कराड प्रतिनिधी | एका वृध्द महिलेचा मृतदेह डोक्यातील जखमेतून रक्तस्ताव होऊन थारोळ्यात पडल्याच्या अवस्थेत आढळल्याची घटना कराड तालुक्यातील चोरे येथे घडली. तारावाई आनंदराव यादव (वय ६४, रा. चोरे, ता. कराड) असे वृद्ध महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी उंब्रज पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असून घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, ताराबाई यादव या चोरे येथील घरात एकट्याच वास्तव्यास आहेत. त्यांची दोन्ही मुले नोकरी निमित्त कोल्हापूरमध्ये वास्तव्यास असतात. दररोज पहाटे उठणाऱ्या ताराबाई यादव या सोमवारी सकाळी ९ वाजल्या नंतरही घराबाहेर आल्या नाहीत. म्हणून शेजारच्यांनी याची माहिती गावातील वृद्धेच्या नातेवाईकांना दिली.
नातेवाईक आल्यानंतर त्यांना घराच्या समोरचा दरवाजा आातून बंद असल्याचे तर पाठीमागील दरवाजा उघडा असल्याचे दिसले. घरात ताराबाई जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत दिसल्या.
नातेवाईकांनी याची माहिती उंब्रज पोलिसाना दिली. घटनेची माहिती मिळताच उंब्रज पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे हे पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी श्वानपथक तसेच ठसे तज्ज्ञ पाचारण केले होते. मात्र, पोलीस श्वान घटनास्थळी घुटमळ्ले. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर व गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक अरूण देवकर यांनी भेट देत तपासाबावत सूचना केल्या.
दरम्यान, मृत वृद्धेच्या डोक्यातून रक्तस्त्राव झालेला दिसून आला. तसेच जनावरांच्या गोठ्यात आणि बेडवरसुद्धा रक्त दिसल्या. संबंधित महिलेचा मृतदेह पोलीसांनी कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदनानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यानी नीताराबाई यादव यांच्या ज्या जखमेतून रक्तसऱ्हाव झाला आहे, ती जखम जुनी असल्याचे पोलिसांना सांगितले आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
प्रकरणाचा सखोल तपास सुरू : अमोल ठाकूर
चोरे येथील घडलेल्या घटनेची गुन्हा नोंद करण्यात आली असून सर्वशक्यता पडताळत याप्रकरणी सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी ‘हॅलो महाराष्ट्र‘शी बोलताना दिली आहे.