अखेर ‘त्या’ रात्री तिघांनी मिळून केला त्याचा ‘गेम’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील कुसूर येथील एका युवकाचा ढेबेवाडी परिसरात खून झाल्याची घटना घडली सोमवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास ढेबेवाडी परिसरात घडली. संबंधित युवकाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थित मृतदेह पोलिसांना आढळून आला आहे. ऋतुराज दिलीप देशमुख (वय 31, रा. कुसूर, ता. कराड) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव होते. या युवकाच्या खून प्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली आहे.

१) वैभव काळे २) उमर मुल्ला ३) शुभम खेडेकर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कराड तालुक्यातील वांग नदीपासून काही अंतरावर असलेल्या ढेबेवाडी – कराड मार्गावर सोमवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास संबंधित युवकाचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. याची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विकास सपकाळ तसेच इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. युवकास रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी चौकशी केल्यानंतर जुन्या भांडणाच्या कारणावरुन ऋतुराज याच्या डोक्यात दगड घालुन त्यास जखमी करुन त्यास गंभीर दुखापत पोचवून खुन केल्याबाबत ढेबेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नमुद गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोळी अधीक्षक श्रीमती आँचल दलाल यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक लावंड, पोलीस निरीक्षक अरुण देवकर ,सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत चौधरी, ढेबेवाडी पोलीस ठाणे, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील स्थानिक गुन्हें शाखा, सातारा व त्यांचे पथकास तात्काळ गुन्हयाचे घटनास्थळी जावून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे नमुद पोलीस अधिकारी, अंमलदार तात्काळ घटनास्थळी रवाना झाले.

त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक लावंड यांनी अधिकारी अंमलदाचे स्वतंत्र तपास पथके तयार करुन त्यांना प्राप्त फुटेजमधील, संशयीत इसमांचा शोध घेवून त्यांना ताब्यात घेण्याचा सुचना दिल्या. नेमले पथकाने घटनास्थळा जवळील व आजूबाजूचे परिसरातील साक्षिदार लोकांचेकडे विचारपूस केली तीन संशयीत इसमांची नावे आढळून आली.

नमुद तपास पथके गुन्हयातील आरोपीचा शोध घेत असताना सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत चौधरी तसेच पोलीस उपनिरीक्षक श्री पतंग पाटील, स्थानिक गुन्हे शाखा सातारा व त्यांचे पथकाला गुन्हयातील सर्व आरोपी हे पुणे बराजुकडे गेले असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांना नमुद पथकाने पुणे येथे सापळा रचुन शिताफिने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे नमुद गुन्हयाचे अनुषंगाने विचारपुस केली असता त्यांनी मयत ऋतुराज दिलीप देशमुख, रा. कसुर ता कराड जि सातारा याचेबरोबर जुन्या भांडणाच्या कारणावरुन वाद असल्याने त्याच्या डोक्यात दगड घालून खुन केला असल्याचे काबुल केले. त्यानंतर पोलिसांनी युवकाच्या खून प्रकरणाचा गंभीर गुन्हा उघडकीस आणला आहे.

पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल व उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक लावंड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा, सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत चौधरी, ढेबेवाडी पोलीस ठाणे, राज डांगे, पोलीस उपनिरीक्षक कराड शहर पोलीस ठाणे, तसेच पोलीस उपनिरीक्षक श्री पतंग पाटील, स्थानिक गुन्हे शाखा सातारा, पोलीस अंमलदार मोहन नाचन, लक्ष्मण जगधने, साबीर मुल्ता, शिवाजी भिसे, केतन शिंदे, मयुर देशमुख, मोहसीन मोमीन चालक विजय निकम तसेच

ढेबेवाडी पोलीस ठाणेचे पोलीस अंमलदार विकास सपकाळ, प्रशांत चव्हाण, अजय माने, प्रशांत चव्हाण, संताजी जाधव, मानिक पाटील, प्रशांत माने, सौरभ कांबळे, सरिता पवार कराड शहर पोलीस ठाणेचे पोलीस अंमलदार शशी काळे, कुलदीप कोळी, संतोष पाडळे यांनी सायचर विभागाचे अजय जाधव, अमित झेंडे, यांनी सदरची कारवाई केलेली असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केलेले आहे.