पावसाने उघडीप देताच अधिकाऱ्यांनी बांबूसह 35 फळ झाडांची केली लागवड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । गेल्या आठवडा भरापासून सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात पाऊस कोसळत आहे. दरम्यान, या विभागात पावसाने काही प्रमाणात उघडीप देताच पाटणचे उपविभागीय अधिकारी सुनिल गाडे यांनी हेळवाक महसूल मंडळातील तलाठी, पोलीस पाटील व कोतवाल यांच्या मदतीने स्थानिक श्रमजीवी य सेवाभावी संस्थेच्या जमिनीत आंबा, चिकू यासारख्या 35 फळ झाडांची रोपे लावली. संबंधित संस्था मांडगा बांबूची रोपे देखील तयार करत असल्याने त्याचीही रोपे रस्त्याच्या कडेला लावण्यात आली.

सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बांबू लागवड करण्याचे नियोजन प्रशासकीय स्तरावर सुरू आहे. पाटण तालुक्यात देखील वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग यांच्यामार्फत बांबू लागवड करण्याचे प्रस्तावित आहे. त्याचाच एक भाग म्हणून श्रमदानातून बांबू लागवड करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने कोयनानगर परिसरातील रानमळा येथे बांबू लागवडीची सुरुवात करण्यात आली.

श्रमजीवी सेवाभावी संस्थेला बांबू लागवडीमध्ये पुढाकार घेण्याच्या दृष्टीने तालुका प्रशासनाने आवाहन केले. त्याला संस्थेच्यावतीने सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून त्यांचेकडे सद्यस्थितीत सुमारे 60 हजार रोपे असून पाटण तालुक्यातील शेतकरी असल्यास 7/12 उतारा व आधार कार्ड दाखविल्यास त्या त्यांना बांबू लागवडीसाठी मोफत रोपे देण्याची तयारी संस्थेच्या माध्यमातून परिणामकारक बांबू लागवड होऊ शकते असा विश्वास उपविभागीय अधिकारी सुनील गाडे यांनी यावेळीव्यक्त केला. तसेच बांबू लागवडीसाठी इच्छुक असलेल्या पाटण मधील शेतकऱ्यांनी बांबू लागवड मोठ्या प्रमाणात करावी, असे आवाहन गाडे यांनी यावेळी केले.