पाटण प्रतिनिधी । गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू मुसळधार पावसाने पाटण तालुक्यात अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. उरुल भागातील ठोमसे, बोडकेवाडी, मोरेवाडी, गणेवाडी, तांबेवाडी पाच गावांना जोडणाऱ्या दोन्ही पुलावर पाणी आल्यामुळे किमान ७ तास गावांचा संपर्क तुटला. उरुलच्या पश्चिमेकडील फणशी कारी ओढ्यावरील ठोमसे व लहान-मोठ्या वाड्यांकडे जाणाऱ्या दोन्ही पुलावर बुधवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसाने पाणी आले. त्यामुळे पाच गावांचा संपर्क तुटला. तर शिवारात सगळीकडे पाणीच पाणी दिसत होते. मुसळधार पावसामुळे व कोयना नदीतून वाढवलेल्या विसर्गामुळे मुळगाव, निसरे पूल पाण्याखाली गेला आहे.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरुच असल्यामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात येणारी पाण्याची आवक प्रचंड वाढली असून धरणात 85.81 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे सलग दुसऱ्या दिवशीही ९ फुटांवर कायम ठेवून कोयना नदीपात्रात ४२ हजार १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग कायम ठेवण्यात आला आहे. दरम्यान, कोयना नदीवरील मेंढघर, जुना संगमनगर धक्का पूल, मूळगाव पूल आणि निसरे फरशी पूल पाण्याखाली गेल्याने नदीपलीकडील गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे प्रशासनाने कोयनाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
गेल्या आठवड्यापासून कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढल्यामुळे आणि कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर असल्याने धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी शुक्रवारपासून धरणाचे सहा वक्र दरवाजे ७ फुटापर्यंत उचलून धरणातून प्रतिसेकंद ३० हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. मात्र, सोमवारी पहाटेपासून पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर ओसरला. मंगळवारी दुपारी १२ वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे ९ फुटांवर उचलून कोयना नदीपात्रात ४२ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला. बुधवारी पावसाचा जोर कमी होईल अशी शक्यता होती.
मात्र, बुधवारी पहाटेपासूनच पावसाची संततधार सुरू झाल्याने कोयना धरणात येणारी पाण्याची आवक वाढतच राहिली. परिणामी बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी कोयना धरणाचे सहा वन दरवाजे ९ फुटांवर कायम ठेवून धरणातून कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद ४२ हजार १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग चालूच ठेवण्याचा निर्णय कोयना सिंचन विभागाने घेतला आहे.
घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा
काल बुधवारपासून ते ३ ऑगस्ट हे चार दिवस सातारासह कोल्हापूर आणि पुणे येथील घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे येत्या चोवीस तासांत कोयना पाणलोट क्षेत्रातही पुन्हा मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
पाटण बसस्थानक परिसराला पाण्याचा वेढा
पाटण तालुक्यात बुधवारी पहाटेपासूनच मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरुच असल्याने कोयना, पाटण, मल्हारपेठ, मोरगिरी, ढेबेवाडी, तारळे आणि चाफळ या सर्वच विभागाला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. परिणामी परिसरातील नाले, ओढे यांचे पाणी पात्राबाहेर येऊन रस्त्यावर आले. धरणातील विसर्ग यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाल्याने ओढ्याला फुगी येऊन कराड-चिपळूण या नव्या महामार्गावर पाटण येथे ओढ्याचे पाणी आले.
ठोमसे पुलावर पाणी; 5 गावांचा संपर्क तुटला
गत पंधरा दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आणि बुधवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसाने पाटण तालुक्यात अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. उरुल भागातील ठोमसे, बोडकेवाडी, मोरेवाडी, गणेवाडी, तांबेवाडी पाच गावांना जोडणाऱ्या दोन्ही पुलावर पाणी आल्यामुळे किमान सात तास गावांचा संपर्क तुटला. उरुलच्या पश्चिमेकडील फणशी कारी ओढ्यावरील ठोमसे व लहान-मोठ्या तीत वाड्यांकडे जाणाऱ्या दोन्ही पुलावर बुधवारी पहाटे झालेल्या मुसळधार रणे, पावसाने पाणी आले. त्यामुळे पाच गावांचा संपर्क तुटला.