महायुतीच्या उमेदवारांना लाडकी बहीण पावली; अतुलबाबा, मनोजदादा, पाटणला शंभूराज तर वाईत मकरंद आबा आघाडीवर

0
41
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघातील १०९ उमेदवारांच्या मतमोजणीस सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार यांना लाडकी बहीण पावल्याचे दिसून येत आहे. कराड दक्षिण मतदार संघात भाजपचे उमेदवार अतुल बाबा भोसले हे सहाव्या फेरी अखेर 3 हजार 314 मतांनी आघाडीवर आहेत. तर नवव्या फेरी अखेर कराड उत्तर मधून भाजपचे उमेदवार मनोज घोरपडे 1849 मतांनी मनोज घोरपडे आघाडीवर असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते बाळासाहेब पाटील पिछाडीवर आहेत तर कराड दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पिछाडीवर गेले आहेत. पाटणला आठव्या फेरीअखेर शंभूराज देसाई 6276 मते घेत आघाडीवर आहेत. तर वाई विधानसभा मतदार संघात मकरंद पाटील हे नवव्या फेरी अखेर 3179 मतांची आघाडीवर आहेत.

कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात पाचवी फेरीत काँग्रेस उमेदवार माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना 7435 माते पडली आहेत तर भाजप कडून डॉ. अतुलबाबा भोसले यांनी 4 हजार 722 मतांनी मताने आघाडी घेतली आहेत. कराड उत्तरमध्ये नवव्या फेरीत मनोज घोरपडे यांनी 6 हजार 42 मिळवून 23 हजार 396 मतांनी आघाडी घेतली आहे. या ठिकाणी बाळासाहेब पाटील यांना 4 हजार 193 मते मिळाली आहेत.

सहाव्या फेरीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना मिळालेली 4519 मिळाली असली तरी डॉ अतुलबाबा भोसले यांना मिळालेली मते 7 हजार 833 मते मिळाली आहेत. या फेरीत अतुल भोसले 3314 मतांनी आघाडीवर आहेत. एकंदरीत डॉ. अतुल भोसले एकूण 7 हजार 831 मतानी आघाडीवर आहेत. कराड उत्तर आणि कराड दक्षिण, वाई, पाटण मतदार संघात महायुती आघाडीवर असल्याचे आतापर्यंत स्पष्ट झाले आहे.