सातारा प्रतिनिधी | सातत्याने गुन्हे करणाऱ्या कराड आणि शिरवळमधील ६ जणांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलं आहे. यामध्ये कराडमधील ४ आणि शिरवळमधील २ जणांचा समावेश आहे. कराड मधील चौघांना संपूर्ण सातारा जिल्हा आणि सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, कडेगाव तर शिरवळ मधील दोघांना सातारा, पुणे व सोलापुर या तीन जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता तडीपार करण्यात आले आहे.
जिल्हयामध्ये कराड शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने गुन्हे करणारे टोळी प्रमुख १. अमीत हणमंत कदम, वय-२७ वर्षे, रा. होली फॅमिलीचे मागे, वैभव कॉलनी, विदयानगर, सैदापूर, कराड, मूळ रा. अंतवडी, ता. कराड, जि. सातारा, २. सनी सुरेश शिंदे, वय २५ वर्षे, रा. ओगलेवाडी ता. कराड जि सातारा, ३. वाहीद बाचासो मुल्ला, वय २६ वर्षे, रा. विंग ता. कराड, जि सातारा, ४. रिजवान रज्जाक नदाफ, वय २४ वर्षे, रा. मलकापुर ता. कराड जि सातारा यांचे टोळीवर कराड शहर पोलीस ठाणे येथे दरोडयाची तयारी सह अग्निशस्त्र बाळगणे, गंभीर दुखापत करुन शिवीगाळ दमदाटी करणे, साधी दुखापत करुन शिवीगाळ दमदाटी करणे, बेकायदेशीर जमाव जमवुन नुकसान करणे, घरफोडी चोरी करणे, मोटार सायकल चोरी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल होते.
गुन्हे दखल असल्याने कराड शहर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री. के.एन. पाटील, पोलीस निरीक्षक, कराड शहर पोलीस ठाणे यांनी सदर टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे पुर्ण सातारा जिल्हयातून तसेच सांगली जिल्हयातील शिराळा, वाळवा, कडेगाव तालुक्यातून दोन वर्षे तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी श्री. अमोल ठाकुर, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग यांनी केली होती.
सातारा जिल्हयामधील शिरवळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने गुन्हे करणारे टोळी प्रमुख १. बि-या उर्फ अमित रमेश कदम ( रा.लोणी, ता.खंडाळा, जि. सातारा) २. विशाल उर्फ बाबु महादेव चव्हाण (वय २८, रा. भोळी, ता. खंडाळा, जि. सातारा) यांचे टोळीवर शिरवळ पोलीस ठाणे येथे खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी मागुन शिवीगाळ दमदाटी करणे, दंगा मारामारी करुन शिवीगाळ दमदाटी करणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल होते त्यामुळे शिरवळ पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री नवनाथ मदने, पोलीस निरीक्षक शिरवळ पोलीस ठाणे यांनी सदर टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे सातारा, पुणे व सोलापुर या तीन जिल्ह्यातून दोन वर्षे तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी श्री. राहुल आर थस, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग यांनी केली होती.
सदर टोळीतील इसमांचेवर दाखल असले गुन्हयांमध्ये त्यांचेवर वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई करुनही त्यांचेवर गुन्हे करण्याच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही. यातील टोळीमधील इसम हे कराड शहर तसेच शिरवळ परिसरामध्ये सातत्याने गुन्हे करीत होते, त्यांचेवर कायदयाचा कोणताच धाक न राहील्यामुळे कराड शहर तसेच आसपासच्या परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता, अशा टोळीवर सर्वसामन्य जनतेमधुन कडक कारवाई करणेची मागणी होत होती.
वरील टोळयांची मा. समीर शेख, हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचे समोर सुनावणी होवुन कराड शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने गुन्हे करणारे १. अमीत हणमंत कदम, (वय २७, रा. होली फॅमिलीचे मागे), वैभव (रा. विदयानगर, सैदापूर, कराड. मुळ रा. अंतवडी, ता. कराड, जि. सातारा), २. सनी सुरेश शिंदे (वय २५, रा. ओगलेवाडी ता. कराड जि सातारा), ३. वाहीद बाबासो मुल्ला (वय २६, रा. विंग ता. कराड, जि सातारा), ४. रिजवान रज्जाक नदाफ (वय २४ वर्षे, रा. मलकापुर ता. कराड जि सातारा) या टोळीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये पुर्ण सातारा जिल्हयातुन तसेच सांगली जिल्हयातील शिराळा, वाळवा, कडेगाव हद्दीतुन दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे.
तालुक्याचे शिरवळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने गुन्हे करणारे १. बि-या उर्फ अमित रमेश कदम (वय ३३, रा.लोणी, ता.खंडाळा, जि. सातारा) २. विशाल उर्फ बाबु महादेव चव्हाण (वय २८, रा.भोळी, ता. खंडाळा, जि. सातारा) या टोळीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये सातारा, पुणे व सोलापुर या तीन जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे.
नोव्हेंबर २०२२ पासुन मपोकाक ५५ प्रमाणे २८ उपद्रवी टोळयांमधील ८९ इसमांना, मपोकाक ५६ प्रमाणे २८ इसमांना, मपोकाक ५७ प्रमाणे ०३ इसमांना असे एकुण १२० इसमांविरुध्द तडीपार सारखी कारवाई करण्यात आली असुन भविष्यातही सातारा जिल्हयामधील सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करणेत येणार आहेत.
या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने श्रीमती आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, श्रेणी पोउनि तानाजी माने पो.हवा प्रमोद सावंत, अमित सपकाळ, पो.कॉ. केतन शिंदे, म.पो.कॉ. अनुराधा सणस, कराड शहर पोलीस ठाणेचे सफौ संजय देवकुळे, पोकों आनंदा जाधव, मपोकों सोनाली पिसाळ, शिरवळ पोलीस ठाणेचे पोहवा जितेंद्र शिंदे, पोकों मंगेश मोझर यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.