पाटण प्रतिनिधी | सध्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. काही भागात पूरस्थिती निर्माण झाल्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढल्यामुळे धरणात गेल्या 24 तासात 2.6 टीएमसी इतका पाणीसाठा वाढला असून सध्या धरणात 66. 90 टीएमसी पाणीसाठा आहे. रात्री उशिरा 8.30 वाजता धरणाच्या पायथा विद्युत गृहातील 2 नंबरचे युनिट कार्यान्वित करून कोयना नदी पात्रात 2100 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे कोयना, कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोयना धरणात शुक्रवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 66.90
टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गेल्या 24 तासात कोयनेला – 94 मिलीमीटर, नवजा- 130 मिलीमीटर व महाबळेश्वरला – 95 मिलीमीटर पाऊस पडला. त्याचबरोबर आतापर्यंत कोयना येथे – 2553, नवजा- 3593 आणि महाबळेश्वरला – 3352 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर कोयना धरणात
प्रतिसेंकद 31 हजार 416 क्युसेस पाण्याची आवक सुरू आहे.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. आज नवजा परिसरात २०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जलाशयात प्रतिसेकंद ३६ हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग; 66. 90 टीएमसी पाणीसाठा pic.twitter.com/oekCZtGYUE
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) July 28, 2023
सातारा जिल्ह्यात सरासरी 12.8 मि.मी. पाऊस नोंद
सातारा जिल्ह्यात सरासरी 12.8 मि.मी. पावसाची नोंद झाली असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 362.5 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस एकूण सरासरीच्या 40.9 टक्के इतका आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. सर्व आकडे मि.मी.मध्ये असून कंसातील आकडे आतापर्यंतच्या एकूण पावसाचे आहेत. सातारा – 11.2
( 373.6), जावली-मेढा- 23.4 (667.1), पाटण – 27.2 (694.8), कराड – 9.6 (1980), कोरेगाव – 4.5 (165.9), खटाव – वडूज – 6.1 (129.9), माण – दहिवडी – 2.6 (115.4), फलटण – 2.1 (82.8), खंडाळा -2.5 (196.6), वाई -8.8 (278.5), महाबळेश्वर 64.7 (1914.5) या प्रमाणे पाऊस झाला आहे.