पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात मुसळधारपणे पाऊस कोसळत असून कोयना पाणलोट क्षेत्रासह पाटण तालुक्यात शुक्रवारी दिवसभर पावसाने हजेरी लावली. दरम्यान, दिवसभर कोयनानगर येथे 21 तर नवजा येथे 19 तर महाबळेश्वर पर्जन्यमापन केंद्रावर 01 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. कोयना धरणात पाणीसाठ्यात काहीशी वाढ झाली असून 15.76 टीएमसी इतका पाणीसाठा धरणात झाला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाकडून जोरदार हजेरी लावली जात आहे. गुरुवारी पावसाने कराडसह पाटण तालुक्याला चांगलेच झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे कराडसह पाटण तालुक्यातील अनेक गावांतील बंधाऱ्यात चांगला पाणीसाठा झाला आहे. कास, बामणोली, कोयना, नवजा, तापोळा, महाबळेश्वर भागात पावसाची जोर वाढला आहे. त्यामुळे प्रमुख धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे.
कोयना धरणात सुमारे साडे पाच हजार क्यूसेक वेगाने पाणी येत आहे. यामुळे धरणातील पाणीपातळीत हळूहळू वाढ होऊ लागली आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास कोयनेत १५.६१ टीएमसी पाणीसाठा झाला होता. १४.८३ ही टक्केवारी आहे. तर मागील १५ दिवसांपासून धरणातील विसर्ग बंद आहे. धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी आदी धरणक्षेत्रात पावसाचा जोर कमी आहे.
कोयना धरणात किती झाला पाणीसाठा? याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी खालील आकडेवारी पहा –
Koyna Dam
Date : 21/06/2024
Time : 05:00 PM
Water level : 2044”06” (623.164m)
Dam Storage :
Gross : 15.76 TMC (14.97%)
Live : 10.64 TMC (10.62%)
Discharges
KDPH : 00 Cusecs.
Total Discharge in koyna River : 00 Cusecs
Rainfall in mm-(Daily/Cumulative)
Koyna – 21/460
Navaja – 19/571
Mahabaleshwar – 01/362