सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट; कोयना धरणात ‘एवढा’ पाणीसाठा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात शुक्रवारी पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी धरण पाणलोट क्षेत्रात रात्रभर पावसाची संततधार कायम राहिली असल्याने धरणात पाण्याची अवाक चांगली झाली आहे. कण्हेर, वीर आणि कोयना धरणातील विसर्ग कायम असून सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर कोयना धरणात 82.98 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.

मुसळधार पावसाने पश्चिमेकडे हाहाकार उडवला असून गुरुवारी कोयना, कण्हेर व वीर धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. शुक्रवारी मात्र पावसाचा जोर काहीसा ओसरला. सकाळपासून उसंत घेतलेल्या पावसाने दुपारनंतर पुन्हा सुरुवात केली. अधूनमधून सरी कोसळू लागल्या. जिल्ह्यातील बहुतांश नद्या धोक्याच्या पातळीबाहेर वाहत आहेत.

सातारा तालुक्यातील परळी खोर्‍यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. याच खोर्‍यातील ताकवली येथील शेतकरी कृष्णा गणपत वाईकर (वय 50) हे बुधवारी ताकवली येथून सांडवली येथे भात लावण करायला गेले होते. सांडवली येथून दुपारी परतही फिरले. मात्र, ते घरी (ताकवली) पोहोचले नाहीत. त्यांचा शुक्रवारीही शोध लागला नव्हता.

कृष्णा, कोयना, वेण्णा, तारळी, उरमोडी, कुडाळी, निरा यासह विविध नद्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पुराच्या पाण्यामुळे नदी काठच्या लोकांचे स्थलांतर प्रशासनामार्फत शाळा, समाजमंदिराच्या ठिकाणी करण्यात आले आहे. जोरदार पावसामुळे पश्चिम भागात पडझडीच्या घटना घडू लागल्या आहेत. पडझडीच्या ठिकाणी अधिकारी भेटी देवून पंचनामे करण्याच्या सूचनाही दिल्या जात आहेत. अनेक ठिकाणी भात शेतीसह ऊस शेती पाण्याखाली गेली आहे.

शनिवारी सकाळी आठ वाजता आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणमध्ये 82.98 टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण 78.84 टक्के भरले असून धरणात 45 हजार 826 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. दरम्यान, धरणातून एकूण 32 हजार 100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे.

Koyna Dam

Date: 27/07/2024
Time: 08:00 AM
Water level: 2144’06” (653.644m)

Dam Storage :

Gross: 82.98 TMC (78.84%)
Live: 77.86 TMC (77.76%)

Inflow : 45,826 Cusecs.

Discharges
.Radial Gate: 30,000 Cusecs.
KDPH: 2100 Cusecs.

Total Discharge in koyna River: 32,100 Cusecs

Rainfall in mm – (Daily/Cumulative)
Koyna- 93/3348
Navaja- 105/3899
Mahabaleshwar- 182/3557