पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस पडत असून हवामान विभागानेही शनिवारपर्यंत आॅरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे पावसाच्या प्रमाणात वाढ होणार आहे. तर गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे १२४ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. कोयना धरणातही पाण्याची आवक कायम आहे. त्यामुळे धरणसाठा ८६ टीएमसीजवळ पोहोचला आहे. तसेच धरणातून विसर्ग कायम असल्याने दरवाजे ९ फुटांवर स्थिर आहेत.
सातारा जिल्ह्याला मागील आठवड्यात जोरदार पावसाने चांगलीच हजेरी लावली. दहा दिवस पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव आदी तालुक्यांतही चांगला पाऊस पडला. यामुळे खरीप हंगामातील पिकांना फायदा झाला आहे. तर पश्चिम भागात धुवाॅधार पाऊस झाला. कोयना, नवजा, तापोळा, महाबळेश्वरसह संपूर्ण कांदाटी खोऱ्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. तसेच धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी, कोयनासारख्या प्रमुख धरणांतही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला. त्यामुळे विसर्ग सुरू करावा लागला.
मात्र, पाच दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले होते. दोन दिवस उघडझाप सुरू राहिली. पण, बुधवारपासून पाऊस पुन्हा वाढू लागला आहे. गुरूवारीही सकाळपासून पाऊस सुरूच होता. गुरूवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयनानगर येथे 25 मिलिमीटर पर्जन्यमान झाले. तर एक जूनपासून आतापर्यंत 3 हजार 788 मिलिमीटर पाऊस झाला आहे. नवजा येथे आतापर्यंत 4 हजार 485 मिलिमीटर पाऊस पडला. जिल्ह्यात पाथरपूंज नंतर नवजा येथेच सर्वाधिक पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. तर महाबळेश्वरला २४ तासांत ८४ तर दोन महिन्यांत ४ हजार ९८ मिलिमीटर पाऊस पडला आहे.
Koyna Dam
Date: 01/08/2024
Time: 05:00 PM
Water level: 2148’01” (654.736m)
Dam Storage:
Gross: 86.19 TMC (81.89%)
Live: 81.07 TMC (80.96%)
Inflow : 45,280 Cusecs.
Discharges
Radial Gate: 40,000 Cusecs.
KDPH: 2100 Cusecs.
Total Discharge in koyna River: 42,100 Cusecs
Rainfall in mm-(Daily/Cumulative)
Koyna- 25/3788
Navaja- 49/4485
Mahabaleshwar- 33/4131