयना, नवजा, महाबळेश्वर या तिन्ही ठिकाणी पावसाचा जोर कायम असल्या कारणाने धरणांतर्गत विभागातील छोट्या नद्या, नाले, ओढे, धबधबे यातून सध्या सरासरी प्रतिसेकंद २५ हजार ७७६ क्यूसेक्स पाण्याची आवक कोयना धरणात होत आहे.

परिणामी कोयना धरणातील पाणीसाठ्यात देखील वाढ होत आहे. सध्या कोयना धरणात एकूण ६७.२० टीएमसी उपलब्ध तर ६२.२० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. धरणातील पाणी उंची समुद्रसपाटीपासून २,१२६.९ पफूट तर जलपातळी ६४८.२३३ मीटर इतकी आहे.

Koyna Dam

Date: 07/07/2025, 8:00 AM
Water level: 2128’01”
(648.640m)

Gross Storage: 68.38 TMC (64.97%)

Inflow : 23,874 Cusecs.
(2.06 TMC)

Discharges-
KDPH : 2100 Cusecs.

Rainfall in mm-
(Daily/Cumulative)
Koyna- 52/2026
Navaja- 41/1820
Mahabaleshwar- 63/1898