पाटण प्रतिनिधी । परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान, बुधवारी रात्री खटाव तालुक्यातील मायणीत ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्यामुळे गावातील अनेक घरांत पाणी शिरले. गुरुवारी देखील दिवसभर पावसाची रिपरिप सुरु असल्याने कोयना धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्याने धरणात गुरुवारी सायंकाळपर्यंत 104.28 TMC पाणीसाठा झाला तर 99.03 टक्के धारणा भरले. तर धरणाच्या पायथा वीज गृहातून 2 हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
गेल्या तीन दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र एकच हाहाकार उडाला असून बुधवारी मल्हारपेठ-पंढरपूर महामार्गासह अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने सर्वत्र वाहतूक खोळंबली होती. मल्हारपेठ-पंढरपूर महामार्गासह अनेक रस्ते पाण्याखाली गेले. गेली तीन ते चार दिवस साताऱ्यातील दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जाणारा मायणी व परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाचे पाणी शेतीत साचल्याने अनेक ठिकाणी बांध फुटून ठिकठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाहून गेलेली आहे.
दरम्यान, गुरुवारी सायंकाळी पाच वाजता आलेल्या आकडेवारीनुसार कोयना येथे 34 आणि नवजाला 12 तर महाबळेश्वरमध्ये 20 मिलिमीटर पर्जन्यमान झाले आहे. यामुळे कोयना धरणात 16 हजार 300 क्युसेक पाण्याची आवक झाली आहे. तर धरणातून 2 हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
Koyna Dam
Date: 26/09/2024
Time: 05:00 PM
Water level: 2162’09” (659.206m)
Dam Storage:
Gross: 104.28 TMC (99.08%)
Live: 99.16 TMC (99.03%)
Inflow : 16,300 Cusecs.
Discharges
Radial Gate: 00 Cusecs.
KDPH: 2100 Cusecs.
Total Discharge in koyna River: 2100 Cusecs
Rainfall in mm-(Daily/Cumulative)
Koyna- 34/5477
Navaja- 12/6688
Mahabaleshwar- 20/6311